व्यापारी बँकेची कार्ये ! व्यापारी बँकेची प्राथमिक कार्ये ! व्यापारी बँकेची दुय्यम कार्य ! Functions of Commercial Bank
प्रश्न :- व्यापारी बँकेचा अर्थ, व्याख्या ! व्यापारी बँकेची कार्ये कोणती? बँकेची प्राथमिक कार्ये, बँकेची दुय्यम कार्ये, बँकेची प्रातिनिधिक कार्ये, बँकेची सहाय्यक उपयुक्त कार्ये, पतनिर्मिती कारणे.
प्रश्न :- प्लास्टिक पैसा म्हणजे काय?
प्रश्न :- डी - मॅट खाते म्हणजे काय?
bansodesirvs.blogspot.com
प्रश्न :- व्यापारी बँक म्हणजे काय ?
उत्तर :- व्यापारी बँकेच्या आपणास पुढील व्याख्या सांगता
येतात.
1) भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 :- यानुसार बँक म्हणजे लोकांना कर्ज देण्यासाठी व गुंतवणुकीसाठी लोकांकडून ठेवी स्वीकारणे व त्यांनी ठेवी मागितल्यानंतर धनादेशाद्वारे किंवा इतर प्रकारे परत करण्याचे कार्य करणारी व्यक्ती व संस्था म्हणजे बँक होय.
2) सेअर्स यांच्या मते, “आपल्या जवळ जमा झालेल्या ठेवी लोकांना कर्ज देण्यासाठी उपयोगात आणणारी संस्था म्हणजे व्यापारी बँक होय.”
3) प्रा. केर्ना क्रॉस :- यांच्या मते “पैशाचे आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या कोणत्याही संस्थेला बँक असे म्हणतात”.
यावरून नफा
मिळवण्यासाठी लोकांकडून ठेवी स्वीकारणे, त्यांनी मागितल्यानंतर परत करणे तसेच जमा
ठेवी गरजू लोकांना कर्ज देणे व गुंतवणूक करण्याचे कार्य करणाऱ्या संस्थेला
व्यापारी बँक म्हणतात. उदा. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक,
स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी अनेक व्यापारी बँका आहेत.
bansodesirvs.blogspot.com
प्रश्न :- व्यापारी बँकेची कार्ये कोणती?
उत्तर :- व्यापारी बँका नफा
मिळवण्यासाठी पुढील विविध कार्ये करतात.
A) व्यापारी बँकेची प्राथमिक कार्ये :-
1) ठेवी स्वीकारणे :- ज्या बँकेत
खातेदार व त्यांनी ठेवलेल्या ठेवी जास्त असतात ती बॅक मोठी समजली जाते. त्यामुळे
प्रत्येक व्यापारी बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुढील विविध प्रकारच्या ठेवी
स्वीकारते.
अ) मागणी ठेव :- या ठेवी ग्राहकाने
मागताक्षणी परत केल्या जातात त्या पुढील प्रमाणे
a) चालू ठेव किंवा चालू खाते
b) बचत ठेव किंवा बचत खाते
ब) निश्चित
कालावधी ठेवी :- या ठेवी विशिष्ट
मुदतीसाठी ठेवल्या जातात त्या पुढीलप्रमाणे
a) आवर्ती ठेव खाते व
b) मुदत ठेव.
( वरील ठेवींचे सर्व प्रकार, व्याख्या,
यांच्यातील फरक याच्या नोट्ससाठी माझ्या ब्लॉगचे पुढील लिंक क्लिक करा 👉 https://bansodesirvs.blogspot.com/2022/01/types-of-bank-deposits-current-account.html )
bansodesirvs.blogspot.com
2) कर्ज देणे :- व्यापारी बँका नफा
मिळवण्यासाठी जमा ठेवी गरजू लोकांना योग्य तारण घेऊन कर्ज देण्याचे कार्य करतात.
त्या पुढील प्रकारचे कर्ज देतात.
A) विविध कालावधीची कर्जे :-
a) मागणी कर्ज, अतिअल्पकालीन कर्ज :- सात दिवसांसाठी दिली जातात.
b) अल्पकालीन कर्ज :- दोन वर्षापेक्षा
कमी कालावधीसाठी.
c) मध्यम कालीन कर्ज :- दोन ते पाच
वर्षासाठी
d) दीर्घ मुदतीची
कर्जे :- पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी
B) रोख कर्ज :- ग्राहकाला व्यापारी बँका योग्य तारण घेऊन कर्ज
मंजूर करून पैसे त्याच्या कर्ज खात्यात जमा करते व उचललेल्या कर्जावर व्याज आकारते
याला रोख कर्ज म्हणतात.
