{ स्वाध्याय – उत्तरासह
}
अर्थशास्त्र 12 वी
प्रकरण 1. :- सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची ओळख
प्र.१. योग्य पर्याय निवडा
:
१) अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी
संबंधित आहे.
अ. सूक्ष्म अर्थशास्त्र
ब.स्थूल अर्थशास्त्र
क.
अर्थमिती ड. यांपैकी काहीही
नाही
पर्याय : १)
अ, ब, क २)
अ, ब
३) फक्त अ ४)
वरीलपैकी नाही
२) सूक्ष्म अर्थशास्त्र संकल्पना
अ. राष्ट्रीय उत्पन्न ब.
सामान्य किंमत पातळी
पर्याय :१) ब, क २)
ब, क, ड
३) अ, ब,
क ४)
क, ड
३) सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली
जाणारी पदधत.
अ.
राशी पद्धत
ब.
समग्र पद्धत क.
विभाजन पद्धत
ड. सर्वसमावेशक पद्धत
पर्याय :१) अ, क,
ड २)
ब, क. ३)
फक्त क ४) फक्त अ
४) स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते.
अ. संपूर्ण अर्थव्यवस्था. ब. आर्थिक विकास
क. एकूण पुरवठा ड. उत्पादन किंमत
पर्याय :१) अ, ब,
क २)
ब, क, ड.
३) फक्त ड ४) अ, ब, क,
ड
उत्तरे
:- 1) पर्याय क्रमांक 3 - फक्त अ.
2) पर्याय क्रमांक 4 - क, ड
3)
पर्याय क्रमांक 3- फक्त क
4) पर्याय क्रमांक 1- अ, ब,
क
प्र.२. सहसंबंध
पूर्ण करा :
१) सूक्ष्म अर्थशास्त्र ः( विभाजन
पद्धत. )ः स्थूल अर्थशास्त्र ः(---????------)
२)सूक्ष्म अर्थशास्त्र ः(. झाड )ःः
स्थूल अर्थशास्त्रः(-----------?????-----------)
३) स्थूल अर्थशास्त्र ः( उत्पन्न आणि रोजगार
सिद्धान्त )ःः सूक्ष्म अर्थशास्त्र ःः(----????----)
४)
मॅक्रोस ः( स्थूल अर्थशास्त्र. )ःः मायक्रोस ः(--------????------)
५)
( सर्वसाधारण
समतोल.
) ः स्थूल अर्थशास्त्र ःः(---------????------)
ःसूक्ष्म अर्थशास्त्र
उत्तरे :- 1) राशी पद्धत 2) जंगल
3) वस्तू किंवा घटक किंमतनिश्चिती.
4) सूक्ष्म अर्थशास्त्र 5) अंशिक समतोल
प्र.३. खालील
उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा :
१)
गौरीने एका विशिष्ट
उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहीती गोळा केली.
२) रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले, उदा., काय आणि
कसे उत्पादन करावे?
३)शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक
कर्जावरील व्याज दिले.
उत्तरे :-. 1) संकल्पना :- वैयक्तिक घटक अभ्यास
2)
संकल्पना :- मुक्त बाजारपेठ.
3) संकल्पना :- उत्पादक घटकांची किंमत.
1) 1) सुक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरासाठी व नोट्ससाठी
पुढील लिंक क्लिक करा.
२) स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर :-
३) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा.
उत्तर :-
प्र. ५. खालील
विधानांशी आपण सहमत किंवा
असहमत आहात सकारण स्पष्ट करा.
१) 1) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद
आहे.
उत्तर :- 1) मी या विधानाशी सहमत नाही.
कारण :- 1) एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते? :-
यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात बाजारपेठेत एखादा ग्राहक व एखादा उत्पादक आपल्या मागणी
व पुरवठ्यात बदल करून कसा वागतो ? याचा अभ्यास करून बाजारपेठेत एखाद्या वस्तूची किंमत
कशी ठरते ? या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो.
2) उत्पादक
घटकांची किंमत कशी ठरते? :- कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि
संयोजक हे चार उत्पादनाचे घटक आवश्यक असतात त्यांचा अभ्यास व या उत्पादन घटकांचे मोबदले
अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा ही किंमत कशी ठरते याचा स्वतंत्रपणे अभ्यास सूक्ष्म
अर्थशास्त्रात केला जातो.
3) आर्थिक
कल्याणाचा अभ्यास :- देशातील साधनसामग्रीचे योग्य व कार्यक्षम वाटप झाल्यास संपूर्ण
समाजाला फायदा होऊन सर्वांचे आर्थिक कल्याण होते यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक
कल्याणाचा म्हणजेच आर्थिक कार्यक्षमता यांचा अभ्यास होतो
अ) उत्पादनातील कार्यक्षमता
– म्हणजेच उद्योगात साधनसामुग्रीचा योग्य वापर करून कमी किमतीत जास्तीत जास्त उत्पादन
करणे.
