प्रश्न :- पुरवठा ठरवणारे घटक ! बाजार पुरवठा ठरविणरे घटक ! पुरवठा निर्धारित करणारे घटक कोणते?
उत्तर :- वस्तूचा पुरवठा कमी जास्त करणारे अनेक घटक आहेत ते पुढीलप्रमाणे .
1) वस्तूची किंमत:- कोणताही वस्तूचा पुरवठा त्या वस्तूच्या किमती वर अवलंबून असतो वस्तूची किंमत वाढल्यास उत्पादकाला नफा होत असल्याने पुरवठा वाढतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो.
2)पर्यायी वस्तूची किंमत :- वस्तूला असणाऱ्या पर्यायी वस्तूंच्या किमतीवर पुरवठा अवलंबून असतो .
उदा. साखरेपेक्षा गुळाच्या किमती जास्त असल्यास शेतकरी ऊसापासून गुळाचे उत्पादन व पुरवठा वाढवतो मात्र यामुळे साखरेचा पुरवठा कमी होतो.
3) उत्पादकांच्या भविष्यकालीन अपेक्षा :- भविष्यात वस्तूंची किंमत, मागणी वाढून नफा वाढण्याची अपेक्षा असल्यास उत्पादक आज वर्तमान काळात वस्तूंचा पुरवठा कमी करतो.
4) उत्पादक घटकांची उपलब्धता :- वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे चार उत्पादनाचे घटक कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यास त्यांचा वापर वाढून उत्पादन व पुरवठा वाढतो.
5) पायाभूत सुविधांची उपलब्धता :- वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक पाणी, वीज, रस्ते, गोदाम, बँक, विमा इत्यादी मूलभूत सुविधा कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यास उत्पादनासाठी प्रेरणा मिळून उत्पादन व पुरवठा वाढतो.
6) उत्पादन तंत्र व यंत्रे :- वस्तू उत्पादनासाठी देशात आधुनिक तंत्र व यंत्राचा वापर होत असल्यास कमी वेळेत, कमी किमतीत, कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन वस्तूं व सेवांचे उत्पादन व पुरवठा वाढतो.
7) नैसर्गिक परिस्थिती :- वस्तू उत्पादनासाठी हवामान, पाऊस इत्यादी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्यास शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते.
8) उत्पादन खर्च :- वस्तूच्या उत्पादनासाठी येणारा खर्च कमी होत असल्यास उत्पादन त्याला जास्त नफा मिळतो त्यामुळे प्रेरणा मिळवन वस्तूंचे उत्पादन व पुरवठा वाढतो.
9) आयात निर्यात सुविधा :- देशात आधुनिक यंत्रांची आयात व वस्तू व सेवांच्या निर्यातीला सुविधा मिळत असल्यास इतर देशातील वस्तू व सेवांची मागणी वाढून देशात वस्तूंचे उत्पादन, पुरवठा व रोजगार वाढत जातो.
10) सरकारचे धोरण- देशातील सरकारने वस्तू व सेवांवरील कर कमी केला तसेच उत्पादनासाठी अनुदाने सवलती दिल्यास उत्पादन खर्च होऊन नफा वाढतो त्यामुळे देशातील उत्पादन व पुरवठा वाढतो.
अशा प्रकारे पुरवठा किंवा बाजार पुरवठा वरील अनेक घटकांवर अवलंबून असतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
धन्यवाद बनसोडे सर व्ही एस
bansodesirvs.blogspot.com.bansodesir
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know