C) अधिकर्ष सवलत :- ग्राहकाची पत बघुन व्यापारी बँका काही
ग्राहकांना त्याच्या खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची सोय देतात
त्याला “अधिकर्ष सवलत” असे म्हणतात. हे एक प्रकारचे कर्ज असते व उचललेल्या रकमेवर
व्याज आकारले जाते.
D) हुंड्या वटविणे :- एका व्यापाराने दुसऱ्या व्यापाऱ्याला एका विशिष्ट वेळी ठराविक
रक्कम परत करण्याची लेखी हमी दिलेले असते असा कागद म्हणजे हुंडी होय. दुसऱ्या
व्यापाराला पैशाची गरज पडल्यास ही हुंडी व्यापारी बँकेकडे गहाण ठेवून व्यापारी
बँका कर्ज देतात व मुदत संपल्यानंतर ठरलेली रक्कम हुडी देणाऱ्या पहिल्या
व्यापाऱ्यांकडून व्यापारी बँक वसूल करते याला हंड्या वटवणे असे म्हणतात.
bansodesirvs.blogspot.com
B) व्यापारी बँकेची दुय्यम कार्ये
:-
दुय्यम कार्याचे
पुढील दोन प्रकार पडतात
अ) व्यापारी बँकेची प्रातिनिधिक कार्ये :-
खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून व्यापारी बँका पुढील
प्रातिनिधिक कार्य करतात
1) पैसे जमा करणे :- खातेदाराने
सांगितल्याप्रमाणे धनादेश, डिमांड ड्राफ्ट, लाभांश, भाडे व त्यांचे
बिले याचे पैसे जमा करून घेते.
2) देणी देणे :- वीज बील, टेलीफोन बील,
विम्याचे हप्ते, कर्जाचे हप्ते,
3) अज्ञान मुलाचे पालकत्व
विश्वस्त व व्यवस्थापक म्हणून कार्य करणे .
4) ई – बँकिंग :- म्हणजेच इंटरनेट बँकिंगची सोय
खातेदाराला देणे.
5) डी – मॅट खाते :- शेअरची खरेदी
विक्री करण्यासाठी या खात्याची सोय देते.
bansodesirvs.blogspot.com
ब) व्यापारी बँकेची सहाय्यक उपयुक्त कार्य :- खातेदारांना
पुढील उपयुक्त सेवा व्यापारी बँक पुरवतात .
1) पैसे पाठविणे :- डिमांड ड्राफ्ट, तार, मेल यातून कोणत्याही देशात
पैसे पाठवणे.
2) सुरक्षित ठेव कप्पा, (लॉकरची सोय देणे)
3) हमीपत्र, पतपत्र देणे :- शेअर्स, घर विक्री,
वस्तूंची खरेदी विक्री यासाठी खातेदारांना हमीपत्र देते .
4) परकीय चलनाचा व्यवहार करणे.
5) एटीएम सुविधा देणे :- (ATM = Automatic
Teller Machine ) एटीएम याला
मराठीत स्वयंचलित गणक यंत्र म्हणतात. बँका खातेदाराला त्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड या प्लास्टिकच्या
स्वरूपातील कार्डचा वापर करून एटीएम मशीनच्या साह्याने पैसे काढायची सोय देते, यालाच “प्लास्टिक पैसा” असे म्हणतात.
6) विविध माहिती व आकडेवारी गोळा
करणे व प्रकाशित करणे.
bansodesirvs.blogspot.com
C) पतनिर्मिती किंवा पतपैसा
निर्माण करणे :- व्यापारी बँकेत ठेवीदार ठेवी जमा करतात याला “प्राथमिक ठेवी” म्हणतात. व्यापारी बँका नफा मिळवण्यासाठी या ठेवी गरजू
लोकांना योग्य तारण घेऊन कर्ज देऊन बँकेत त्याच्या खात्यात पैसे जमा करतात. याला “दुय्यम ठेवी” म्हणतात. पद्धतीने कर्ज देऊन जो पैसा
व्यवहारात आणला जातो त्याला “पतपैसा” असे म्हणतात. या पद्धतीने व्यापारी बँका नफा मिळवण्यासाठी कर्ज
देऊन जमा ठेवीच्या 5 पट पतपैसा व्यवहारात आणू शकतात.
अर्थशास्त्र विषयासाठी माझ्या पुढील यूट्यूब
चैनल लिंकला क्लिक करून अवश्य भेट द्या व सबस्क्राईब कर. 👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
धन्यवाद,
बनसोडे सर व्ही एस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know