मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार ! मागणीची उत्पन्न लवचिकता ! मागणीची छेदक लवचिकता ! मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार !
मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अर्थशास्त्रात सर्वप्रथम डॉ. मार्शल यांनी मांडली. मागणीचा सिद्धांत मांडल्यानतर त्यावर आधारित ही संकल्पना त्यांनी मांडली.
प्रश्न :- मागणीच्या लवचिकतेची व्याख्या:-
वस्तूची किंमत ,लोकांचे उत्पन्न , तसेच इतर वस्तूंची किंमत बदलल्यानंतर एखाद्या वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्यानुसार एखाद्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात बदलत असल्यास जास्त लवचिक मागणी व कमी प्रमाणात बदल्यात असल्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात.
प्रश्न :-मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :-
मागणीच्या लवचिकतेचे पुढील तीन प्रकार पडतात
1) उत्पन्न लवचिकता :-
लोकांचे उत्पन्न बदलल्यानंतर त्यांच्याकडून वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असे म्हणतात.
उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते
मागणीतील शेकडा बदल
उत्पन्न लवचिकता=----------------------------
उत्पन्नातील शेकडा बदल
वरील सूत्रानुसार
अ) धनात्मक उत्पन्न लवचिकता:-
उत्पन्न वाढीबरोबर वस्तूच्या मागणीतही जास्त प्रमाणात वाढ होत असल्यास त्याला धन उत्पन्न लवचिकता म्हणतात.
उदा. उत्पन्न वाढले व कापडाची मागणी वाढली.
ब) ऋणात्मक उत्पन्न लवचिकता:-
उत्पन्न वाढल्यानंतरही वस्तूची मागणी वाढत नसल्यास त्याला ऋण उत्पन्न लवचिकता म्हणतात
उदा. उत्पन्न वाढल्यानंतरही गरीब लोक कनिष्ठ प्रतीची वस्तू म्हणजेच गिफेनच्या वस्तू मका, बाजारी, पाव यांची मागणी वाढवत नाहीत. ऋण उत्पन्न परिणाम दिसतो.
क) शून्य उत्पन्न लवचिकता :-
उत्पन्न वाढले तरी मागणीत फारसा बदल होत नाही .
उदा. जीवनावश्यक वस्तूंची मागणी उत्पन्न वाढली तरी फारशी बदलत नाही शून्य उत्पन्न परिणाम दिसतो.
************"*******************
. 2) छेदक लवचिकता :-
अन्य किंवा दुसऱ्या वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे एखाद्या वस्तूच्या ( पूरक व पर्यायी वस्तूच्या) मागणीत बदल घडून येत असल्यास त्याला छेदक लवचिकता म्हणतात. छेदक लवचिकता पुढील सूत्राने मोजली जाते
अ वस्तूच्या(मूळ वस्तूच्या) मागणीतील शेकडा बदल
मागणीतील छेदक लवचिकता=-------------------
ब वस्तूच्या (अन्य वस्तूंच्या)
किमतीतील शेकडा बद्दल
वरील सूत्रानुसार :-
अ) धनात्मक छेदक लवचिकता :-
पर्यायी वस्तू उदा. चहा व कॉफी यासारख्या वस्तूंना लागू पडते.
ब) ऋणात्मक छेदक लवचिकता :-
पूरक वस्तू उदा. स्कूटर व पेट्रोल किंवा चहा व साखर यासारख्या वस्तूंना लागू पडतो.
क) शून्य छेदक लवचिकता :-
असंबंधित वस्तू उदा. चहा व पेन अशा संबंध नसणाऱ्या वस्तूंना लागू पडतो.
*********************************
3) मागणीतील किंमत लवचिकता :-
वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत शेकडा किती प्रमाणात बदल होतो ? याला मागणीतील किंमत लवचिकता म्हणतात.
किंमत लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते :-
मागणीतील शेकडा बद्दल(%∆D)
मागणीची किंमत लवचिकता=-------------------
किमतीतील शेकडा बदल (%∆P)
वरील सूत्रानुसार किमतीतील बदल व वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण मोजून मागणीतील किंमत लवचिकता मोजली जाते.
अशाप्रकारे मागणीच्या लवचिकतेचे वरील तीन प्रकार पडतात.
********************************************************************************************
प्रश्न:- मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आकृतीसह स्पष्ट करा.
