दारिद्र्य म्हणजे काय ? बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय ? दारिद्र्य रेषा म्हणजे काय ? सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य यांच्यातील फरक कोणता ? भारतातील दारिद्र्याची कारणे कोणती ?
दारिद्र्य म्हणजे काय?
1) भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दररोज सरासरी 2250 कॅलरी उष्मांकाची आवश्यकता असते. ज्या व्यक्तीला हे उष्मांक देणारे अन्न मिळवण्याची क्षमता किंवा पात्रता नसते त्याला दारिद्र्याखालील म्हटले जाते.
2) भारतात ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज 2400 कॅलरी उष्मांक व शहरी भागात 2100 कॅलरी उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते ज्या व्यक्तीला कमीत कमी हे अन्न किंवा उष्मांक मिळवण्याची क्षमता नसते त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते.
3) त्यानुसार योग्य जीवन जगण्यासाठी व्यक्तीला आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे, करमणूक या मुलभूत गरजाही पुर्ण करण्याची व्यक्तीची क्षमता नसल्यास त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते.
• Bansodesirvs.blogspot.com
======================================
बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय?
भारतासारख्या देशांमध्ये लोकांमध्ये बहुआयामी दारिद्र्य दिसून येते. बहुआयामी दारिद्र्यात लोकांना भौतिक व अभौतिक अशा दोनही सुविधा किंवा घटकांपासून वंचित राहावे लागते याला बहुआयामी दारिद्र म्हणतात.
यामध्ये भौतिक घटक म्हणजेच जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी इ. मूलभूत गरजांबाबत वंचित राहावे लागते तर अभौतिक घटक म्हणजेच समाजात मिळणारी समान वागणूक, शैक्षणिक सुविधा, योग्य माहिती व मार्गदर्शन, आरोग्य सोय, राजकीय व नागरी स्वातंत्र्य, उत्पन्न, उत्पादन व रोजगार व सरकारी योजनांमध्ये सर्वांना समान संधी, पोषक व भरपूर अन्न, भाषा, धर्म, जात, प्रदेश याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व ठिकाणी सर्वांना मिळणाऱ्या समान संधी यापासून लोक वंचित राहतात याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात.
भारतासारख्या देशात भौतिक व अभौतिक अशा दोन्ही घटकांबाबत लोकांमध्ये प्रचंड भेदभाव केला जातो याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात.
• bansodesirvs.blogspot.com
======================================
प्रा. अमर्त्य सेन :-
भारतीय अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र, दारिद्रय व आर्थिक दुर्बल घटकांच्या समस्या याबाबत केलेल्या अभ्यासासाठी “नोबेल पुरस्कार” मिळाला. त्यांनी बहुआयामी दारिद्रयाचा अभ्यास केला. अमर्त्य सेन यांनी “Poverty and Famines : An Essay on Entitlement and Deprivation” हा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उत्पन्न वाढीबरोबरच त्यांच्या शैक्षणिक सुधारणा, आरोग्य विषयक सोयी व सामाजिक सुधारणा यावर भर दिला.
======================================
निरपेक्ष दारिद्र्य व सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? :-
निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? :-
निरपेक्ष दारिद्र्यात व्यक्तीला योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे इ. मुलभूत गरजाही पूर्ण करण्याची क्षमता नसते त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. यामध्ये व्यक्ती पूर्णतः दारिद्रयाखाली असतो. अशा प्रकारचे दारिद्र्य कमी करणे खूपच आवश्यक आहे.
अशा प्रकारचे दारिद्र्य भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, आफ्रिकेतील देश अशा अविकसित व विकसनशील देशातील लोकांमध्ये दिसून येते.
bansodesirvs.blogspot.com
======================================
सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय ? :-
सापेक्ष दारिद्र्यात देशातील लोकांची त्यांच्या उत्पन्नानुसार तुला किंवा गट पाडून सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सापेक्ष म्हटले जाते. सापेक्ष दारिद्र्यात व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतात, मात्र इतरांपेक्षा त्याचे उत्पन्न व राहणीमान कमी असते, तो वापरत असलेल्या गाड्या, वस्तू इतरांपेक्षा कमी दर्जाच्या असतात, त्यामुळे व्यक्ती सापेक्ष दारिद्र्याखाली समजली जाते.
सापेक्ष दारिद्र्य अमेरिका, इंग्लंड, जपान यासारख्या प्रगत विकसित, श्रीमंत देशात दिसून येते.
bansodesirvs.blogspot.com
दारिद्र्यरेषा म्हणजे काय ? Poverty Line
दारिद्र्यरेषा ही एक काल्पनिक रेषा असते. सरकार व अर्थतज्ञ आपल्या देशात दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाण किती आहे? हे मोजण्यासाठी दारिद्रयरेषा ठरवतात. प्रत्येक देशात दारिद्र्यरेषा वेगवेगळी असते.
दारिद्र्य रेषा म्हणजे, “एखादी व्यक्ती दारिद्र्याखाली आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी
1) दरडोई उत्पन्नाची मर्यादा,
2) दरडोई उष्मांकाची मर्यादा,
3) दरडोई उपभोग खर्चाची
कमीतकमी मर्यादा किंवा सीमा ठरवली जाते त्याला दारिद्र्यरेषा म्हणतात.
त्यानुसार भारतात दारिद्र्यरेषेची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
1) दरडोई उत्पन्न मर्यादा :- भारतात प्रत्येक व्यक्तीची शहरी भागात वार्षिक उत्पन्न कमीत कमी 15000/- तर ग्रामीण भागात वार्षिक 11000/- रुपये.
2) दरडोई उष्मांक मर्यादा :- भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दररोज सरासरी कमीत कमी 2250 कॅलरी उष्मांकाची, ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज 2400 कॅलरी उष्मांक व शहरी भागात 2100 कॅलरी उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते.
3) दरडोई उपभोग खर्चाची मर्यादा :- 2011-2012 आकडेवारीनुसार ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमहिना उपभोग खर्च 972/- रुपये म्हणजेच प्रति दिवस 32/- रुपये तर शहरी भागात दर महिन्याला 1407/- रुपये व प्रत्येक दिवशी 47/- रुपये दररोज कमीत कमी खर्च असावा.
वरील आकडेवारीनुसार ज्या व्यक्तीला वरील कमीत कमी उत्पन्नाचे, उष्मांकाची, व उपभोग खर्चाची कमीत-कमी मर्यादा पूर्ण करण्याची क्षमता नसते त्यांना दारिद्र्यरेषेखालील BPL (Below Poverty Line) संबोधले जाते. त्यानुसार भारतात सर्वात जास्त दारिद्र्याचा दर छत्तीसगड राज्यात 39.9 तर सर्वात कमी दारिद्र्याचा दर केरळ राज्यात 7.1 आहे.
bansodesirvs.blogspot.com
======================================
भारतात दारिद्र्य वाढण्याची कारणे कोणती ?
उत्तर भारतात प्रामुख्याने पुढील कारणामुळे लोकांचे ग्रामीण व शहरी भागात लोकांचे दारिद्र्य वाढत आ
1) भारतातील लोकसंख्या विस्फोट :- उदा. आज 2011 च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 101.02 कोटी आहे दरवर्षी ही लोकसंख्या 1.8 कोटीने वाढते. जन्मदर जास्त आहे.
2) शेतीचा मागासलेपण :- शेतीचे वाढते तुकडीकरण, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, योग्य बाजारपेठेचा अभाव, शेतीवरील लोकांचा वाढता भार, शेतकऱ्यांमधील निरक्षरता, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, शेतीकडे निर्वाहाचे साधन म्हणून बघण्याचा चुकिचा दृष्टीकोण
3) उद्योगाचा मागासलेपणा:- ग्रामीण व शहरी भागांमध्ये लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांचा फारसा विकास होत नाही त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला रोजगार मिळत नसल्याने बेकारी व दारिद्र्य वाढत आहे.
4) आर्थिक विषमता :- आजही भारतात ग्रामीण व शहरी भागात काही लोकांकडेच उत्पन्न, संपत्ती, जमीन, उद्योग यांची मालकी मक्तेदारी आहे. बहुसंख्य लोक उत्पन्न, उत्पादन, रोजगार, विकास यापासून वंचित असल्याने त्यांचे दारिद्र्य व बेकारी वाढत आहे. उदा. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर उद्योग समूह.
