पुरवठ्याचा विस्तार ! पुरवठ्याचा संकोच ! पुरवठ्यातील वृध्दी ! पुरवठ्यातील ऱ्हास म्हणजे काय ?
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय ? :-
1) इतर परिस्थिती कायम असताना वस्तूंची किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो त्याला पुरवठ्याचा विस्तार म्हणतात.
2) याठिकाणी उत्पादकाच्या अपेक्षा, उत्पादन तंत्रे , उत्पादक घटकांची किंमत ,सरकारचे धोरण इ. परिस्थिती कायम असते.
3) उदा. वस्तूची किंमत 10रु वरून 20रू वाढल्याने उत्पादकाने वस्तूंचा पुरवठा 100 वरून 200 वाढवला याला पुरवठ्यातील विस्तार म्हणतात.
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमतीत अक वरून 'अक1'इतकी वाढ झाल्यानंतर पुरवठा अब वरून अब1 इतका वाढतो याला पुरवठ्याचा विस्तार म्हणतात. यावेळी पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर उजवीकडे वरच्या बाजूस सरकतो .
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
पुरवठ्याचा संकोच म्हणजे काय ? :-
1)इतर परिस्थिती कायम असताना वस्तूंची किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो त्याला पुरवठ्याचा विस्तार म्हणतात.
2) याठिकाणी उत्पादकाच्या अपेक्षा, उत्पादन तंत्रे , उत्पादक घटकांची किंमत, सरकारचे धोरण इ. परिस्थिती कायम असते.
3) उदा. वस्तूची किंमत 10रु वरून 05 रू कमी झाल्याने उत्पादकाने वस्तूंचा पुरवठा 100 वरून 50 इतका कमी केला याला पुरवठ्यातील संकोच म्हणतात.
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमत अक वरून 'अक2'इतकी कमी झाल्यानंतर पुरवठा अब वरून अब2 इतका कमी होतो याला पुरवठ्याचा संकोच म्हणतात. यावेळी पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर खालील बाजूस सरकतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
पुरवठ्यातील वृध्दी म्हणजे काय ? :-
1) किंमत कायम असताना इतर परिस्थिती बदलून पुरवठा वाढल्यास त्याला पुरवठ्याचा वृध्दी म्हणतात.
2) याठिकाणी उत्पादकाच्या अपेक्षा, उत्पादन तंत्रे , उत्पादक घटकांची किंमत ,सरकारचे धोरण इ. परिस्थिती बदलून पुरवठा वाढतो.
3) उदा. किंमत कायम असताना इतर परिस्थिती बदलून उत्पादकाने वस्तूंचा पुरवठा 100 वरून 200 वाढवला याला पुरवठ्यातील वृध्दी म्हणतात.
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या अक किमती स्थिर असताना इतर परिस्थिती बदलून पुरवठा अब वरून अब1 इतका वाढल्यास याला पुरवठ्यातील वृध्दी म्हणतात. यावेळी नविन पुरवठा वक्र प1प1 हा मुळ पप या पुरवठा वक्राच्या उजवीकडे येतो.
पुरवठ्यातील ऱ्हास म्हणजे काय ? :-
1) किंमत कायम असताना इतर परिस्थिती बदलून पुरवठा कमी झाल्यास त्याला पुरवठ्याचा ऱ्हासस म्हणतात.
2) याठिकाणी उत्पादकाच्या अपेक्षा, उत्पादन तंत्रे , उत्पादक घटकांची किंमत, सरकारचे धोरण इ. परिस्थिती बदलून पुरवठा कमी होतो.
3) उदा. किंमत कायम असताना इतर परिस्थिती बदलून उत्पादकाने वस्तूंचा पुरवठा 100 वरून 50 इतका कमी केला याला पुरवठ्यातील ऱ्हास म्हणतात.
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या अक किमती स्थिर असताना इतर परिस्थिती बदलून पुरवठा अब वरून अब1 इतका कमी झाल्यास याला पुरवठ्याचा रास म्हणतात. यावेळी नविन पुरवठा वक्र प2प2 हा मुळ पप या पुरवठा वक्राच्या डावीकडे येतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
धन्यवाद
बनसोडे सर व्ही. एस.
विषय:- अर्थशास्त्र
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
अभिनंदन बनसोडे सर खूप छान मांडणी
उत्तर द्याहटवा