उत्तर :- मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-
1) संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी :-
वस्तूच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसताना एखाद्या वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्यास अशा वस्तूची मागणी संपूर्ण लवचिक समजले असते.
मागणीतील लवचिकता = अनंत
संपूर्ण अलवचिक मागणी काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.
आकृतीने स्पष्टीकरण :-
2) संपूर्ण अलवचिक मागणी :-(Ed=0)
वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला तरी त्या वस्तूच्या मागणीत कोणताच बदल होत नसल्यास अशा वस्तूंची मागणी संपूर्ण अलवचिक समजली जाते.
उदा. चैनीच्या वस्तू, कापड, टीव्ही, रेफ्रिजरेटर, टिकाऊ वस्तु इ.
याठिकाणी मागणीची लवचिकता शून्य (००)येते.
#आकृतीने स्पष्टीकरण:-
वरील आकृतीत वस्तूूची किंमत 'अक' वरून 'अक1' इतकी कमी झाली किंवा 'अक2' इतकी वााढली तरी 'अक्ष्' अक्षावरील 'अम' ही वस्तूचीी मागणी बदलत नाही,
त्यामुळेच वरील आकृतीत 'मम' हा 'संपूर्ण अलवचिक माागणी दाखवणारा वक्र 'अय' अक्षाला समांतर येेेेतो.
3) एकक लवचिक मागणी :- {किंमत=मागणी}Ed=1
एखाद्या वस्तूच्या किंमतीत ज्या प्रमाणात बदल होतो त्याच प्रमाणात वस्तूच्या मागणीतही बदल होत असल्यास अशा वस्तूंची मागणी एक लवचिक समजली जाते. ते पुढील सूत्र व उदाहरणाने स्पष्ट करता येते
किमतीत 50 टक्के बदल झाल्यामुळेे मागणीतही 50 टक्के बदल झालाा.
याठिकाणी मागणीची लवचिकतेचे उत्तर एक येतेे.Ed=1
#आकृतीने स्पष्टीकरण :-
वरील आकृतीत 'अय' अक्षावरील वस्तूच्या किंमतीत ज्या प्रमाणात बदल होतो त्याच प्रमाणात 'अक्ष' अक्षावरील वस्तूच्या मागणीतही बदल होत आहे याला एक लवचिक मागणी म्हणतात.
4) जास्त लवचिक मागणी:-{किंमत<मागणी}
ज्या वेळेस वस्तूच्या किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असल्यास अशा वस्तूची मागणी लवचिक केव्हा जास्त लवचिक समजली जाते
याठिकाणी मागणीच्या लवचिकतेचे उत्तर एक पेक्षा जास्त येते. Ed>1
उदा. चैनीच्या वस्तू, कापड, टीव्ही, रेफ्रिजरेटर, टिकाऊ वस्तु इ
#आकृतीने स्पष्टीकरण :-
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमतीतील बदलापेक्षा 'अक्ष' अक्षा्वरील मागणीत होणाऱ्या बदलाचेेे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा वस्तूची मागणी लवचिक समजली जाते.
5) कमी लवचिक मागणी. :-{किंमत>मागणी}
ज्यावेळेस वस्तूंच्या किमतीतील बदला पेक्षा वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असल्यास अशा वस्तूंची मागणी अलवचिक, ताठर किंवा कमी लवचिक समजली जाते.
या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेचे उत्तर एक पेक्षा कमी येते.Ed<1
उदा. मीठ, जीवनावश्यक वस्तू, नाशवंत वस्तू , टाचणी, मेणबत्ती, काडीपेटी इत्यादी कमी किमतीच्या वस्तू
#आकृतीने स्पष्टीकरण:-
वरील आकृतीत'अय'अक्षावरील वस्तूंच्या किमतीतील बदला पेक्षा 'अक्ष' अक्षावरील वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचेेे प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा वस्तूंची मागणीअलवचिक किंवा कमी लवचिक समजली जातेे.
या ठिकाणी मागणी वक्र तीव्र उताराचा येेतो.
अशाप्रकारे मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार तसेच मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार स्पष्ट करता येतात.
****************************************************************************************
# माझ्या अर्थशास्त्राच्या युट्युब व्हिडिओ चॅनलची लिंक पुढे दिलेली आहे त्यावर क्लिक करून माझ्या चैनलला अवश्य भेट द्या. 👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
धन्यवाद
From Bansode Sir V. S. ECONOMICS
******************************************************************************************/p>
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know