मुख्य सामग्रीवर वगळा

ठेवींचे प्रकार कोणते ? चालू खाते ! बचत ठेव ! मुदत ठेव ! आवर्ती ठेव ! Current account ! Savings Account ! Fixed Deposit ! Recurring Deposit !

बँकांमधील ठेवींचे प्रकार :-   ( चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव व आवर्ती ठेव खाते म्हणजे काय?)

व्यापारी बँका लोकांची बचत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, लोकांची गरज विचारात घेऊन पुढील विविध प्रकारची खाती किंवा ठेवी उघडण्याची सोय देतात.        

1)  चालू खाते :- ज्या खात्यावर दिवसातून कितीही वेळा पैसे काढता येतात व जमा करता येतात त्याला चालू खाते म्हणतात. 

व्यापारी, कारखानदार, दलाल अशा लोकांना हे चालू खाते उपयोगी पडते. दररोज त्यांची उलाढाल मोठी असते. चालू खात्यावर व्यापारी बँक खातेदाराची व्यवहार व पत बघून जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची सोय देतात. चालू खात्यावर व्याजदर शून्य असतो.

      2) बचत खाते :- ज्या खात्यातून आठवड्याला तीन ते चार वेळा पैसे काढता येतात व जास्त रक्कम काढण्यासाठी बँकेला पूर्वसूचना द्यावी लागते अशा खात्याला बचत खाते म्हणतात. 

      बहुसंख्य सामान्य लोक, नोकरदार यांना बचत खाते उपयोगी पडते. बचत खात्यावर बँका वर्षाला चार टक्के व्याज देतात.  

     3) मुदत ठेव खाते :- विशिष्ट मुदतीसाठी बँकेत ज्या खात्यावर पैसे ठेवता येतात त्याला मुदत ठेव असे म्हणतात. लोकांना 15 दिवस ते 1,2,3,5,8 वर्ष मदतीसाठी मुदत ठेव ठेवता येते.

      मुदत ठेवी वर सर्वात जास्त व्याज मिळते. ठेवीची मुदत वाढत असताना बँक ठेवीदाराला जास्त व्याजाचे आमिष दाखवतात. कारण मुदतीच्या आत या खात्यावरील पैसे ठेवीदाराला काढता येत नाहीत. त्यामुळे हा पैसा व्यापार बँक गरजू लोकांना कर्ज देऊन नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र ठेवीदाराला गरज पडल्यास मुदत ठेव त्याला मोडता येते किंवा त्यावर कर्ज घेता येते.  

       4) आवर्ती ठेव खाते :-  (Recurring Deposit Account - RD )  दर महिन्याला विशिष्ट रक्कम ज्या खात्यावर जमा करण्याची सोय बँका देतात त्याला आवर्ती ठेव खाते म्हणतात

       दर महिन्याला कमीत कमी 100 रुपये व त्या पटीत लोकांची बचत जमा करण्यासाठी बँका एक वर्षाला पासून पुढील मुदतीसाठी आवर्ती ठेव खात्याची सोय देतात. यामुळे लोकांना बचतीची सवय लागते. या खात्यावर ही खातेदाराला जास्त व्याज मिळते.

        =====================================

माझ्या पुढील युट्युब चॅनल  लिंकवर क्लिक करून अर्थशास्त्रावरील व्हिडिओ पहा.

                        👇

      https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ

========================================

                -:  English Translation :-   

     Types of bank deposits : -

                Commercial banks offer a wide variety of  accounts or deposits to attract people's savings, keeping in mind the needs of the people. 

 11) Current account : - The account on which money can be withdrawn and deposited any number of times is called current account. This current account is useful to people like traders, manufacturers, brokers. Their daily turnover is huge. On the current account, the merchant bank allows the account holder to withdraw more than the deposit amount by looking at the transaction and credit. The interest rate on the current account is zero. 

    2) Savings Account : - The account from which you can withdraw money three to four times a week and have to give advance notice to the bank to withdraw more amount is called savings account. Savings accounts are useful to most ordinary people, employees. Banks pay four per cent interest per annum on savings accounts.

