मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी १८, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकारचे करेतर उत्पन्नाचे मार्ग ! Sources of non-tax revenue for the government

सरकारचे करेतर उत्पन्नाचे मार्ग :- Sources of non-tax revenue for the government :- देशातील सरकारला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराबरोबरच इतर मार्गांनीही उत्पन्न मिळत असते हे करेतर उत्पन्नाचे मार्ग पुढीलप्रमाणे.  ( कर हे सक्तीचे देणे असते तर करेतर उत्पन्न हे सरकारने नागरिकांना दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून उत्पन्न द्यावे लागते.) 1) शुल्क :-  सरकार लोकांना शिक्षण, स्वच्छता, आरोग्य सोयी इत्यादी सेवा पुरविते त्यासाठी प्रत्येक नागरिकाकडून शुल्क वसूल करते.  उदाहरणार्थ :- नोंदणी शुल्क, शैक्षणिक शुल्क इत्यादी. 2) विशेष अधिभार :-  काही भागात नागरिकांना सरकार विशेष सुविधा पुरवते, त्यासाठी जो मोबदला म्हणून त्यांच्याकडून जे उत्पन्न वसूल करते त्याला विशेष अधिभार म्हणतात. उदाहरणार्थ :- रस्ते, ड्रेनेज, पाणी व वीज पुरवठा, स्वच्छता सोयी इत्यादी. 3) विशेष कर :-  सिगारेट, तंबाखू, मद्य व इतर मादक वस्तूंवर सरकार विशेष कर आकारते. या वस्तूंवर कर वाढवून किमती वाढल्यास लोकांनी त्या वस्तू वस्तूंची खरेदी कमी केल्यास लोकांचे हित होईल असा सरकारचा उद्देश असतो. > 4) दंड व दंडात्मक रकमा :- ...

प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर यांच्यातील फरक ! Direct tax and Indirect tax

प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर A) प्रत्यक्ष कर :-   1) सरकारने ज्या व्यक्तीला कर भरण्यासाठी सांगितलेला आहे त्याच व्यक्तीने कर भरला व त्याच्याकडूनच कर वसूल झाल्यास त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. 2) प्रत्यक्ष कर दुसऱ्यावर ढकलता येत नाही.  3) प्रत्यक्ष करात कराघात व कारभार एकाच व्यक्तीवर पडतो.   4) उदाहरणार्थ :- वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर, घरावरील महापालिकेचा कर इत्यादी 5) उदाहरणार्थ :- सुनील यांच्या पाच लाख रुपये उत्पन्नावर सर्व वजावट जाऊन आलेला कर रुपये 10000/- त्यांनाच भरावा लागतो हा प्रत्यक्ष कर आहे. B) अप्रत्यक्ष कर :-  1) सरकारने एखादी व्यक्ती किंवा व्यापारी किंवा उद्योगाला कर भरण्यासाठी सांगितल्यानंतर हा कर तो स्वतः न भरता, दुसऱ्यावर ढकलून किंवा दुसऱ्याकडून वसूल करून हा कर भरतो त्यामुळे याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. 2) अप्रत्यक्ष कर दुसऱ्यावर ढकलता येतो. 3) अप्रत्यक्ष करात A व्यक्तीवर कराघात होतो तर B व्यक्ती कारभार घेतो व कर भरतो. 4) उदाहरणार्थ :- आज भारतातील वस्तू व सेवा कर ( GST ) हा अप्रत्यक्ष कर आहे. 5) उदाहरणार्थ :- वस्तू विक्रीत व्यापा...