5) मूलभूत सुविधांची कमतरता :- ग्रामीण व शहरी भागात आजही शेती, उद्योग, व्यापार यांच्या विकासासाठी आवश्यक रस्ते, रेल्वे, पाणी, योग्य बाजारपेठ, बँक, विमा इत्यादी मूलभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे दारिद्र्य व बेकारी वाढत आहे.
6) सामाजिक सोयींची कमतरता :- लोकांचे राहणीमान व विकास वाढवण्यासाठी आवश्यक शिक्षण, आरोग्य सोयी, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, व्यवसायिक शिक्षण, या सामाजिक सोयींची आजही कमतरता असल्यामुळे लोकांचे दारिद्र्य वाढत आहे.
7) वाढत्या किमती :- भारतात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे, जमीन, घरे इत्यादी जीवन जगण्यासाठी आवश्यक वस्तू व सेवांच्या किमती वाढत आहेत. माञ लोकांचे उत्पन्न वाढवून मिळत नाही. त्यामुळे गरीब लोकांना आपल्या उत्पन्नातून आपल्या किमान गरजा पूर्ण करणे आश्यक असल्यामुळे त्यांची दारिद्र्य वाढतच आहे.
8) बंद आजारी पडणाऱ्या उद्योगांचे वाढते प्रमाण :- भारतात विविध कारणांनी बंद पडणाऱ्या आजारी उद्योगांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बेकारी व दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे. उदा. वीज बिल थकबाकी, भांडवलाची टंचाई, जुनाट यंत्रे, वाढती स्पर्धा, कच्च्या मालाची टंचाई इत्यादी.
9) असमतोल विकास :- आजही भारतात काही प्रदेश, काही लोकांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला दिसून येतो मात्र बहुसंख्य प्रदेश, बहुसंख्य लोक व बहुसंख्य लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवांच्या उत्पादनात विषमता असलेली दिसून येते त्यामुळे गरीब लोकांचे दारिद्र्य व बेकारी वाढतच आहे.
10) भारतातील निरक्षरता :- रूढी परंपरा, अंधश्रद्धा, जात, धर्म, वर्ण, लिंगभेदभाव इ.
11) भारतातील नैसर्गिक आपत्ती :- उदा चक्रीवादळे, भूकंप, साथीचे रोग, दुष्काळ, महापूर इ.
12) सरकारचे व सरकारी अधिकाऱ्यांचे दारिद्र्य, भ्रष्टाचार कमी करण्याकडे दुर्लक्ष अकार्यक्षमता.
13) गरिबांना योजनांचा फायदा मिळत नाही :- उदा .सार्वजनिक वितरण व्यवस्था, रोजगार हमी योजना इत्यादी सरकारी योजनांमधील वाढता भ्रष्टाचार.
14) योग्य माहिती मार्गदर्शनाचा अभाव :- भारतात अमर्त्य सेन यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळत नाही याचे दारिद्र्य मोठे आहे. शिक्षण, सरकारी योजना, शेती, उद्योग, व्यापार इत्यादी अनेक घटकांविषयी लोकांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळत नसल्याने लोकांचे दारिद्र्य व बेकारी वाढत आहे.
15) दारिद्र्याचे दुष्टचक्र:- प्राध्यापक नक्र्स यांनी सांगितल्याप्रमाणे गरिबी हेच गरिबीचे कारण आहे त्यानुसार भारतासारख्या देशात देशाचे व लोकांचे उत्पन्न कमी, बचत, भांडवल, गुंतवणूक कमी होऊन देशातील शेती, उद्योग, व्यापार यांचा विकास कमी होतो. त्यामुळे लोकांचा रोजगार कमी होऊन पुन्हा देशाचे व लोकांचे उत्पन्न कमी होते. यालाच त्यांनी दारिद्र्याचे दुष्टचक्र म्हटले. त्यामुळे लोकांचे दारिद्र्य बेकारी वाढत आहे.
अशाप्रकारे भारतासारख्या देशात वरील अनेक कारणांमुळे लोकांचे दारिद्र्य व बेकारी वाढत आहे.
bansodesirvs.blogspot.com
माझ्या पुढील लिंक वरील यूट्यूब चैनल ला क्लिक करा व चॅनल सबस्क्राईब करा 👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
धन्यवाद
bansodesirvs.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know