सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक
व्यष्टि अर्थशास्त्र व समष्टी अर्थशास्त्र फरक
अंशलक्षी अर्थशास्त्र व सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र फरक
Micro Economics and Macro Economics
सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा व्यष्टि अर्थशास्त्र Micro Economics
✓सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या :-
१)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.”
२) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,
विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय".
३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे, अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती ,कुटुंबे , उपभोकता व उत्पादनसंस्था उत्पादकाच्या रूपाने, अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे सूक्ष्मदर्शकातून पाहते.”
-: वैशिष्ट्ये :-
१) सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास:-
2)सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असे म्हणतात.
3)विभाजन पद्धत वापरली जाते
4)सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे
5)सूक्ष्म अर्थशास्त्रात एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ?
6)सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे असे म्हटले जाते
7) सीमान्त तत्त्व विश्लेषणाचा वापर :-
8)सिद्धांत विशिष्ट गृहीतकांवर आधारित :-
9) वैयक्तिक आर्थिक कल्याण समजून येते:-
10) व्यक्तिनिष्ठ आहे राष्ट्रव्यापी समस्या आल्यास त्याचा अभ्यास व त्यावरील उपायांसाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी पडत नाही .
यावरून- सूक्ष्मअर्थशास्त्र -अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक व्यक्ती, एक कूटूंब, वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यांसारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो.
bansodesirvs.blogspot.com
स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र Macro Economics
✓स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या:-
1) प्रा. कॅनेथ बोल्डिंग - यांच्या मते- " समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध, वैयक्तिक परिमाणाची नसून एकूण परिणामांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो.
2) प्रा. जे. एल. हॅन्सन
यांच्या मते," स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो.
-: वैशिष्ट्ये :-
1)स्थूल अर्थशास्त्रात समग्र व मोठ्या घटकाचा अभ्यास :-
2)स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत असेही म्हणतात
3) राशी पद्धतीचा वापर :
4) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा अभ्यास केला जातो :-
5) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा अभ्यास केला जातो
6) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा अभ्यास केला जातो :-
7)एकूण विश्लेषण पद्धती हा स्थूल अर्थशास्त्राचा पाया आहे
8)सिद्धांत खरे ठरण्यासाठी गृहिते मांडण्याची आवश्यकता नसते .
9)देशात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासासाठी स्थूल अर्थशास्त्रातील ही प्रारूपे उपयोगी पडतात.
10) राष्ट्रनिष्ठ आहे लॉर्ड केन्स यांच्या मते ,"स्थूल अर्थशास्त्र हे देशातील मोठ्या आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे"
यावरून
समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र:- ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो.
======================================
bansodesirvs.blogspot.com
सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्रातील फरक
अंशलक्षी व समग्रलक्षी ,व्यष्टी व समष्टी अर्थशास्त्र
Micro and Macro Economics Difference
१) सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास:- "एखाद्या विशिष्ट घटकाचा" अभ्यास म्हणजे वैयक्तिक चल किंवा व्यक्तिगत घटक होय सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रा. बोल्डिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती, एखादे कुटुंब ,एक वस्तू, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, एखादा उद्योग, एखादा उत्पादनाचा घटक अशा एखादा लहान घटकांचा, वैयक्तिक चलाचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत, लहान घटकांचा अभ्यास होतो असे म्हटले जाते
1)स्थूल अर्थशास्त्रात समग्र व मोठ्या घटकाचा अभ्यास :-
समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो..
2)किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणतात :-सूक्ष्म अर्थशास्त्रात एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ? तसेच उत्पादनाचे चार घटक म्हणजेच भूमीचा- खंड, श्रमिकाचे- वेतन, भांडवलाचे- व्याज व संयोजकांचा मोबदला किंवा किंमत नफा कसा ठरतो याचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असे म्हणतात.
२) राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार सिद्धांत असेही म्हणतात:-
स्थूल अर्थशास्त्रात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सर्व घटक, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धती, उत्पन्नात अनेक कारणांमुळे होणारे चढ- उतार, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी याबरोबरच यातून देशात निर्माण होणारा एकूण रोजगार व त्यातील बदल अभ्यासला जातो त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत असेही म्हणतात.
3) विभाजन पद्धत :-मोठ्या घटकांचे अनेक लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन करून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो याला विभाजन पद्धत म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विभाजन करून सर्वात लहान घटक एक व्यक्ती त्याचे उत्पन्न त्याची मागणी याचा अभ्यास केला जातो तसेच उत्पादनासाठी चार घटक लागतात त्यांचे विभाजन करून भूमी, श्रम ,भांडवल,संयोजक यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करून विभाजन पद्धत वापरली जाते
3) राशी पद्धतीचा वापर : संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करणे म्हणजे राशी पद्धती होय यामध्ये एका घटकांचा अभ्यास होत नाही. प्रा. बोर्डिंग यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जंगल म्हणजेच सर्व झाडांचा समुच्चय त्याचा अभ्यास याप्रकारे स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेत एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांचा राशीचा व साखळीचा अभ्यास केला जातो.........3
4)सूक्ष्म अर्थशास्त्रात एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ? तसेच उत्पादनाचे चार घटक म्हणजेच भूमीचा- खंड, श्रमिकाचे- वेतन, भांडवलाचे- व्याज व संयोजकांचा मोबदला किंवा किंमत नफा कसा ठरतो याचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असे म्हणतात.
4) सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास :- देशात एका वर्षांमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची सरासरी किंमत पातळी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. स्थूल अर्थशास्त्रात अशा प्रकारे देशातील सर्व वस्तूंची सर्वसाधारण किंमत पातळी किती आहे, त्यातील बदल, तेजी-मंदी याचा अभ्यास केला जातो ..4
5) आंशिक समतोल : समतोल हा दोन घटकांमध्ये होतो.आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिकघटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणेअभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक एक व्यक्ती एक कुटुंब एखादी उत्पादन संस्था एखादी वस्तू अशा लहान घटकाचा अंशाचा समतोल कसा साधला जातो याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे असे म्हटले जाते
5) सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण किंवा अभ्यास केला जातो :-
देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांमधील समतोल अभ्यास करणे याला सर्वसाधारण समतोल विश्लेषण किंवा अभ्यास म्हणतात स्थूल अर्थशास्त्रात देशातील सर्व ग्राहकांची एकूण मागणी व सर्व उत्पादकांचा एकूण पुरवठा यांच्या समतोलातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे तसेच एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न ,एकूण उत्पादन खर्च, एकूण गुंतवणूक अशा सर्व मोठ्या घटकांचा सर्वसाधारण समतोल कसा साधला जातो? याचा अभ्यास केला जातो...........5
6) सीमान्त तत्त्व विश्लेषणाचा वापर :- सीमांत याचा अर्थ वाढवलेला शेवटचा नग असा होतो म्हणजेच वस्तूच्या मागणीत, उपभोगात तसेच उत्पादन व विक्रीत एका नगाने वाढ केल्यास काय फरक पडतो ? याचा अभ्यास करणे यालाच सीमांत विश्लेषण म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र सीमांत तत्वाचा वापर करून अर्थतज्ज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत.
6) एकूण विश्लेषण हा पाया आहे :-स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील सर्व मोठ्या एकूण घटकांचा म्हणजेच एकूण मागणी, एकूण पुरवठा ,एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक अशा सर्व एकूण घटकांचा अभ्यास केला जातो त्यामुळे एकूण विश्लेषण पद्धती हा स्थूल अर्थशास्त्राचा पाया आहे..........6
7)सिद्धांत विशिष्ट गृहीतकांवर आधारित :- सूक्ष्म अर्थशास्त्रात सिद्धांत खरे करण्यासाठी जी परिस्थिती स्थिर मानली जाते तिला गृहिते म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट वैयक्तिक घटकांचा अभ्यास करून सिद्धांत मांडले जातात मात्र ते इतरांना लागू करण्यासाठी गृहिते मांडावी लागतात उदा .इतर परिस्थिती कायम आहे, बाजारात पूर्ण स्पर्धा आहे, पूण रोजगार आहे इत्यादी याला गृहिते म्हणतात.
7) सिद्धांतात गृहिते नसतात :- स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व अर्थव्यवस्थेतील सर्वच मोठ्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून सिद्धांत मांडले जातात त्यामुळे हे सिद्धांत खरे ठरण्यासाठी गृहिते मांडण्याची आवश्यकता नसते . उद्या. केन्स यांनी मांडलेले उत्पन्न, उत्पादन तसेच रोजगार विषयक सिद्धांतात गृहीते नाहीत.
:-........7
8) वैयक्तिक आर्थिक कल्याण समजून येते:- सूक्ष्म अर्थशास्त्र एक व्यक्ती एक कुटुंब एखादा उद्योग एक वस्तू एखादा उत्पादक घटक त्याचे वैयक्तिक उत्पन्न उत्पादन खर्च किंमत निश्चिती व उत्पन्नाचे वाटप याचा अभ्यास करते त्यावरून लोकांचे वैयक्तिक कल्याण समजून येते
8) आर्थिक वृद्धीची प्रारूपे देशासाठी उपयुक्त : - स्थूल अर्थशास्त्रात देशाच्या आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो व त्यातून आर्थिक वृद्धी व विकासाची अनेक प्रारूपे सिद्धांत डावपेच धोरणे तयार करण्यात येतात त्यामुळे भारतासारख्या विकसनशील तसेच इतर मागासलेल्या देशात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासासाठी स्थूल अर्थशास्त्रातील ही प्रारूपे उपयोगी पडतात............... 8
9) मर्यादित व्याप्ती :- सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिनिष्ठ वैयक्तिक लहान घटकांचा अभ्यास करते त्यामुळे संपूर्ण समाज तसेच अर्थव्यवस्थेसमोर तेजी-मंदी, दारिद्र्य, बेकारी, वाढती लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न अशा राष्ट्रव्यापी समस्या आल्यास त्याचा अभ्यास व त्यावरील उपायांसाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी पडत नाही . उदा.1929 ते 1933 मध्ये आलेली जागतिक महामंदी...,..........
9) धोरणाभिमुख :- लॉर्ड केन्स यांच्या मते ,"स्थूल अर्थशास्त्र हे देशातील मोठ्या आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे ते राष्ट्रनिष्ठ आहे" उदा. भाववाढ नियंत्रण, मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढणे, रोजगार निर्मिती इत्यादी.......9
यावरून- सूक्ष्मअर्थशास्त्र -अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक व्यक्ती, एक कूटूंब, वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यांसारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो..
समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र:- ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो.
bansodesirvs.blogspot.com
सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांच्यातील फरक स्पष्ट करणारा माझा यूट्यूब वरील व्हिडिओ ची लिंक पुढे दिलेली आहे👇
To join my Telegram Channel Link 👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know