राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक व संकल्पनात्मक अडचणी कोणत्या ? Difficulties in calculating national income
राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी :-
अ) तात्विक अडचणी व ब) व्यावहारिक अडचणी
एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या अनेक अडचणींची पुढील दोन भागात विभागणी करता येते. अ) तात्विक अडचणी ब) व्यावहारिक अडचणी
अ) तात्विक अडचणी :- यालाच संकल्पनात्मक अडचणी असेही म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक तात्विक अडचणी येतात त्या पुढीलप्रमाणे.
1)विनामूल्य सेवा :- पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्यामुळे आनंद मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदाहरणार्थ छंद म्हणून व्यक्तीने काढलेली चित्रे, आईने मुलांसाठी केलेल्या सेवा, शिक्षकाने स्वतःच्या मुलाला केलेले मार्गदर्शन इ. मोबदला दिला जात नाही यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाणार नाही.
2) हस्तांतरित देणी :- कोणतेही काम न करता मिळालेले हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. उदा. निवृत्तीवेतन, बेकार भत्ता, वडिलांकडून मुलाला मिळालेले उत्पन्न इ.
3) परकीय कंपन्यांना मिळालेले उत्पन्न :- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या मते, परकीय कंपन्यांना मिळालेले उत्पन्न ते ज्या देशात उत्पादन करतात त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. मात्र या कंपन्यांना मिळणारा नफा त्यांच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो.
4) अवैध बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न :- सरकारी मान्यता नसलेल्या अवैध बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. उदा. जुगार, भ्रष्टाचार, अवैध व्यापार, काळया बाजारातील खरेदी विक्री इ.
5) स्वतःच्या उपभोगासाठीचे उत्पादन :- भारतासारख्या देशात ग्रामीण भागात शेतकरी झालेल्या एकूण उत्पादनापैकी काही अन्नधान्य, भाजीपाला, व इतर उत्पादन स्वतःच्या कुटुंबाच्या उपभोगासाठी बाजूला काढून ठेवतो प्रत्यक्षात त्यांची योग्य किंमत काढून राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करणे अडचणीचे आहे. त्यामुळे अंदाजे किंमत काढून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते.
6) सरकारी सेवा :- देशातील सरकार देशाचे संरक्षण, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था अनेक सार्वजनिक सेवा पुरवठा करते या सार्वजनिक सेवांचे मूल्य निश्चित करून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करणे खूपच अडचणीचे आहे.
7) सतत किमतीत होणारे बदल :- वस्तू व सेवांच्या सतत बदलणार्या किमतीमुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजणे अडचणीचे आहे. उदा. वस्तूंच्या किमती वाढल्यास वस्तूंचे उत्पादन वाढलेले नसले तरी बाजार किमती नुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली दिसून येते.
bansodesirvs.blogspot.com
ब) राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यवहारिक अडचणी :-
राष्ट्रीय उत्पन्नाविषयी प्रत्यक्ष व्यवहारात माहिती व आकडेवारी गोळा करताना पुढील अनेक व्यावहारिक अडचणी येतात.
1) दुहेरी गणनेची समस्या :- राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ अंतिम वस्तू व सेवांची किंमत विचारात घेतली जाते. मात्र अंतिम वस्तू शोधून काढणे खूपच अडचणीचे आहे त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत दोनदा मोजण्याची शक्यता असते. उदा. बेकरीत वापरले जाणारे गहू चे पीठ मध्यम वस्तू असते, तर कुटुंबासाठी गहू चे पीठ अंतिम वस्तू असते.
2) घसारा खर्च काढण्याची अडचण :- राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घसारा खर्च वजा केला जातो. मात्र वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू अनेक प्रकारच्या असतात त्यामुळे घसारा खर्च काढण्याची एकसमान पद्धत अस्तित्वात नाही, त्यामुळे अचूक घसारा खर्च काढणे अडचणीचे आहे.
3) अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व :- राष्ट्रीय उत्पन्न पैशात मोजले जाते. मात्र भारतासारख्या देशात आजही पैशाचा वापर न करता अनेक व्यवहार केले जातात. त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करणे अडचणीचे आहे. उदा. ग्रामीण भागात शेतकरी शेतमजुरांना आजही धान्याच्या स्वरूपात मोबदला देतो.
4) निरक्षरता व अज्ञान :- भारतासारख्या देशात अनेक शेतकरी, छोटे व्यापारी, कामगार, ग्राहक निरीक्षर, अज्ञानी आहेत. त्यांचे उत्पन्न, उत्पादन, खर्च याविषयी अचूक नोंद आकडेवारी मिळत नसल्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजणे अडचणीचे आहे.
5) भांडवली लाभ व तोटा :- भांडवलाच्या किमती कमी जास्त होऊन झालेला भांडवली लाभ किंवा तोटा याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. कारण चालू आर्थिक व्यवहारामुळे हा बदल होत नाही.
6) इतर व्यवसायांच्या माहितीचा अभाव :- उदा. विकसनशील देशात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इत्यादी व्यवसाय देखील केले जातात तेथील उत्पन्न, उत्पादनाची माहिती अचूक मिळत नाही.
7) मालाच्या साठ्याची किंमत मोजणे अडचणीचे आहे :- राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादकाकडे असलेल्या मध्यम वस्तू तसेच तयार अंतिम वस्तूचा साठा याची अचूक किंमत काढून राष्ट्रीय उत्पन्नात मोजणे अडचणीचे आहे.
अशाप्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक तात्विक अडचणी व व्यावहारिक अडचणी येतात.
bansodesirvs.blogspot.com
माझे पुढील अर्थशास्त्राचे यूट्यूब चैनल याविषयी पुढील लिंकला क्लिक करून अवश्य भेट द्या.
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
धन्यवाद
बनसोडे सर व्ही एस
==============================
माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवा