उपयोगिता प्रकार ! Class12 Economics chapter 2 Types of Utility in Marathi ! Total Utility and Marginal Utility ! 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगितेचे प्रकार
प्रश्न :- उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा
उत्तर:- उपयोगितेचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात
1) रूप किंवा स्वरूप उपयोगिता:-
एखाद्या वस्तूचे मूळ जुने रूप बदलून तिला नवीन रूप किंवा स्वरूप दिल्यामुळे त्या वस्तूत जी उपयोगिता निर्माण होते तिला रूप उपयोगिता म्हणतात .
उदा. लाकडाचे रूप बदलून त्या पासून खुर्ची ,टेबल, दरवाजा, मूर्ती ,खेळणी तयार करणे तसेच माती पासून विविध भांडी, मूर्ती, खेळणी तयार केल्यास त्याला रूप उपयोगिता म्हणतात.
2) स्थल उपयोगिता :-
एखाद्या वस्तूचे स्थळ बदलले किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात.
उदा. जंगलातील लाकडी ओंडके, खनिजे शहरी भागात आणले तसेच समुद्र, नदीकाठची वाळू ,नदीतील मासे शहरी भागात आणल्यास त्या वस्तूला जास्त किंमत मिळते उपयोगिता वाढते याला स्थळ उपयोगिता म्हणतात.
3) काल उपयोगिता :-
काळ बदलल्याने किंवा हंगाम बदलल्याने वस्तूंमध्ये उपयोगिता निर्माण होते तेव्हा त्यास काल उपयोगिता म्हणतात.उदा. पावसाळ्यात रेनकोट, छत्री मध्ये हिवाळ्यात लोकरीचे कपडे तर उन्हाळ्यात पंखा, कुलर या वस्तूंमध्ये काल उपयोगिता निर्माण होते तसेच वस्तू साठवून ती दुर्मिळ झाल्यावर त्याचा आवश्यकतेनुसार पुरवठा करणे यालाही काळ उपयोगिता म्हणतात उदा.रक्तपेढी.
4) सेवा उपयोगिता :-
समाजातील विविध व्यावसायिकांकडून सेवा पुरविल्या जातात त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होतात याला सेवा उपयोगिता म्हणतात.
उदा. वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, गायक ,व्यापारी ,टेलिफोन ,बँक, विमा, पोस्ट व तार सेवा ,रस्ते व रेल्वे वाहतूक यापासून सेवा उपयोगिता मिळते..5) ज्ञान उपयोगिता :-
जेव्हा व्यक्तीला एखाद्या वस्तूबद्दल ज्ञान मिळते किंवा माहिती मिळते तेव्हा त्या वस्तूचा वापर वाढतो यातून जीव फिरता मिळते त्याला ज्ञान उपयोगिता म्हणतात.
उदा. विद्यार्थ्याला मोबाईल तसेच संगणक याचे ज्ञान व माहिती झाल्यास त्याचा वापर वाढतो व त्याला ज्ञान उपयोगिता मिळते.
6) स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता :-
वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित झाल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला मालकी मुळे त्या वस्तू पासून उपयोगिता मिळते तिला स्वामित्व उपयोगिता म्हणतात.
उदा. विक्रेत्याकडून ग्राहकाने पेन, वही, पुस्तक ,घड्याळ या वस्तू खरेदी केल्यास त्या वस्तूवर ग्राहकांची मालकी निर्माण होऊन त्याला मालकी उपयोगिता मिळते...
उपयोगितेचे प्रकार याविषयी माझं युट्युब वरील व्हिडिओची लिंक पुढे दिलेले आहे त्यावर क्लिक करा. 👇
👉. https://youtu.be/QXRR4sO5vKk
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know