ब) उपभोगाच्या क्षेत्रातील
कार्यक्षमता – देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे समाजातील सर्व लोकांमध्ये योग्य
वाटप करून सर्वांचे कल्याण करणे.
क) एकूण आर्थिक कार्यक्षमता
– यांमध्ये लोकांना प्रामुख्याने आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणे.
अशाप्रकारे सूक्ष्म
अर्थशास्त्रात प्रामुख्याने किंमत सिद्धांत व आर्थिक कल्याण याचा अभ्यास होतो.
२) स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला
जातो.
उत्तर :- 2) मी या विधानाशी सहमत नाही.
कारण :- सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक चल,
व्यक्तिगत घटकांचा अभ्यास होतो स्पष्ट करा
उत्तर :- वैयक्तिक घटकांचा अभ्यास:- “एखाद्या विशिष्ट घटकाचा” अभ्यास
म्हणजे वैयक्तिक चल किंवा व्यक्तिगत घटक होय सूक्ष्म अर्थशास्त्रात
प्रा. बोल्डिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती, एखादे कुटुंब
,एक वस्तू, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, एखादा उद्योग, एखादा उत्पादनाचा घटक
अशा एखादा लहान घटकांचा, वैयक्तिक चलाचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत, लहान घटकांचा अभ्यास होतो असे म्हटले जाते.
3) अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
उत्तर :- 3) मी या
विधानाशी सहमत नाही.
४) सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा
वापर केला जातो.
उत्तर :- 4) मी या विधानाशी सहमत नाही.
कारण :- सूक्ष्म-अर्थशास्त्रात अभ्यास
करण्यासाठी विभाजन पद्धती वापरली जाते स्पष्ट करा. उत्तर :- विभाजन पद्धत :- मोठ्या घटकांचे अनेक लहान वैयक्तिक घटकांमध्ये
विभाजन करून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो याला विभाजन पद्धत म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे
लहान भागात विभाजन करून एक व्यक्ती एक कुटुंब एखादी वस्तू एखादी उत्पादन संस्था एखादा उद्योग त्याचा अभ्यास केला जातो तसेच
उत्पादनासाठी चार घटक लागतात त्यांचे विभाजन करून भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांचा
स्वतंत्रपणे अभ्यास करून विभाजन पद्धत वापरली जाते.
५)
सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धान्त म्हणून ओळखले
जाते.
उत्तर :- 5) मी या विधानाशी सहमत आहे.
कारण :- सूक्ष्म अर्थशास्त्रात एखाद्या
वस्तूची किंमत कशी ठरते ? तसेच उत्पादनाचे चार घटक म्हणजेच भूमीचा- खंड,
श्रमिकाचे- वेतन, भांडवलाचे- व्याज व संयोजकांचा मोबदला किंवा किंमत नफा कसा ठरतो
याचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा
मूल्य सिद्धांत असे म्हणतात.
प्र. ६. सविस्तर उत्तरे लिहा :
१) सूक्ष्म अर्थशास्त्रचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर :- 1) एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते? :- यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात
बाजारपेठेत एखादा ग्राहक व एखादा उत्पादक आपल्या मागणी व पुरवठ्यात बदल करून कसा
वागतो ? याचा अभ्यास करून बाजारपेठेत एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ? या सर्व
घटकांचा अभ्यास समजून येतो.
2) उत्पादक
घटकांची किंमत कशी ठरते? :- कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल
आणि संयोजक हे चार उत्पादनाचे घटक आवश्यक असतात त्यांचा अभ्यास व या उत्पादन
घटकांचे मोबदले अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा ही किंमत कशी ठरते याचा
स्वतंत्रपणे अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात समजून येतो.
3)
आर्थिक कल्याणाचा अभ्यास :- देशातील साधनसामग्रीचे योग्य व कार्यक्षम वाटप
झाल्यास संपूर्ण समाजाला फायदा होऊन सर्वांचे आर्थिक कल्याण होते यासाठी सूक्ष्म
अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाचा म्हणजेच आर्थिक कार्यक्षमता यांचा अभ्यास समजून येतो.
अ) उत्पादनातील कार्यक्षमता – म्हणजेच उद्योगात
साधनसामुग्रीचा योग्य वापर करून कमी किमतीत जास्तीत जास्त उत्पादन करणे.
ब) उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता – देशात
उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे समाजातील सर्व लोकांमध्ये योग्य वाटप करून
सर्वांचे कल्याण करणे.
क) एकूण आर्थिक कार्यक्षमता – यांमध्ये लोकांना
प्रामुख्याने आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणे.
अशाप्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र प्रामुख्याने
किंमत सिद्धांत व आर्थिक कल्याण याचा अभ्यास करण्यासाठी होतो.
2) 2)स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट
करा.
उत्तरासाठी व नोट्ससाठी
पुढील लिंक क्लिक करा 👇
=====================================
माझ्या अर्थशास्त्र विषयावरील पुढील युट्युब चॅनल लिंक क्लिक करून आवश्यक भेट द्या
👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
धन्यवाद बनसोडे सर व्ही एस
======================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know