मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दारिद्र्य म्हणजे काय ? Poverty in India

दारिद्र्य म्हणजे काय ? बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय ? दारिद्र्य रेषा म्हणजे काय ? सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य यांच्यातील फरक कोणता ? भारतातील दारिद्र्याची कारणे कोणती ? दारिद्र्य म्हणजे काय? 1) भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दररोज सरासरी 2250 कॅलरी उष्मांकाची आवश्यकता असते. ज्या व्यक्तीला हे उष्मांक देणारे अन्न मिळवण्याची क्षमता किंवा पात्रता नसते त्याला दारिद्र्याखालील म्हटले जाते. 2) भारतात ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज 2400 कॅलरी उष्मांक व शहरी भागात 2100 कॅलरी उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते ज्या व्यक्तीला कमीत कमी हे अन्न किंवा उष्मांक मिळवण्याची क्षमता नसते त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते. 3) त्यानुसार योग्य जीवन जगण्यासाठी व्यक्तीला आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे, करमणूक या मुलभूत गरजाही पुर्ण करण्याची व्यक्तीची क्षमता नसल्यास त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते. • Bansodesirvs.blogspot.com ====================================== बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? भारतासारख्या देशांमध्ये लोकांमध्ये बहुआयामी दारिद्र्य दिसून येते. बहुआयामी दारिद्र्यात ल...

भारतातील कर समित्या ! भारतातील आयात-निर्यात समित्या ! भारतातील बँक समित्या ! भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या ! 

भारतातील कर समित्या !  भारतातील आयात-निर्यात समित्या !  भारतातील बँक समित्या !  भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या !  1)       हिल्टन यंग समिती :- यांनी रिझर्व्ह बँक स्थापनेची शिफारस केली . 2)       महावीर त्यागी समिती :- 1958 प्रत्यक्ष कर चौकशी समिती. 3)       भगवती समिती :- बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाय सुचविण्यासाठी नेमण्यात आली. 4)       वांच्छु समिती :-   ( मार्च 1970) कर चुकवेगिरी, काळा पैसा याबाबतच्या समस्यांबाबत शिफारसींसाठी स्थापन करण्यात आली . त्यांनी प्रत्येक करदात्यांना कायमचा नंबर देण्याची शिफारस केली . 5)       सी सी चोक्सी समिती :- ( मार्च 1970) :- प्रत्यक्ष कर कायदा समिती. 6)       प्रा. कॅल्डोर समिती :- यांनी संपत्ती कराची शिफारस केली. 7)       प्रकाश टंडन समिती ( 1979 ) :- सरकारने निर्यात वाढीसाठी उपाय योजनेच्या संदर्भात ...

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक व संकल्पनात्मक अडचणी कोणत्या ? Difficulties in calculating national income

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी :-  अ) तात्विक अडचणी व  ब) व्यावहारिक अडचणी एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या अनेक अडचणींची पुढील दोन भागात विभागणी करता येते. अ) तात्विक अडचणी ब) व्यावहारिक अडचणी अ) तात्विक अडचणी :- यालाच संकल्पनात्मक अडचणी असेही म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक तात्विक अडचणी येतात त्या पुढीलप्रमाणे. 1)विनामूल्य सेवा :- पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्यामुळे आनंद मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदाहरणार्थ छंद म्हणून व्यक्तीने काढलेली चित्रे, आईने मुलांसाठी केलेल्या सेवा, शिक्षकाने स्वतःच्या मुलाला केलेले मार्गदर्शन इ. मोबदला दिला जात नाही यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाणार नाही. 2) हस्तांतरित देणी :- कोणतेही काम न करता मिळालेले हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदा. निवृत्तीवेतन, बेकार भत्ता, वडिलांकडून मुलाला मिळालेले उत्पन्न इ. 3) परकीय कंपन्यांना मिळालेले उत्पन्न :- आंतरराष्ट्री...

