प्रश्न :- मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा
प्रश्न :- मागणीच्या सिद्धांताची गृहीते व अपवाद स्पष्ट करा
उत्तर:-
अर्थशास्त्रात 1890 मध्ये प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत आपल्या
"अर्थशास्त्राची मूलतत्वे " या ग्रंथात मांडला या सिद्धांतात त्यांनी वस्तूची किंमत बदलल्यास ग्राहक आपल्या वस्तूचा मागणीत कसा बदल घडवून आणतो ते स्पष्ट केलेले आहे.
# सिद्धांताची व्याख्या :-
अल्फ्रेड मार्शल यांच्या मते, "इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणीचा संकोच होतो व किंमत कमी झाल्यास मागणीचा विस्तार होतो"
वरील व्याख्येवरून मागणीचा सिद्धांतात लोकांचे उत्पन्न, अपेक्षा ,आवडीनिवडी ,पर्यायी वस्तूची किंमत इत्यादी परिस्थिती स्थिर असताना ग्राहक किंमत वाढल्यास मागणी कमी करतो व किंमत कमी झाल्यास मांडली वाढवतो म्हणजेच किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीतील बदल करतो यावरून किंमत व मागणी यांच्यातील संबंध व्यस्त किंवा परस्परविरोधी असतो हे त्यांनी या सिद्धांतात स्पष्ट केले.
## मागणीपत्रकाने स्पष्टीकरण :-
## आकृतीने स्पष्टीकरण :-
अशाप्रकारे मागणीचा सिद्धांत व्याख्या तक्ता व आकृतीने स्पष्ट करता येतो.
## प्रश्न :- मागणीच्या सिद्धांताची गृहिते
उत्तर :- मागणीचा सिद्धांत खरा ठरण्यासाठी मार्शल यांनी या सिद्धांतात इतर परिस्थिती म्हणजेच पुढील गृहिते स्थिर मांडली.
1) लोकांचे उत्पन्न आर्थिक परिस्थिती स्थिर असावी.
2) देशाची लोकसंख्या व तिची वयोरचना बदलू नये.
3)पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात
उदा .साखर व गूळ यामध्ये साखरेच्या किमती कमी होत असताना गुळाच्या किमती स्थिर राहाव्यात तरच साखरेची मागणी वाढून सिद्धांत दिसतो.
4) पूरक वस्तूंच्या किमती बदलू नये. उदा. स्कूटर व पेट्रोल या ठिकाणी स्कूटर च्या किमती कमी होत असताना पेट्रोलच्या किमती बदलू नयेत.
5) भविष्यात वस्तूच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा असता कामा नये.
6) लोकांच्या आवडीनिवडी ,सवयी ,विचार ,रूढी परंपरा ,फॅशन, जाहिरात बदलू नयेत.
7) सरकारचे कर विषयक धोरण बदलू नये.
अशाप्रकारे मागणीचा सिद्धांत खरा ठरण्यासाठी वरील गृहिते मांडण्यात आली
.
## प्रश्न मागणीच्या सिद्धांताचे अपवाद किंवा टीका किंवा मर्यादा.
उत्तर:-
मागणीचा सिद्धांत प्रामुख्याने पुढील घटकांबाबत दिसून येत नाही यालाच अपवाद म्हणतात ते पुढीलप्रमाणे.
1) जीवनावश्यक वस्तू:-
अन्नधान्य ज्वारी गहू मीठ औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंना मागणीचा सिद्धांत दिसत नाही कारण या वस्तू जीवनावश्यक असल्याने त्यांच्या किमती वाढल्यास त्या खरेदी कराव्याच लागतात त्यांची मागणी कमी होत नाही.
2) सवयीच्या वस्तू:-
चहा, कॉफी, तंबाखू ,सिगारेट ,मादक वस्तू अशा सवयीच्या वस्तूंना मागणीचा सिद्धांत दिसत नाही कारण या वस्तूंच्या किमती वाढण्यास त्यांची मागणी कमी होत नाही सवयीमुळे या वस्तूंची मागणी करावीच लागते..
3) प्रतिष्ठेच्या वस्तू :-
समाजात प्रतिष्ठा मान मिळवण्यासाठी वापरल्या जाणारे हिरे-मोती सोन्या-चांदीचे दागिने जास्त किमतीच्या मोटार गाड्या यांना मागणीचा सिद्धांत दिसत नाही कारण या वस्तूंच्या किमती कमी झाल्यास त्यांची मागणी कमी होते कमी किमतीमुळे समाजातील प्रतिष्ठा कमी होईल असे लोकांना वाटते.
4) पूरक वस्तू :-
एक गरज पूर्ण करण्यासाठी एका पेक्षा जास्त वस्तू लागतात अशा पूरक वस्तूंना मागणीचा सिद्धांत दिसत नाही उदा. स्कूटर व पेट्रोल या पूरक वस्तू बाबत स्कूटर चालवण्यासाठी पेट्रोलचे आवश्यकता असते पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या तरी त्याची मागणी करावीच लागते अशा वस्तूंना सिद्धांत दिसत नाही.
5) लोकांचे अज्ञान रुढी परंपरा व जाहिरातीचा परिणाम :-
यामुळेही वस्तूच्या किंमती जास्त असताना वस्तूची मागणी वाढवली जाते त्यामुळे अज्ञान रूढी परंपरा व जाहिरातीचा परिणाम हा सिद्धांतला अपवाद समजला जातो
6) गिफेन च्या वस्तू :-
इंग्लंडमधील अर्थतज्ञ रॉबर्ट गिफेन यांनी सांगितलेल्या कमी किमतीच्या, हलक्या ,कनिष्ठ प्रतीच्या वस्तूंना मागणीचा सिद्धांत दिसत नाही उदा. पाव ,मका, बाजरी ,मातीची भांडी या वस्तूंच्या किमती कमी झाल्यास गरीब लोक त्यांची मागणी कमी करून शिल्लक राहिलेल्या उत्पन्नातून चांगली वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा वस्तूंना मागणीचा सिद्धांत दिसत नाही हे गिफेन यांनी दाखवून दिले त्यामुळे या वस्तूंना अर्थशास्त्रात गिफेन च्या वस्तू असे म्हणतात व यालाच गिफेन चा विरोधाभास म्हणतात.
अशाप्रकारे मागणीच्या सिद्धांताला वरील अपवाद दिसून येतात.
## मागणीचा सिद्धांत गृहीते व अपवाद या विषयी माझ्या यु ट्यूब च्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे👇
Bansode Sir V S
ECONOMICS
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know