मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते ? बाजार मागणी ठरविणारे घटक ! The Determinants of Demand

 प्रश्न  :-  बाजार मागणी किंवा मागणी  ठरविणारे घटक  किंवा     वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक किंवा    वस्तूची मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते स्पष्ट करा. उत्तर  :-  वस्तूची मागणी ही त्याच्या किमती बरोबरच अनेक घटकांवर अवलंबून असते हे घटक पुढीलप्रमाणे. 1)  वस्तूची किंमत :- कोणत्याही वस्तूची मागणी  ही प्रामुख्याने त्या वस्तूच्या किमती वर अवलंबून असते  ग्राहक किंमत कमी झाल्यास मागणी वाढवतो व किंमत वाढल्यास मागणी कमी करतो हे दिसून येते . 2 ) लोकांचे उत्पन्न  :-  देशातील लोकांचे उत्पन्न जास्त असून हे उत्पन्न वाढत असल्यास खरेदीशक्ती वाढू न वस्तूची मागणे वाढत जाते उत्पन्न कमी असल्यास मागणी कमी होते. 3) पर्यायी वस्तूंची संख्या व त्यांच्या किमती :- साखर आणि गुळ अशा पर्यायी वस्तूंबाबत साखरेपेक्षा गुळाची किमती कमी असल्यास गुळाची मागणी वाढते.   4 ) पूरक वस्तूंच्या किमती :-  एखाद्या वस्तूची मागणी  त्याला आवश्यक असणाऱ्या पूरक वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असते उदा .स्कूटर व पेट्रोल  या पूरक ...