मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरवठा व साठा यांच्यातील फरक ! वैयक्तिक पुरवठा पत्रक ! बाजार पुरवठा पत्रक  !

प्रश्न :-  पुरवठा म्हणजे काय? !  पुरवठा व साठा फरक !वैयक्तिक पुरवठा पत्रक ! बाजार पुरवठा पत्रक ! श्रम पुरवठा वक्र ================================ प्रश्न :-  पुरवठा म्हणजे काय? किंवा पुरवठा व साठा फरक स्पष्ट करा. उत्तर :- प्रत्यक्ष व्यवहारात एखाद्या वस्तूचा पुरवठा याचा अर्थ त्या वस्तूचा साठा असा घेतला जातो, मात्र अर्थशास्त्रात पुरवठा म्हणजे साठा नसून त्यांच्यात पुढील फरक आहे. 1) व्याख्या :- साठा म्हणजे, "उत्पादकाने एका विशिष्ट वेळी केलेले वस्तूंचे एकूण उत्पादन" म्हणजे साठा होय.  याउलट, पुरवठा म्हणजे, "साठ्यातून जे उत्पादन एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारात विक्रीस आणले जाते" त्याला पुरवठा म्हणतात. 2) उदा. शेतकऱ्यांने एका विशिष्ट वेळी 10 पोती गहू उत्पादन केले त्यास साठा म्हणतात. त्यापैकी 2000 रुपये किंमत असताना 5 पोती गहू प्रत्यक्ष बाजारपेठेत विक्रीस आणले, त्याला पुरवठा म्हणतात.   3) साठा हा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. नाशवंत वस्तूंचा साठा व पुरवठा समान असतो.  उदा. फुले, भाजीपाला, फळे, दूध अंडी, मासे इ. याउलट टिकाऊ वस्तूंचा पुरवठा हा साठा प...