मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गिफेन च्या वस्तू किंवा गिफेन यांचा विरोधाभास ! Giffens paradox in Marathi

  प्रश्न :- गिफेन च्या वस्तू किंवा  गिफेन चा विरोधाभास म्हणजे काय ? उत्तर :- इंग्लंड  मधील अर्थतज्ञ प्राध्यापक रॉबर्ट गिफेन यांनी गरीब लोक ज्या वस्तू खरेदी करतात त्यांना मागणीचा सिद्धांत दिसत नाही हे त्यांनी स्पष्ट केले   #  सिद्धांताची व्याख्या :- गिफेन यांच्या मते पाव ,मका ,मातीची भांडी, बाजरी अशा कमी किमतीच्या हलक्या कनिष्ठ प्रतीच्या वस्तू बाबत गरीब लोक किंमत कमी झाल्यास मागणी कमी करतात व किंमत वाढल्यास मागणी वाढवतात म्हणजेच गिफेन च्या या वस्तू बाबत किंमत व मागणी यांच्यात सम संबंध असतो हे त्यांनी स्पष्ट केले  म्हणजेच गिफेन यांनी मागणीच्या सिद्धांताच्या विरोधी उदाहरण दाखवून दिले त्यामुळे  त्यांनी सांगितलेल्या कनिष्ठ प्रतीच्या हलक्‍या वस्तूंना अर्थशास्त्रात गिफेन च्या वस्तू म्हणतात व यालाच गिफेन चा विरोधाभास म्हणतात ## तक्त्याने स्पष्टीकरण :- ## आकृतीने स्पष्टीकरण :- अशाप्रकारे गिफेन चा विरोधाभास आपणास तक्तता आकृतीने स्पष्ट करता येतो .

मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम ! मागणीच्या सिद्धांताची गृहीते ! मागणीच्या सिद्धांताचे अपवाद ! Theory of Demand in Marathi ! Assumptions of Theory of Demand in Marathi

  प्रश्न :- मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा प्रश्न :-  मागणीच्या सिद्धांताची गृहीते व अपवाद स्पष्ट करा उत्तर:- अर्थशास्त्रात  1890 मध्ये प्रा.  अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत आपल्या  "अर्थशास्त्राची मूलतत्वे " या ग्रंथात मांडला या सिद्धांतात त्यांनी वस्तूची किंमत बदलल्यास ग्राहक आपल्या वस्तूचा मागणीत कसा बदल घडवून आणतो ते स्पष्ट केलेले आहे.  # सिद्धांताची व्याख्या  :- अल्फ्रेड मार्शल यांच्या मते,  "इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत  वाढल्यास मागणीचा संकोच होतो व किंमत कमी झाल्यास मागणीचा विस्तार होतो" वरील व्याख्येवरून मागणीचा सिद्धांतात लोकांचे उत्पन्न, अपेक्षा ,आवडीनिवडी ,पर्यायी वस्तूची किंमत इत्यादी परिस्थिती स्थिर असताना ग्राहक किंमत वाढल्यास मागणी कमी करतो व किंमत कमी झाल्यास मांडली वाढवतो म्हणजेच किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीतील बदल करतो यावरून किंमत व मागणी यांच्यातील संबंध व्यस्त किंवा परस्परविरोधी असतो हे त्यांनी या सिद्धांतात स्पष्ट केले.  ## मागणीपत्रकाने स्पष्टीकरण :-  ## आकृतीने  स्पष्टीकरण :- अशा...

एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता फरक ! एकूण उपयोगिता ! सीमांत उपयोगिता ! Total Utility and Marginal Utility difference in Marathi ! Class12 Economics ! Arts and Science

प्रश्न  :-एकूण उपयोगिता (TU) व सीमांत उपयोगिता यांच्यातील (MU) फरक किंवा परस्परसंबंध स्पष्ट करा :  उत्तर :- यातील फरक किंवा परस्परसंबंध आपणास पुढील तक्त्यावरून स्पष्ट करता येतो.        वरील  तक्त्यानुसार :-  एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यातील फरक किंवा संबंध आपणास पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट करता येतो. 1) व्याख्या :-  सीमांत उपयोगिता म्हणजे," व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वाढवलेल्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय याउलट एकूण उपयोगिता म्हणजे ,"वस्तूच्या साठ्यातील सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगीतेची बेरीज किंवा साठ्यातील  वाढीव नगांपासून मिळणाऱ्या सीमांत उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय".    2) वतूच्यासाठ्यातील पहिल्या नगाच्या वेळेस मिळणारी सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता समान असते.(TU=MU) 3) वस्तूचा साठा वाढत असताना त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता सुरूवातीपासूनच घटत जाते तर एकूण उपयोगिता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत घटत्या दराने वाढत...

बारावी अर्थशास्त्र वार्षिक बोर्ड प्रश्नपत्रिका स्वरूप ! 12 th Economics - new question paper format in Marathi ! Class12 Economics Annual question paper format !

                       बारावी अर्थशास्त्र          (Arts& Commerce )         नवीन वार्षिक बोर्ड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप   पुणे महाराष्ट्र बोर्ड   लेखी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप.           एकूण  गुण -80   प्रश्न क्र. 1. वस्तुनिष्ठ प्रश्न            एकूण गुण(20)     अ).     (05) प्रश्र्न                           (05) गुण               ब).     (05) प्रश्र्न                            (05) गुण      क).     (05) प्रश्र्न                           (05) गुण ड).      ...

स्वाध्याय 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय !12th Economics Chapter 2 Utility Analysis full solved excercise in Marathi ! class12 Economics !

 बारावी अर्थशास्त्र प्रकरण-2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय या माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे.👇 https://youtu.be/SPwuSPpzJXw To join my Telegram Channel Link 👇 👉.    https://t.me/Economicsvsb Thanks Bansode Sir V S Subject- Economics

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !

प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा           # सिद्धांताची गृहिते   #  सिद्धांताचे अपवाद          # सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा        #किंवा र्‍हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा उत्तर :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे . # सिद्धांताची व्याख्या :-  डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.  वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. @ तक्ता आणि स्‍पष्‍टीकरण :- ...

उपयोगिता प्रकार ! Class12 Economics chapter 2 Types of Utility in Marathi ! Total Utility and Marginal Utility ! 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगितेचे प्रकार

   प्रश्न  :- उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा उत्तर:- उपयोगितेचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात 1) रूप किंवा स्वरूप उपयोगिता:- एखाद्या वस्तूचे मूळ जुने रूप बदलून तिला नवीन रूप किंवा स्वरूप दिल्यामुळे त्या वस्तूत जी उपयोगिता निर्माण होते तिला रूप उपयोगिता म्हणतात . उदा. लाकडाचे रूप बदलून त्या पासून खुर्ची ,टेबल, दरवाजा, मूर्ती ,खेळणी तयार करणे तसेच माती पासून विविध भांडी, मूर्ती, खेळणी तयार केल्यास  त्याला रूप उपयोगिता म्हणतात. 2) स्थल उपयोगिता :- एखाद्या वस्तूचे स्थळ बदलले किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यामुळे त्या वस्तूची उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात. उदा. जंगलातील लाकडी ओंडके, खनिजे शहरी भागात आणले तसेच समुद्र, नदीकाठची वाळू ,नदीतील मासे शहरी भागात आणल्यास त्या वस्तूला जास्त किंमत मिळते उपयोगिता वाढते याला स्थळ उपयोगिता म्हणतात.  3) काल उपयोगिता :-  काळ बदलल्याने किंवा हंगाम बदलल्याने वस्तूंमध्ये उपयोगिता निर्माण होते तेव्हा त्यास काल उपयोगिता म्हणतात.उदा. पावसाळ्यात रेनकोट, छत्री मध्ये हिवाळ्यात लोकरीचे कपडे तर उन्हाळ्यात...

उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /

प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ? कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय. उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते  त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू,  घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास,  पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता,  तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे,  टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्...