प्रश्न :- सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये :-
( व्यष्टि अर्थशास्त्र , अंशलक्षी अर्थशास्त्र )
Features of Micro Economics
उत्तर :- सूक्ष्म अर्थशास्त्राची पुढील वैशिष्ट्ये आहेत
१) वैयक्तिक घटकांचा अभ्यास :-
"एखाद्या विशिष्ट घटकाचा" अभ्यास म्हणजे वैयक्तिक चल किंवा व्यक्तिगत घटक होय सूक्ष्म अर्थशास्त्रात प्रा. बोल्डिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती, एखादे कुटुंब ,एक वस्तू, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, एखादा उद्योग, एखादा उत्पादनाचा घटक अशा एखादा लहान घटकांचा, वैयक्तिक चलाचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत, लहान घटकांचा अभ्यास होतो असे म्हटले जाते
2)किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणतात :-
सूक्ष्म अर्थशास्त्रात एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ? तसेच उत्पादनाचे चार घटक म्हणजेच भूमीचा- खंड, श्रमिकाचे- वेतन, भांडवलाचे- व्याज व संयोजकांचा मोबदला किंवा किंमत नफा कसा ठरतो याचा अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असे म्हणतात.
३) आंशिक समतोल : -
समतोल हा दोन घटकांमध्ये होतो.आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिकघटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणेअभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक एक व्यक्ती एक कुटुंब एखादी उत्पादन संस्था एखादी वस्तू अशा लहान घटकाचा अंशाचा समतोल कसा साधला जातो याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे असे म्हटले जाते
4)सिद्धांत विशिष्ट गृहीतकांवर आधारित :-
सूक्ष्म अर्थशास्त्रात सिद्धांत खरे करण्यासाठी जी परिस्थिती स्थिर मानली जाते तिला गृहिते म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट वैयक्तिक घटकांचा अभ्यास करून सिद्धांत मांडले जातात मात्र ते इतरांना लागू करण्यासाठी गृहिते मांडावी लागतात उदा .इतर परिस्थिती कायम आहे, बाजारात पूर्ण स्पर्धा आहे, पूण रोजगार आहे इत्यादी याला गृहिते म्हणतात.
५) विभाजन पद्धत :-
मोठ्या घटकांचे अनेक लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन करून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो याला विभाजन पद्धत म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विभाजन करून सर्वात लहान घटक एक व्यक्ती त्याचे उत्पन्न त्याची मागणी याचा अभ्यास केला जातो तसेच उत्पादनासाठी चार घटक लागतात त्यांचे विभाजन करून भूमी, श्रम ,भांडवल,संयोजक यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करून विभाजन पद्धत वापरली जाते
६) सीमान्त तत्त्वाचा वापर :-
सीमांत याचा अर्थ वाढवलेला शेवटचा नग असा होतो म्हणजेच वस्तूच्या मागणीत, उपभोगात तसेच उत्पादन व विक्रीत एका नगाने वाढ केल्यास काय फरक पडतो ? याचा अभ्यास करणे यालाच सीमांत विश्लेषण म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र सीमांत तत्वाचा वापर करून अर्थतज्ज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत
७) बाजार रचनेचे विश्लेषण :-
सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी ,मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पाधिकारी बाजारपेठ अशा अनेक बाजारपेठांचा तेथील किंमत निश्चितीचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो.
8) वैयक्तिक आर्थिक कल्याण समजून येते :-
सूक्ष्म अर्थशास्त्र एक व्यक्ती एक कुटुंब एखादा उद्योग एक वस्तू एखादा उत्पादक घटक त्याचे वैयक्तिक उत्पन्न उत्पादन खर्च किंमत निश्चिती व उत्पन्नाचे वाटप याचा अभ्यास करते त्यावरून लोकांचे वैयक्तिक कल्याण समजून येते
9) एका कडून अनेका कडे जाण्याचा प्रयत्न :-- सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती त्याची मागणी त्याचे उत्पन्न त्यातील बदल तसेच एखादा उद्योग, एखादा उत्पादक अशा एखाद्या लहान घटकाचा अभ्यास करून संपूर्ण अर्थव्यवस्थेतेचा,मोठ्या घटकांचा तेथील बदलाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजेच एका घटकाच्या अभ्यासातून अनेक घटकांविषयी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जातो
10) मर्यादित व्याप्ती :-
सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिनिष्ठ वैयक्तिक लहान घटकांचा अभ्यास करते त्यामुळे संपूर्ण समाज तसेच अर्थव्यवस्थेसमोर तेजी-मंदी, दारिद्र्य, बेकारी, वाढती लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न अशा राष्ट्रव्यापी समस्या आल्यास त्याचा अभ्यास व त्यावरील उपायांसाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी पडत नाही . उदा.1929 ते 1933 मध्ये आलेली जागतिक महामंदी..
अशाप्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची वरील वैशिष्टे स्पष्ट करता येतात
..........................-:. .महत्वाचे प्रश्न..........,
1)प्रश्न :-सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा:- ( व्यष्टि अर्थशास्त्र , अंश लक्षी अर्थशास्त्र ),Micro Economics
2)प्रश्न "वैयक्तिक चल" म्हणजे काय?
3)प्रश्न:- सुक्ष्म अर्थशास्त्राला" किंमत सिद्धांत "किंवा" मूल्य सिद्धांत "असेही म्हणतात स्पष्ट करा
4)प्रश्न :-अंशिक समतोल म्हणजे काय?
5) प्रश्न :- गृहीते म्हणजे काय?
6)प्रश्न:- "विभाजन पद्धती "किंवा "विभाजन विश्लेषण पद्धती" म्हणजे काय?
7)प्रश्न:- "सिमांत तत्व" किंवा "सीमांत विश्लेषण पद्धती "म्हणजे काय?
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये वरील सर्व प्रश्न व त्याची उत्तरे पूर्ण करणारा युट्युब वरील माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे👇
आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम करणारे घटक सांगा
उत्तर द्याहटवा