✓सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ ,व्याख्या:-.( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र) (Micro ECONOMICS)
✓सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत Micro Economics म्हणतात.
यातील Micro हा शब्द ग्रीक भाषेतील Mikros या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ लहान भाग किंवा दशलक्षवा भाग असा होतो यावरून
सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या अंशाचा अभ्यास केला जातो
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पुढील व्याख्या सांगता येतात. १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.”
२) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,
विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय".
३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे, अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती ,कुटुंबे , उपभोकता व उत्पादनसंस्था उत्पादकाच्या रूपाने, अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे सूक्ष्मदर्शकातून पाहते.”
४) यावरून- सूक्ष्मअर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक व्यक्ती, एक कूटूंब, वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यांसारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो.
.......................महत्वाचे प्रश्न:- .....................
१)सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ ,व्याख्या:-
( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र)
(Micro ECONOMICS)
२)सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत ((Micro Economics ))म्हणतात.
3) Micro हा शब्द ग्रीक भाषेतील Mikros या शब्दापासून आलेला आहे .
४) सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील ((एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या अंशाचा ))अभ्यास केला जातो 5)सूक्ष्मअर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या( लहान )भागाशी संबंधित आहे
6)सूक्ष्म अर्थशास्त्रात ((एक व्यक्ती, एक कूटूंब, वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यांसारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा )अभ्यास केला जातो.
7) अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो -----------(चूक)............
सूक्ष्म अर्थशास्त्र चा अर्थ व व्याख्या या विषयावरील माझ्या युट्युब व्हिडीओ चे लिंक पुढे दिलेली आहे. 👇
To join my Telegram Channel Link👇 👉 https://t.me/Economicsvsb
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know