प्रश्न. :- मागणी म्हणजे काय ?
प्रश्न. :- मागणी म्हणजे केवळ इच्छा नव्हे स्पष्ट करा.
उत्तर :-
प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मागणी याचा अर्थ एखाद्या वस्तूची इच्छा कसा घेतला जातो मात्र अर्थशास्त्रामध्ये इच्छा म्हणजे मागणी नाही. तर अर्थशास्त्रात मागणी ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी पुढील तीन अटी पूर्ण होणे आवश्यक असते.
1) वस्तू खरेदीची इच्छा. +
2) वस्तूच्याकिमती एवढे पैशाचे पाठबळ +
3) पैसा खर्चाची तयारी . याला मागणी म्हणतात.
या पद्धतीने प्रत्यक्षात पैसे खर्च करून ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यास त्याला मागणी असे म्हणतात उदा. आपल्याला पेन खरेदी ची इच्छा झाली व पेनच्या किमती एवढे पैसे दहा रुपये दुकानदाराला देऊन प्रत्यक्षात पेन खरेदी केल्यास त्याला मागणी असे म्हणतात. त्यामुळेच
प्रा. मेअर्स यांच्या मते, " एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात."
यावरून केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे हे आपणास स्पष्ट करता येते.....
प्रश्न :- मागणीचे प्रकार
उत्तर :- मागणीचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात.
1 ) प्रत्यक्ष मागणी :-
प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करतो अशा वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी समजली जाते.
उदा. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न , वस्त्र, निवारा, शिक्षण ,औषधे, प्रवास, पेन ,वही ,पुस्तक, घड्याळ अशा अनेक उपभोग्य वस्तूंची मागणी करत असतो याला प्रत्यक्ष मागणी म्हणतात.
2) अप्रत्यक्ष मागणी ( परोक्ष मागणी ) :-
ग्राहकांना लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी ज्या उत्पादक घटकांची मागणी केली जाते त्याला अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी म्हणतात.
उदा. ग्राहकांना लागणारे कापड, साखर इ. वस्तूंची मागणी वाढल्यास त्या वस्तू तयार करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल ,आणि संयोजक या चार उत्पादक घटकांची मागणी वाढवली जाते. त्यामुळे या चार उत्पादक घटकांची मागणी अप्रत्यक्ष समजली जाते.
3) संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी :-
ज्यावेळेस एक गरज पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा जास्त वस्तूंची एकत्रित खरेदी करावी लागते तेव्हा अशा सर्व वस्तूंच्या मागणीस संयुक्त किंवा पूरक मागणी म्हणतात.
उदा. स्कूटर व पेट्रोल तसेच पेन व शाई या प्रकारच्या एक गरज पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीस संयुक्त किंवा पूरक मागणे आणतात.
4 ) संमिश्र मागणी :-
ज्या वेळेस एखाद्या वस्तूचा वापर अनेक उपयोगासाठी केला जातो तेव्हा अशा वस्तूच्या मागणीस संमिश्र मागणी म्हणतात.
उदा. वीज, दगडी कोळसा ,कॉम्प्युटर इ. वस्तूंचा अनेक व्यवसायात अनेक उपयोगासाठी केला जातो त्यांची मागणी संमिश्र समजली जाते..
5 ) स्पर्धात्मक मागणी :-
ज्या वस्तू एकमेकांना पर्याय असतात त्यांची मागणी स्पर्धात्मक असते
उदा. चहा आणि कॉफी तसेच साखर व गूळ या एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत त्यांची मागणी स्पर्धात्मक असते.
मागणी म्हणजे काय ? व मागणीचे प्रकार याविषयी
माझा यू ट्यूब व्हिडिओची लिंक 👇
Thanks
From Bansode Sir V S
Subject- Economics.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know