घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !
प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा
# सिद्धांताची गृहिते # सिद्धांताचे अपवाद
# सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा
#किंवा र्हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा
उत्तर:-
घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे .
# सिद्धांताची व्याख्या :-
डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.
वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते.
@ तक्ता आणि स्पष्टीकरण :-
# आकृतीने स्पष्टीकरण :-
अशाप्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत याची व्याख्या, तक्ता व आकृती वरील प्रमाणे स्पष्ट करता येतो
#घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते :-
हा सिद्धांत खरा टाकण्यासाठी मार्शल यांनी सिद्धांतात पुढील परिस्थिती स्थिर किंवा गृहिते मांडलेली आहेत
1) विवेकशीलता:-
म्हणजेच व्यक्तीला एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट आहे हे समजणे म्हणजे विवेकशील होय व्यक्ती सर्वसामान्य असली पाहिजे. व्यसनी वेड्या लोकांना हा सिद्धांत दिसून येत नाही.
2) उपयोगितेचे संख्यात्मक मापन:-
सिद्धांतात वस्तू पासून मिळणारी उपयोगिता संख्येत मोजता येते असे गृहीत धरले आहे.
3) वस्तूचा एकजिनसीपणा:-
सिद्धांतात सर्व वस्तू म्हणजेच सर्व पेरू रंग ,रूप, आकार, चव इ.बाबत एकजिनसी किंवा समान आहेत असे गृहीत धरले आहे.
4) वस्तूच्या उपभोगात सातत्य असावे:-
म्हणजेच एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे घेतला पाहिजे उदा. सर्व पेरू क्रमाने खावेत त्यात खंड नसावा
5) वस्तूच आकार योग्य असावा तो फार लहान किंवा मोठा असू नये.
6) व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, उत्पन्न ,सवयी, आवडनिवडी ,स्थिर असावे.
7) वस्तू विभाज्यता असावी :- मोठ्या वस्तूचे लहान भागात विभाजन करता येते
8) एकच गरज पूर्ण करण्यासाठी व्यक्ती एका वस्तूचा वापर करतो
9) पैशाची सीमांत उपयोगिता किंवा मूल्य स्थिर असते
अशाप्रकारे हा सिद्धांत खरा खाण्यासाठी वरील गृहिते मांडण्यात आली,
#घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद :-
या सिद्धांताला पुढील घटक अपवाद सांगितले जातात मात्र ते अपवाद नसून त्यांनाही सिद्धांत दिसून येतो हे स्पष्ट करता येते
1) दुर्मिळ वस्तू नाणी व चित्रे:-
दुर्मिळ वस्तू दुर्मिळ नाणी दुर्मिळ चित्रे तिकिटे जमा करण्याचा छंद याला सिद्धांत दिसून येत नाही कारण अशा व्यक्तीला या दुर्मिळ वस्तूंचा साठा वाढत गेल्यास त्याचा आनंद सीमान्त एकदा वाढत जाते
मात्र या ठिकाणी वस्तूचा एकसारखेपणा गृहीत धरल्यास एकच दुर्मिळ चित्र एकच नाणी एकच मूर्ती त्याला मिळत गेल्यास उपयोगिता कमी होऊन सिद्धांत दिसून येतो
2) मादक वस्तू:-
व्यसनी व्यक्तीला मादक वस्तू सिगारेट तंबाखू मिळत गेल्यास त्याची उपयोगिता वाढत जाते व सिद्धांत दिसून येत नाही मात्र हा आभास आहे सिद्धांतातील विवेकशीलता गृहीत धरल्यास मादक पोस्टमुळे व्यसनी व्यक्तीला चांगले वाईट कळत नाही अशा लोकांचा सिद्धांत विचार करत नाही..
3) वाचन तसेच संगीत :-
दुकान चे वाचन करणे तसेच संगीत शिकणे हा छंद असणाऱ्या व्यक्तीला विविध पुस्तके व विविध संगीत मिळाल्यास त्याची उपयोग घेता वाढत जाते यांना सिद्धांत दिसून येत नाही मात्र सिद्धांतातील वस्तूचा एकसारखेपणा गृहीत धरल्यास एकच संगीत एकच पुस्तक वाचण्यासाठी दिल्यास त्याचा कंटाळा येऊन सिद्धांत दिसून येतो.
4) सत्ता :-
व्यक्तीला सत्ता मिळत जाते तशी तो आणखी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो याला सिद्धांत दिसून येत नाही मात्र सिद्धांतातील गृहीतक विवेकशीलता या ठिकाणी दिसून येत नाही शेवटी व्यक्तीलाही सत्तेचा कंटाळा येतोच
5) कंजूष व्यक्ती :-
कंजूष व्यक्ती प्रत्येक वस्तू कमी किमतीत खरेदी करून जास्त उपयोगिता मिळवतो त्यामुळे अशा व्यक्तीला सिद्धांत दिसत नाही असे म्हटले जाते मात्र याठिकाणी सिद्धांतातील गृहीत विवेकशीलता याचे उल्लंघन दिसते तसेच अशा व्यक्तीला दुसऱ्याने कमी किमतीला वस्तू खरेदी केलेली आहे असे सांगितल्यास त्याच्या जवळील वस्तूची उपयोगिता त्याला कमी जाणवते व सिद्धांत दिसतोच.