पुरवठ्याचा विस्तार ! पुरवठ्यातील संकोच ! पुरवठ्यातील वृध्दी ! पुरवठ्यातील ऱ्हास

पुरवठ्याचा विस्तार !  पुरवठ्याचा संकोच !  पुरवठ्यातील वृध्दी !  पुरवठ्यातील ऱ्हास म्हणजे काय ?  bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs. पुरवठ्याचा विस्तार  म्हणजे काय ? :- 1) इतर परिस्थिती कायम असताना वस्तूंची किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो त्याला पुरवठ्याचा विस्तार म्हणतात.  2) याठिकाणी उत्पादकाच्या अपेक्षा, उत्पादन तंत्रे , उत्पादक घटकांची किंमत ,सरकारचे धोरण इ. परिस्थिती कायम असते.  3) उदा. वस्तूची किंमत 10रु वरून 20रू वाढल्याने उत्पादकाने वस्तूंचा पुरवठा 100 वरून 200 वाढवला याला पुरवठ्यातील विस्तार म्हणतात.                    वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमतीत अक वरून 'अक1'इतकी वाढ झाल्यानंतर पुरवठा अब वरून अब1 इतका वाढतो याला पुरवठ्याचा विस्तार म्हणतात. यावेळी पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर उजवीकडे वरच्या बाजूस सरकतो . bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs पुरवठ्याचा संकोच  म्हणजे काय ? :- 1)इतर परिस्थिती कायम असताना वस्तूंची किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो त्याला पुरवठ्याचा विस्तार...

एकूण प्राप्ती म्हणजे काय ? सरासरी प्राप्ती ! सीमांत प्राप्ती

एकूण प्राप्ती :- (Total Revenue (TR) ) ! सरासरी प्राप्ती :- (Average Revenue---AR. ) ! सीमांत प्राप्ती :- (Marginal Revenue)  एकूण प्राप्तीच्या संकल्पना :- अ) एकूण प्राप्ती :- (Total Revenue (TR) )  आपल्या उद्योगात झालेल्या उत्पादनाची विक्री केल्यानंतर उत्पादकाला मिळणारे एकूण उत्पन्न किंवा रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. एकुण प्राप्ती काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.   सूत्र :- एकूण प्राप्ती. = एकूण विक्री नगसंख्या × किंमत  उदा. उत्पादकाने 10 खुर्च्या 200 रुपये प्रमाणे विकल्या तर एकूण प्राप्ती किती?  सूत्रानुसार एकूण प्राप्ती = 10 × 200. = 2000. ₹ एकूण प्राप्ती होईल.   ब) सरासरी प्राप्ती :- (Average Revenue---AR. )  उत्पादकाला प्रत्येक नग संख्येच्या विक्रीनंतर मिळणारे उत्पन्न म्हणजे सरासरी प्राप्ती होय. एकूण प्राप्तीला एकूण विक्री नगसंख्येने भागाकार करून सरासरी प्राप्ती काढता येते. त्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.   सूत्र :-                         एकूण प्राप्ती...

एकूण खर्च, स्थिर खर्च, बदलता खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च

एकूण खर्च ! स्थिर खर्च ! बदलता खर्च ! सरासरी खर्च व सीमांत खर्च म्हणजे काय ? ! सूत्र ! उत्पादन खर्चाच्या संकल्पना !  प्रत्येक उत्पादकाला वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या उत्पादक घटकांचा वापर करून त्यांना मोबदला द्यावा लागतो या उत्पादक घटकांवर येणाऱ्या खर्चाला उत्पादन खर्च म्हणतात. उत्पादकांना प्रामुख्याने पुढील तीन प्रकारचे उत्पादन खर्च येतात.  1) एकूण खर्च :-   उत्पादकाने उत्पादनासाठी वापरलेले उत्पादक घटकांना दिलेल्या मोबदल्यावरील खर्च म्हणजे एकूण खर्च होय. किंवा एका विशिष्ट वेळी उत्पादकाने उत्पादनासाठी केलेला एकूण स्थिर खर्च व एकूण बदलता खर्च यांची बेरीज म्हणजेच एकूण खर्च होय.  एकूण खर्च पुढील सूत्राने काढता येतो         एकूण खर्च = एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च.  उदा. 20 खुर्ची तयार करण्यासाठी 400 ₹ स्थिर खर्च 400 ₹ बदलता खर्च आला यांची बेरीज केल्यास एकूण खर्च 800 ₹ येतो.   अ) स्थिर खर्च :- वस्तूंच्या उत्पादनासाठी जे उत्पादनाचे घटक एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पुन्हा पुन्हा वापरता येतात त्यांच्यावरील खर्च ...

