मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वाध्याय 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय !12th Economics Chapter 2 Utility Analysis full solved excercise in Marathi ! class12 Economics !

 बारावी अर्थशास्त्र प्रकरण-2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय या माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे.👇 https://youtu.be/SPwuSPpzJXw To join my Telegram Channel Link 👇 👉.    https://t.me/Economicsvsb Thanks Bansode Sir V S Subject- Economics

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !

प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा           # सिद्धांताची गृहिते   #  सिद्धांताचे अपवाद          # सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा        #किंवा र्‍हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा उत्तर :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे . # सिद्धांताची व्याख्या :-  डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.  वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. @ तक्ता आणि स्‍पष्‍टीकरण :- ...

उपयोगिता प्रकार ! Class12 Economics chapter 2 Types of Utility in Marathi ! Total Utility and Marginal Utility ! 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगितेचे प्रकार

   प्रश्न  :- उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा उत्तर:- उपयोगितेचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात 1) रूप किंवा स्वरूप उपयोगिता:- एखाद्या वस्तूचे मूळ जुने रूप बदलून तिला नवीन रूप किंवा स्वरूप दिल्यामुळे त्या वस्तूत जी उपयोगिता निर्माण होते तिला रूप उपयोगिता म्हणतात . उदा. लाकडाचे रूप बदलून त्या पासून खुर्ची ,टेबल, दरवाजा, मूर्ती ,खेळणी तयार करणे तसेच माती पासून विविध भांडी, मूर्ती, खेळणी तयार केल्यास  त्याला रूप उपयोगिता म्हणतात. 2) स्थल उपयोगिता :- एखाद्या वस्तूचे स्थळ बदलले किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात. उदा. जंगलातील लाकडी ओंडके, खनिजे शहरी भागात आणले तसेच समुद्र, नदीकाठची वाळू ,नदीतील मासे शहरी भागात आणल्यास त्या वस्तूला जास्त किंमत मिळते उपयोगिता वाढते याला स्थळ उपयोगिता म्हणतात.  3) काल उपयोगिता :-  काळ बदलल्याने किंवा हंगाम बदलल्याने वस्तूंमध्ये उपयोगिता निर्माण होते तेव्हा त्यास काल उपयोगिता म्हणतात.उदा. पावसाळ्यात रेनकोट, छत्री मध्ये हिवाळ्यात लोकरीचे कपडे तर उन्हाळ्यात...

उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /

प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ? कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय. उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते  त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू,  घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास,  पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता,  तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे,  टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्...

सूक्ष्म अर्थशास्त्र वैशिष्ट्ये कोणती ! Features of Micro Economics

  प्रश्न :- सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये :-  ( व्यष्टि अर्थशास्त्र , अंशलक्षी अर्थशास्त्र  ) Features of Micro Economics उत्तर :-   सूक्ष्म अर्थशास्त्राची  पुढील वैशिष्ट्ये आहेत     १) वैयक्तिक घटकांचा अभ्‍यास :-  "एखाद्या विशिष्ट घटकाचा" अभ्यास म्हणजे  वैयक्तिक चल  किंवा व्यक्तिगत घटक होय सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रा. बोल्डिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती, एखादे कुटुंब ,एक वस्तू, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, एखादा उद्योग, एखादा उत्पादनाचा घटक अशा एखादा लहान घटकांचा, वैयक्तिक चलाचा अभ्यास केला जातो  त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात  व्यक्तिगत, लहान  घटकांचा अभ्यास होतो  असे म्हटले जाते 2)किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणतात  :- सूक्ष्म अर्थशास्त्रात एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ? तसेच उत्पादनाचे चार घटक म्हणजेच भूमीचा- खंड, श्रमिकाचे- वेतन, भांडवलाचे- व्याज व संयोजकांचा मोबदला किंवा किंमत नफा कसा ठरतो याचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किं...

सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक ! Diffference between Micro and Macro Economics

सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक व्यष्टि अर्थशास्त्र व समष्टी अर्थशास्त्र फरक अंशलक्षी अर्थशास्त्र व सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र फरक Micro Economics and Macro Economics सूक्ष्म अर्थशास्त्र  किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा व्यष्टि अर्थशास्त्र Micro Economics ✓सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या :-     १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्‍थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्‍हणजे सूक्ष्म अर्थशास्‍त्र होय.”       २) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,  विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय". ३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्‍त्राद्‌वारे, अर्थव्यवस्‍थेकडे सूक्ष्म दर्शकाद्‌वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्‍थारूपी शरीरातील लाखो पेशी म्‍हणजे व्यक्‍ती ,कुटुंबे , उपभोकता व उत्‍पादनसंस्‍था उत्‍पादकाच्या रूपाने, अर्थव्यवस्‍थेत कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्‍यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्‍त्र या पेशींकडे  सूक्ष्मदर्शकातून पाहते.”       ...

स्थूल अर्थशास्त्र वैशिष्ट्ये कोणती? ! समग्रलक्षी अर्थशास्त्र वैशिष्ट्ये ! Features of Macro Economics

✓स्थूल अर्थशास्‍त्राची वैशिष्ट्ये:- ( समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र)      (Macro ECONOMICS) स्थूल समग्रलक्षी अर्थशास्त्राची आपणास पुढील वैशिष्टे सांगता येतात. 👇 1)स्थूल अर्थशास्त्रात समग्र व मोठ्या घटकाचा अभ्यास :- समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो  २) राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार सिद्धांत असेही म्हणतात:-  स्थूल अर्थशास्त्रात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सर्व घटक, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धती, उत्पन्नात अनेक कारणांमुळे होणारे  चढ- उतार, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी याबरोबरच यातून देशात निर्माण होणारा एकूण रोजगार व त्यातील बदल अभ्यासला जातो त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत असेही म्हणता...

स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ! समग्रलक्षी अर्थशास्त्र व्याख्या ! Meaning and definition of Macro Economics

✓स्थूल अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:-. ( समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र)      (Macro ECONOMICS) ✓स्थूल अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:- ✓स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत  Macro Economics म्हणतात. यातील  Macro हा शब्द ग्रीक भाषेतील  Makros  या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ मोठा भाग असा होतो  यावरून  स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व मोठ्या घटकाचा  अभ्यास केला जातो . स्थूल अर्थशास्त्राच्या  पुढील व्याख्या सांगता येतात.. 1) प्रा. कॅनेथ बोल्डिंग - यांच्या मते- " समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध, वैयक्तिक परिमाणाची नसून एकूण परिणामांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. 2) प्रा. जे. एल. हॅन्सन  यांच्या मते," स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर ...

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? | सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ! definition of Micro Economics

✓सूक्ष्म अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:-.( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र)     (Micro ECONOMICS ) ✓सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत   Micro Economics म्हणतात.  यातील  Micro हा शब्द ग्रीक भाषेतील  Mikros   या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ लहान भाग किंवा दशलक्षवा भाग असा होतो  यावरून   सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या  अंशाचा अभ्यास केला जातो  सूक्ष्म अर्थशास्त्राच्या  पुढील व्याख्या सांगता येतात.       १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्‍थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्‍हणजे सूक्ष्म अर्थशास्‍त्र होय.” २) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,  विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय". ३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्‍त्राद्‌वारे, अर्थव्यवस्‍थेकडे सूक्ष्म दर्शकाद्‌वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्‍थारूपी शरीरातील लाखो पेशी म्‍हणजे व्यक्‍ती ,कुटुंबे , उ...