6) पैसा :- व्यक्ती जवळील पैशाच्या साठा वाढत असताना तो आणखी वाढवा असे व्यक्तीला वाटते म्हणजेच पैशाची सीमांत उपयोगिता वाढत जाते व पैशाला सिद्धांत दिसत नाही असे म्हटले जाते मात्र हे चुकीचे असून पैशाचा साठा वाढल्यानंतर पैशाचे महत्त्व किंवा उपयोगिता कमी होते व सिद्धांत दिसून येतो उदा व्यक्ती गरीब असताना 50रूपयात सीमांत उपयोगिता जास्त जाणवते मात्र तोच व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतर याच 50रुपयात उपयोगिता जाणवत नाही म्हणजेच गरिबांना पैशात सीमांत उपयोगिता जास्त जाणवते तर श्रीमंत व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता कमी जाणवते व सिद्धांत दिसतो मात्र या ठिकाणी इतर वस्तूंप्रमाणे पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही..
अशाप्रकारे या सिद्धांताला वरील घटक अपवाद सांगितले जातात मात्र ते अपवाद नसून त्यांनाही सिद्धांत दिसून येतो हे स्पष्ट करता येते..
प्रश्न :-घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका केव्हा मर्यादा.
उत्तर :-
या सिद्धांतावर प्रामुख्याने पुढील टीका केल्या जातात
1) अवास्तव गृहिते :- हा सिद्धांत अनेक गृहीतकांवर आधारित आहे प्रत्यक्ष व्यवहारात या अटी पूर्ण करणे अशक्य आहे.
2) उपयोगितेची संख्यात्मक मापन चुकीचे आहे :-
कारण वस्तु पासून मिळणारी उपयोगिता ही मानसिक संकल्पना आहे ती जाणवते मात्र संख्येत मोजता येत नाही.
3) अविभाज्य मोठ्या वस्तूंना हा सिद्धांत दिसून येत नाही :-
उदा. टीव्ही रेफ्रिजरेटर गाडी अशी वस्तू एकच खरेदी केली जाते यांचा साठा केला जात नाही
4) पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते हे गृहीत चुकीचे आहे
कारण वस्तूची किंमत पैशाचे मूल्य सतत बदलत असते
5) एकाच वस्तूचा किंवा गरजेचा अभ्यास चुकीचा आहे
प्रत्यक्ष व्यवहारात व्यक्ती एकाच वेळी अनेक वस्तूंची खरेदी करीत असतो अशा वेळी उपयोगीतेत काय फरक पडतो याचा अभ्यास या सिद्धांतात केला जात नाही
प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे महत्व
उत्तर :-
हा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहक, उत्पादक, सरकार यांना खूपच उपयोगी पडतो ते पुढीलप्रमाणे
1) ग्राहकांना उपयुक्त:-
ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी ज्या ठिकाणी त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता व त्या वस्तूची किंमत समान होते तिथे खरेदी थांबवावी याचे मार्गदर्शन या सिद्धांत वरून ग्राहकांना मिळते
2) सरकार अर्थमंत्र्यांना उपयुक्त :-
कर आकारणी करणे किंमत ठरविणे व्यापाराचे धोरण वस्तूंचे उत्पादन तसेच सरकारी योजना ठरवताना हा सिद्धांत उपयोगी पडतो. उदा. गरीब लोकांना पैशात सीमांत उपयोगिता जास्त असते तर श्रीमंतांना पैशातील उपयोगिता कमी असते त्यामुळे गरिबापेक्षा श्रीमंतांवर जास्त कर आकारावा याचे मार्गदर्शन या सिद्धांतावरून मिळते.
3) उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दिसून येतो
या सिद्धांतात वस्तूचा साठा वाढल्यास उपयोगीता महत्व कमी होते हे दिसते यावरून पाणी हवा सूर्यप्रकाश यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त असले तरी ते दुर्मिळ नसल्यामुळे विनिमय मूल्य कमी आहे याउलट सोने हिरे यामध्ये उपयोगिता मूल्य कमी असले तरी दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त आहे हा फरक या सिद्धांतावरून दिसून येते
4) मागणीच्या सिद्धांताचा आधार :-
मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर आधारित आहे मागणीचा सिद्धांत किंमत कमी झाल्यास उपयोगिता वाढल्यामुळे ग्राहक मागणी वाढवतो व किंमत वाढल्यास उपयोगिता कमी झाल्याने ग्राहक मागणी कमी करतो म्हणजेच किंमत बदलल्यानंतर उपयोगिता बदलून मागणी बदलते हे या सिद्धांतावरून स्पष्ट होते.
5)उत्पादकांना उपयुक्त :-
वस्तूचे उत्पादन, साठा जास्त झाल्यास उपयोगीता कमी होऊन नुकसान होऊ शकते त्यामुळे उत्पादन तसेच किंमत ठरवण्यासाठी उत्पादकाला हा सिद्धांत उपयोगी पडतो.
अशाप्रकारे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडतो.
महत्वाचे प्रश्न :-
1)घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा . व सिद्धांताची गृहीते कोणती?
2)घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद स्पष्ट करा .
3)घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व स्पष्ट करा .
4)घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे मर्यादा किंवा टीका .
5)मागणीच्या सिद्धांताचा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आधार आहे स्पष्ट करा
6)ग्राहक किंवा उपभोग त्याचा समतोल ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता व किंमत समान होते त्या ठिकाणी होतो .
7)गरीब लोकांना पैशात सीमांत उपयोगिता जास्त असते तर श्रीमंत लोकांना पैशाची सीमांत उपयोगिता कमी होते मात्र पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही त्यामुळे गरिबांना कमी कर व श्रीमंतांना जास्त कर आकारला जातो.
वरील घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत त्याची गृहिते , अपवाद , महत्व या घटकांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या युट्यूब व्हिडिओ च्या पुढील लिंक वर क्लिक करा 👇
To join my Telegram Channel 👇
धन्यवाद
बनसोडे सर व्ही एस
विषय अर्थशास्त्र.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know