पुरवठा ठरवणारे घटक ! बाजार पुरवठा ठरविणरे घटक ! पुरवठा निर्धारित करणारे घटक

  प्रश्न :-  पुरवठा ठरवणारे घटक ! बाजार पुरवठा ठरविणरे घटक ! पुरवठा निर्धारित करणारे घटक कोणते? उत्तर :- वस्तूचा पुरवठा कमी जास्त करणारे अनेक घटक आहेत ते पुढीलप्रमाणे . 1) वस्तूची किंमत:- कोणताही वस्तूचा पुरवठा त्या वस्तूच्या किमती वर अवलंबून असतो वस्तूची किंमत वाढल्यास उत्पादकाला नफा होत असल्याने पुरवठा वाढतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. 2)पर्यायी वस्तूची किंमत :- वस्तूला असणाऱ्या पर्यायी वस्तूंच्या किमतीवर पुरवठा अवलंबून असतो . उदा. साखरेपेक्षा गुळाच्या किमती जास्त असल्यास शेतकरी ऊसापासून गुळाचे उत्पादन व पुरवठा वाढवतो मात्र यामुळे साखरेचा पुरवठा कमी होतो. 3) उत्पादकांच्या भविष्यकालीन अपेक्षा :- भविष्यात वस्तूंची किंमत, मागणी वाढून नफा वाढण्याची अपेक्षा असल्यास उत्पादक आज वर्तमान काळात वस्तूंचा पुरवठा कमी करतो.  4) उत्पादक घटकांची उपलब्धता :- वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे चार उत्पादनाचे घटक कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यास त्यांचा वापर वाढून उत्पादन व पुरवठा वाढतो.  5) पायाभूत सुविधांची उपलब्धता :- वस्तूंच्या उत्...

व्यापारी बँकेची कार्ये ! व्यापारी बँकेची प्राथमिक कार्ये ! व्यापारी बँकेची दुय्यम कार्य ! Functions of Commercial Bank

प्रश्न :- व्यापारी बँकेचा अर्थ, व्याख्या ! व्यापारी बँकेची कार्ये कोणती? बँकेची  प्राथमिक कार्ये , बँकेची दुय्यम कार्ये, बँकेची प्रातिनिधिक कार्ये, बँकेची सहाय्यक उपयुक्त कार्ये, पतनिर्मिती कारणे. प्रश्न :- प्लास्टिक पैसा म्हणजे काय? प्रश्न :-  डी - मॅट खाते म्हणजे काय? bansodesirvs.blogspot.com प्रश्न :- व्यापारी बँक म्हणजे काय ? उत्तर :- व्यापारी बँकेच्या आपणास पुढील व्याख्या सांगता येतात. 1) भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 :- यानुसार बँक म्हणजे लोकांना कर्ज देण्यासाठी व गुंतवणुकीसाठी लोकांकडून ठेवी स्वीकारणे व त्यांनी ठेवी मागितल्यानंतर धनादेशाद्वारे किंवा इतर प्रकारे परत करण्याचे कार्य करणारी व्यक्ती व संस्था म्हणजे बँक होय . 2) सेअर्स यांच्या मते , “ आपल्या जवळ जमा झालेल्या ठेवी लोकांना कर्ज देण्यासाठी उपयोगात आणणारी संस्था म्हणजे व्यापारी बँक होय .” 3) प्रा . केर्ना क्रॉस :- यांच्या मते “ पैशाचे आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या कोणत्याही संस्थेला बँक असे म्हणतात” . या वरून नफा मिळवण्यासाठी लोकांकड...