स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ! समग्रलक्षी अर्थशास्त्र व्याख्या ! Meaning and definition of Macro Economics
✓स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ ,व्याख्या:-.
( समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र)
(Macro ECONOMICS)
✓स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ ,व्याख्या:-
✓स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Macro Economics म्हणतात. यातील Macro हा शब्द ग्रीक भाषेतील Makros या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ मोठा भाग असा होतो यावरून स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व मोठ्या घटकाचा अभ्यास केला जातो . स्थूल अर्थशास्त्राच्या पुढील व्याख्या सांगता येतात..
1) प्रा. कॅनेथ बोल्डिंग -
यांच्या मते- " समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध, वैयक्तिक परिमाणाची नसून एकूण परिणामांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो.
2) प्रा. जे. एल. हॅन्सन
यांच्या मते," स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो."
3) प्रा. कार्ल शॅपिरो :-
यांच्या मते "स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे".
यावरून समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो 1929 ते1933 महामंदीनंतर लाॅर्ड केन्स यांनी त्यावर 1936 मध्ये ग्रंथ :-"पैसा व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत "मांडून उपाय सुचऊन स्थूल अर्थशास्त्रची सूरूवात केली.
✓स्थूल अर्थशास्त्राचा आणखी व्याख्या
4)प्रा. सॅम्युअल्सन :-
यांच्यामते," संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतात "
5) प्रा. फिशर :-
यांच्यामते "ज्या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील आर्थिक तेजी-मंदी, वस्तू व सेवांचे एकूण उत्पादन, उत्पादनात होणारी वाढ , बेकारी इत्यादी अर्थव्यवस्थेतील समग्र मोठ्या घटकांमधील आर्थिक बदलांचा अभ्यास केला जातो त्याला समग्र अर्थशास्त्र म्हणतात.
6) प्रा.अँक्ले:-
यांच्या मते "अर्थशास्त्राच्या ज्या विभागात अर्थव्यवस्थेतील मोठ्या किंवा व्यापक आर्थिक घटकांचा व घडामोडींचा सर्व बाजूंनी अभ्यास केला जातो त्याला समग्र अर्थशास्त्र म्हणतात".
............................ महत्वाचे प्रश्न.................
1)स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ ,व्याख्या:-.
( समग्रलक्षी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र)
(Macro ECONOMICS)
2)स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Macro Economics म्हणतात. यातील Macro हा शब्द ग्रीक भाषेतील Makros या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ मोठा भाग असा होतो
3)सहसंबंध पूर्ण करा:- समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राचा संबंध, वैयक्तिक परिमाणाची नसून एकूण परिणामांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो.
4) स्थूल अर्थशास्त्राची सुरुवात लोर्ड जॉन मेनार्ड केन्स यांनी केली त्यांनी 1929 -1933 जागतिक महामंदी नंतर 1936 मध्ये "पैसा, व्याज, व रोजगार विषयक सर्वसाधारण सिद्धांत" हा ग्रंथ मांडला
5)स्थूलू अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे.
6)समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अशी शाखा आहे की ज्यात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रातील बदल अशा मोठ्या, समग्र घटकांचा मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो
12th micro economics meaning and definition / for these contents click my YouTube video link👇
👉 https://youtu.be/4mOqMDDxV1sTo join my Telegram Channel Link👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know