दारिद्र्य म्हणजे काय ? बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय ? दारिद्र्य रेषा म्हणजे काय ? सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य यांच्यातील फरक कोणता ? भारतातील दारिद्र्याची कारणे कोणती ? दारिद्र्य म्हणजे काय? 1) भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दररोज सरासरी 2250 कॅलरी उष्मांकाची आवश्यकता असते. ज्या व्यक्तीला हे उष्मांक देणारे अन्न मिळवण्याची क्षमता किंवा पात्रता नसते त्याला दारिद्र्याखालील म्हटले जाते. 2) भारतात ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज 2400 कॅलरी उष्मांक व शहरी भागात 2100 कॅलरी उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते ज्या व्यक्तीला कमीत कमी हे अन्न किंवा उष्मांक मिळवण्याची क्षमता नसते त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते. 3) त्यानुसार योग्य जीवन जगण्यासाठी व्यक्तीला आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे, करमणूक या मुलभूत गरजाही पुर्ण करण्याची व्यक्तीची क्षमता नसल्यास त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते. • Bansodesirvs.blogspot.com ====================================== बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? भारतासारख्या देशांमध्ये लोकांमध्ये बहुआयामी दारिद्र्य दिसून येते. बहुआयामी दारिद्र्यात ल...
Dear All, Welcome To My BLOG