स्थूल अर्थशास्त्र वैशिष्ट्ये कोणती? ! समग्रलक्षी अर्थशास्त्र वैशिष्ट्ये ! Features of Macro Economics
✓स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये:-
( समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र)
(Macro ECONOMICS)
स्थूल समग्रलक्षी अर्थशास्त्राची आपणास पुढील वैशिष्टे सांगता येतात. 👇
1)स्थूल अर्थशास्त्रात समग्र व मोठ्या घटकाचा अभ्यास :-
समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो
२) राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार सिद्धांत असेही म्हणतात:-
स्थूल अर्थशास्त्रात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सर्व घटक, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धती, उत्पन्नात अनेक कारणांमुळे होणारे चढ- उतार, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी याबरोबरच यातून देशात निर्माण होणारा एकूण रोजगार व त्यातील बदल अभ्यासला जातो त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत असेही म्हणतात
3) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा अभ्यास केला जातो :-
देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांमधील समतोल अभ्यास करणे याला सर्वसाधारण समतोल विश्लेषण किंवा अभ्यास म्हणतात स्थूल अर्थशास्त्रात देशातील सर्व ग्राहकांची एकूण मागणी व सर्व उत्पादकांचा एकूण पुरवठा यांच्या समतोलातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे तसेच एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न ,एकूण उत्पादन खर्च, एकूण गुंतवणूक अशा सर्व मोठ्या घटकांचा सर्वसाधारण समतोल कसा साधला जातो? याचा अभ्यास केला जातो
4) सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास :-
देशात एका वर्षांमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची सरासरी किंमत पातळी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. स्थूल अर्थशास्त्रात अशा प्रकारे देशातील सर्व वस्तूंची सर्वसाधारण किंमत पातळी किती आहे, त्यातील बदल, तेजी-मंदी याचा अभ्यास केला जातो
5) परस्परावलंबन किंवा संपूर्ण साखळीचा ,समुच्ययाचा अभ्यास :-
स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार ,एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक व यातून देशाचा होणारा आर्थिक विकास अशा एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या समुच्चय किंवा साखळीचा अभ्यास केला जातो
6) राशी पद्धतीचा वापर :-
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करणे म्हणजे राशी पद्धती होय यामध्ये एका घटकांचा अभ्यास होत नाही.प्रा. बोर्डिंग यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जंगल म्हणजेच सर्व झाडांचा समुच्चय त्याचा अभ्यास याप्रकारे स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेत एकमेकांवरअवलंबून असणाऱ्या सर्व घटकांचा राशीचा व साखळीचा अभ्यास केला जातो
7) आर्थिक वृद्धीची प्रारूपे उपयुक्त : -
स्थूल अर्थशास्त्रात देशाच्या आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो व त्यातून आर्थिक वृद्धी व विकासाची अनेक प्रारूपे सिद्धांत डावपेच धोरणे तयार करण्यात येतात त्यामुळे भारतासारख्या विकसनशील तसेच इतर मागासलेल्या देशात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासासाठी स्थूल अर्थशास्त्रातील ही प्रारूपे उपयोगी पडतात.
८) धोरणाभिमुख :-
लॉर्ड केन्स यांच्या मते ,"स्थूल अर्थशास्त्र हे देशातील मोठ्या आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे" उदा. भाववाढ नियंत्रण, मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढणे, रोजगार निर्मिती इत्यादी
9) सिद्धांतात गृहिते नसतात :-
स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील सर्वच मोठ्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून सिद्धांत मांडले जातात त्यामुळे हे सिद्धांत खरे ठरण्यासाठी गृहिते मांडण्याची आवश्यकता नसते . उद्या. केन्स यांनी मांडलेले उत्पन्न, उत्पादन तसेच रोजगार विषयक सिद्धांतात गृहीते नाहीत.
10) एकूण विश्लेषण हा पाया आहे :-
स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील सर्व मोठ्या एकूण घटकांचा म्हणजेच एकूण मागणी, एकूण पुरवठा ,एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक अशा सर्व एकूण घटकांचा अभ्यास केला जातो त्यामुळे एकूण विश्लेषण पद्धती हा स्थूल अर्थशास्त्राचा पाया आहे
11) स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात :-
1929 ते 1933 या कालावधीत आलेल्या जागतिक महामंदी नंतर लॉर्ड केन्स यांनी केलेले आहे. त्यांनी 1936 मध्ये "पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत" हा ग्रंथ लिहिला. डॉ. माल्थस व वाॅलरा यांनीही स्थूल अर्थशास्त्रात भर घातली.
अशाप्रकारे स्थूल अर्थशास्त्राची वरील अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात
.........................महत्वाचे प्रश्न ........................
1)स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये:-.
( समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र)
(Macro ECONOMICS)
2)स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा मोठ्या घटकांचा किंवा समूच्चयाचा अभ्यास होतो स्पष्ट करा.
3) स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा अभ्यास केला जातो स्पष्ट करा
4) सर्वसाधारण समतोल म्हणजे काय?
5)स्थूल अर्थशास्त्राला "उत्पन्न सिद्धांत" व "रोजगार सिद्धांत" असेही म्हणतात स्पष्ट करा:-
6)राशी पद्धती म्हणजे काय?
7)एकुण विश्लेषण पद्धती स्थूल अर्थशास्त्राचा पाया आहे स्पष्ट करा?
8)एकूण विश्लेषण पद्धती म्हणजे काय?
9)स्थूल अर्थशास्त्रात सिद्धांतांमध्ये गृहिते मांडली जात नाहीत स्पष्ट करा
# for these contents click my YouTube video link 👇
To join me on my Telegram Channel Link. 👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know