अ) सामाजिक शास्त्रे ( Social sciences ) म्हणजे काय ? उत्तर :- समाजातील मानवी वागणुकीचा, मानवी हालचालींचा, त्यातील बदलांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो. उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. हे विषय पुढीलप्रमाणे आहेत. उदाहरण:- १) अर्थशास्त्र (Economics ) :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. २) समाजशास्त्र ( SOCIOLOGY) :- मानवाच्या सामाजिक अंतरसंबंधाच्या व...
Dear All, Welcome To My BLOG