    3) Fixed Deposit Account : - The account on which money can be deposited in the bank for a specific period is called term deposit. People can keep a term deposit for 15 days to 1,2,3,5,8 years. The highest interest is earned on term deposits. As the term of the deposit increases, the banks entice the depositor with higher interest rates. This is because the depositor cannot withdraw money from this account within the time limit. So this money the trade banks try to make a profit by lending to the needy. However, if the depositor needs, he can break the term deposit or take a loan on it.

     4) Recurring Deposit Account : - The account on which the banks provide the facility to deposit a certain amount every month is called Recurring Deposit Account. Banks offer recurring deposit accounts for a period of one year to a minimum of Rs. This makes people accustomed to saving. The account holder gets higher interest on this account.

======================================

      From :-

     Bansode Sir V S

      Economics

टिप्पण्या

Popular Posts

मागणी म्हणजे काय ? व मागणी चे प्रकार

 प्रश्न.  :- मागणी म्हणजे काय ? प्रश्न.    :- मागणी म्हणजे केवळ इच्छा नव्हे स्पष्ट करा. उत्तर :-  प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मागणी याचा अर्थ एखाद्या वस्तूची इच्छा कसा घेतला जातो मात्र अर्थशास्त्रामध्ये इच्छा म्हणजे मागणी नाही. तर अर्थशास्त्रात मागणी ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी पुढील तीन अटी पूर्ण होणे आवश्यक असते. 1)  वस्तू खरेदीची इच्छा. + 2)  वस्तूच्याकिमती एवढे पैशाचे पाठबळ  + 3)  पैसा खर्चाची तयारी . याला मागणी म्हणतात.   या पद्धतीने प्रत्यक्षात पैसे खर्च करून ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यास त्याला मागणी असे म्हणतात उदा. आपल्याला पेन खरेदी ची इच्छा झाली व पेनच्या किमती एवढे पैसे दहा रुपये दुकानदाराला देऊन प्रत्यक्षात पेन खरेदी केल्यास त्याला मागणी असे म्हणतात. त्यामुळेच   प्रा. मेअर्स यांच्या मते, " एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात." यावरून केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे हे आपणास स्पष्ट करता येते..... प्रश्न  :-      मागणीचे प्रकार ...

मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार ! मागणीची उत्पन्न लवचिकता ! मागणीची छेदक लवचिकता ! मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार !

                 मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अर्थशास्त्रात सर्वप्रथम डॉ. मार्शल यांनी मांडली. मागणीचा सिद्धांत मांडल्यानतर त्यावर आधारित ही संकल्पना त्यांनी मांडली. प्रश्न :- मागणीच्या लवचिकतेची व्याख्या:- वस्तूची किंमत ,लोकांचे उत्पन्न , तसेच इतर वस्तूंची किंमत बदलल्यानंतर एखाद्या वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्यानुसार एखाद्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात बदलत असल्यास जास्त लवचिक मागणी व कमी प्रमाणात बदल्यात असल्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. प्रश्न :-मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :- मागणीच्या लवचिकतेचे पुढील तीन प्रकार पडतात 1) उत्पन्न लवचिकता :- लोकांचे उत्पन्न बदलल्यानंतर त्यांच्याकडून वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते                           मागणीतील शेकडा बदल  उत्पन्न लवचिकता=----------------------------   ...

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !

प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा           # सिद्धांताची गृहिते   #  सिद्धांताचे अपवाद          # सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा        #किंवा र्‍हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा उत्तर :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे . # सिद्धांताची व्याख्या :-  डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.  वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. @ तक्ता आणि स्‍पष्‍टीकरण :- ...

मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम ! मागणीच्या सिद्धांताची गृहीते ! मागणीच्या सिद्धांताचे अपवाद ! Theory of Demand in Marathi ! Assumptions of Theory of Demand in Marathi

  प्रश्न :- मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा प्रश्न :-  मागणीच्या सिद्धांताची गृहीते व अपवाद स्पष्ट करा उत्तर:- अर्थशास्त्रात  1890 मध्ये प्रा.  अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत आपल्या  "अर्थशास्त्राची मूलतत्वे " या ग्रंथात मांडला या सिद्धांतात त्यांनी वस्तूची किंमत बदलल्यास ग्राहक आपल्या वस्तूचा मागणीत कसा बदल घडवून आणतो ते स्पष्ट केलेले आहे.  # सिद्धांताची व्याख्या  :- अल्फ्रेड मार्शल यांच्या मते,  "इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत  वाढल्यास मागणीचा संकोच होतो व किंमत कमी झाल्यास मागणीचा विस्तार होतो" वरील व्याख्येवरून मागणीचा सिद्धांतात लोकांचे उत्पन्न, अपेक्षा ,आवडीनिवडी ,पर्यायी वस्तूची किंमत इत्यादी परिस्थिती स्थिर असताना ग्राहक किंमत वाढल्यास मागणी कमी करतो व किंमत कमी झाल्यास मांडली वाढवतो म्हणजेच किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीतील बदल करतो यावरून किंमत व मागणी यांच्यातील संबंध व्यस्त किंवा परस्परविरोधी असतो हे त्यांनी या सिद्धांतात स्पष्ट केले.  ## मागणीपत्रकाने स्पष्टीकरण :-  ## आकृतीने  स्पष्टीकरण :- अशा...

उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /

प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ? कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय. उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते  त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू,  घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास,  पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता,  तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे,  टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्...

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? | सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ! definition of Micro Economics

✓सूक्ष्म अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:-.( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र)     (Micro ECONOMICS ) ✓सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत   Micro Economics म्हणतात.  यातील  Micro हा शब्द ग्रीक भाषेतील  Mikros   या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ लहान भाग किंवा दशलक्षवा भाग असा होतो  यावरून   सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या  अंशाचा अभ्यास केला जातो  सूक्ष्म अर्थशास्त्राच्या  पुढील व्याख्या सांगता येतात.       १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्‍थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्‍हणजे सूक्ष्म अर्थशास्‍त्र होय.” २) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,  विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय". ३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्‍त्राद्‌वारे, अर्थव्यवस्‍थेकडे सूक्ष्म दर्शकाद्‌वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्‍थारूपी शरीरातील लाखो पेशी म्‍हणजे व्यक्‍ती ,कुटुंबे , उ...

अर्थशास्त्र 12 वी ऑनलाईन सराव परीक्षा.

अर्थशास्त्र 12 वी     ( कला व वाणिज्य शाखा ) ऑनलाईन सराव परीक्षा  (वस्तुनिष्ठ एकूण प्रश्न 20  एकूण गुण 20) विद्यार्थी मित्रांनो, आपले गुण लगेच कळतील ========================= प्रकरण 5 - बाजाराचे प्रकार  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/1x5I7eLs8YJDtDGgXIdF4q7P6eLClFwJtS7DeTA7yxlI/edit ======================== प्रकरण 4 - पुरवठा विश्लेषण  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe95KaNbaCCsOuXR6buxXPFFNmFfHeSIZB36FpEO1n18hLpCA/viewform ==========================    प्रकरण 1 -  सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची ओळख 1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeVQiCplFmCmZTfWDmbsmccaO6Mme2IuFDCmfNkaRBhmh3yfw/viewform https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdL4kqInwqApz9Klf7Oro7tTtvHfFoGqeximXJjeumIbwzDbA/viewform 2) ऑनलाइन सराव परीक्षा क्रमांक - 2  प्रकरण 1- सूक्ष्म...

स्वाध्याय 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय !12th Economics Chapter 2 Utility Analysis full solved excercise in Marathi ! class12 Economics !

 बारावी अर्थशास्त्र प्रकरण-2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय या माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे.👇 https://youtu.be/SPwuSPpzJXw To join my Telegram Channel Link 👇 👉.    https://t.me/Economicsvsb Thanks Bansode Sir V S Subject- Economics