मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक व संकल्पनात्मक अडचणी कोणत्या ? Difficulties in calculating national income

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी :-  अ) तात्विक अडचणी व  ब) व्यावहारिक अडचणी एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या अनेक अडचणींची पुढील दोन भागात विभागणी करता येते. अ) तात्विक अडचणी ब) व्यावहारिक अडचणी अ) तात्विक अडचणी :- यालाच संकल्पनात्मक अडचणी असेही म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक तात्विक अडचणी येतात त्या पुढीलप्रमाणे. 1)विनामूल्य सेवा :- पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्यामुळे आनंद मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदाहरणार्थ छंद म्हणून व्यक्तीने काढलेली चित्रे, आईने मुलांसाठी केलेल्या सेवा, शिक्षकाने स्वतःच्या मुलाला केलेले मार्गदर्शन इ. मोबदला दिला जात नाही यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाणार नाही. 2) हस्तांतरित देणी :- कोणतेही काम न करता मिळालेले हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदा. निवृत्तीवेतन, बेकार भत्ता, वडिलांकडून मुलाला मिळालेले उत्पन्न इ. 3) परकीय कंपन्यांना मिळालेले उत्पन्न :- आंतरराष्ट्री...