एकूण खर्च ! स्थिर खर्च ! बदलता खर्च ! सरासरी खर्च व सीमांत खर्च म्हणजे काय ? ! सूत्र ! उत्पादन खर्चाच्या संकल्पना !
प्रत्येक उत्पादकाला वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या उत्पादक घटकांचा वापर करून त्यांना मोबदला द्यावा लागतो या उत्पादक घटकांवर येणाऱ्या खर्चाला उत्पादन खर्च म्हणतात. उत्पादकांना प्रामुख्याने पुढील तीन प्रकारचे उत्पादन खर्च येतात.
1) एकूण खर्च :-
उत्पादकाने उत्पादनासाठी वापरलेले उत्पादक घटकांना दिलेल्या मोबदल्यावरील खर्च म्हणजे एकूण खर्च होय. किंवा एका विशिष्ट वेळी उत्पादकाने उत्पादनासाठी केलेला एकूण स्थिर खर्च व एकूण बदलता खर्च यांची बेरीज म्हणजेच एकूण खर्च होय.
एकूण खर्च पुढील सूत्राने काढता येतो
एकूण खर्च = एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च.
उदा. 20 खुर्ची तयार करण्यासाठी 400 ₹ स्थिर खर्च 400 ₹ बदलता खर्च आला यांची बेरीज केल्यास एकूण खर्च 800 ₹ येतो.
अ) स्थिर खर्च :- वस्तूंच्या उत्पादनासाठी जे उत्पादनाचे घटक एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पुन्हा पुन्हा वापरता येतात त्यांच्यावरील खर्च म्हणजे स्थिर खर्च होय.
उदा. जमीन, यंत्रसामुग्री, इमारत, कायम कामगार इत्यादी स्थिर घटक होय.
ब) बदलता खर्च :- उत्पादनासाठी जे घटक सततत खरेदी करावे लागतात त्या घटकांवरील खर्चाला बदलता खर्च म्हणतात.
उदा. कच्चामाल, हंगामी कामगार, वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधन खर्च हे घटक उत्पादन करताना सतत नव्याने खरेदी करावी लागतात यावरील खर्चाला बदलता खर्च म्हणतात.
2) सरासरी खर्च :-
उत्पादनाच्या प्रत्येक नगासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय.एकूण खर्चाला एकूण नगसंखेने भागल्यास सरासरी खर्च समजून येतो.
सरासरी खर्च काढण्यासाठी पुढील सुत्र वापरले जाते.
एकूण खर्च TC
सूत्र :- सरासरी खर्च. AC =-------------------
एकूण नगसंख्या. TQ
उदा. 4 खुर्ची तयार करण्यासाठी 400 ₹ एकूण खर्च आल्यास
400
सूत्रानुसार सरासरी खर्च =--------------. = 100 ₹ येईल.
4
3) सिमांत खर्च. :- वस्तूच्या उत्पादनात एक नगाने वाढ केल्यानंतर उत्पादनखर्चात जी वाढ होते त्याला सीमांत खर्च म्हणतात. उत्पादनात एक नगाने वाढ केल्यानंतर आलेल्या एकूण खर्चातून आधीचा एकूण खर्च वजा करून सीमांत खर्च काढला जातो.
सीमांत खर्च पुढील सूत्राने काढता येतो. येतो.
सूत्र :-
सीमांत खर्च = एक नगाने वाढ केल्यानंतर आलेल्या एकूण खर्च -आधीचा एकूण खर्च MC. = TCn. - TCn-1
उदा. 4 खुर्ची तयार करण्यासाठी 400 ₹ एकूण खर्च आला. उत्पादनात 1 नगाने वाढ करून 5 खुर्ची तयार केल्यास एकूण खर्च 450 ₹ आला तर सूत्रानुसार सीमांत खर्च. =. 450 – 400 =. 50. ₹ सीमांत खर्च येईल.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know