एकूण प्राप्ती :- (Total Revenue (TR) ) ! सरासरी प्राप्ती :- (Average Revenue---AR. ) ! सीमांत प्राप्ती :- (Marginal Revenue)
एकूण प्राप्तीच्या संकल्पना :-
अ) एकूण प्राप्ती :- (Total Revenue (TR) )
आपल्या उद्योगात झालेल्या उत्पादनाची विक्री केल्यानंतर उत्पादकाला मिळणारे एकूण उत्पन्न किंवा रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. एकुण प्राप्ती काढण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.
सूत्र :- एकूण प्राप्ती. = एकूण विक्री नगसंख्या × किंमत
उदा. उत्पादकाने 10 खुर्च्या 200 रुपये प्रमाणे विकल्या तर एकूण प्राप्ती किती?
सूत्रानुसार एकूण प्राप्ती = 10 × 200. = 2000. ₹ एकूण प्राप्ती होईल.
ब) सरासरी प्राप्ती :- (Average Revenue---AR. )
उत्पादकाला प्रत्येक नग संख्येच्या विक्रीनंतर मिळणारे उत्पन्न म्हणजे सरासरी प्राप्ती होय. एकूण प्राप्तीला एकूण विक्री नगसंख्येने भागाकार करून सरासरी प्राप्ती काढता येते. त्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.
सूत्र :- एकूण प्राप्ती
सरासरी प्राप्ती = ----------------------------------
एकूण विक्री नगसंख्या
उदा. उत्पादकाला 10 खुर्च्या विकून 2000 रुपये एकूण प्राप्ती झाल्यास सरासरी प्राप्ती किती ? सूत्रानुसार
2000
सरासरी प्राप्ती =-------------. = 200 ₹ सरासरी प्राप्ती येईल. 10
क) सीमांत प्राप्ती :- (Marginal Revenue)
उत्पादकाने वस्तूच्या विक्रीत एका नग संख्येने वाढ केल्यानंतर त्याला मिळणाऱ्या एकूण प्राप्तीत होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. सीमांत प्राप्ती पुढील सूत्राने काढली जाते.
सूत्र
सीमांत प्राप्ती. =. एका वाढीव नगसंखेच्या विक्रीनंतर झालेली एकूण प्राप्ती – आधीची एकूण प्राप्ती
उदा. 10 खुर्च्या विकून 2000 ₹ एकूण प्राप्ती झाली . 11 वी खुर्ची विकून 2300 ₹ प्राप्ती झाल्यास सीमांत प्राप्ती किती होईल?
सूत्रानुसार सीमांत प्राप्ती = 2300 – 2000 =. 300 ₹ सीमांत प्राप्ती होईल.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
धन्यवाद
बनसोडे सर व्ही. एस.
विषय:- अर्थशास्त्र
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know