एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता फरक ! एकूण उपयोगिता ! सीमांत उपयोगिता ! Total Utility and Marginal Utility difference in Marathi ! Class12 Economics ! Arts and Science
प्रश्न :-एकूण उपयोगिता (TU) व सीमांत उपयोगिता यांच्यातील (MU) फरक किंवा परस्परसंबंध स्पष्ट करा :
उत्तर :-
यातील फरक किंवा परस्परसंबंध आपणास पुढील तक्त्यावरून स्पष्ट करता येतो.
वरील तक्त्यानुसार :-
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यातील फरक किंवा संबंध आपणास पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट करता येतो.
1) व्याख्या :-
सीमांत उपयोगिता म्हणजे," व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वाढवलेल्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय
याउलट एकूण उपयोगिता म्हणजे ,"वस्तूच्या साठ्यातील सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगीतेची बेरीज किंवा साठ्यातील वाढीव नगांपासून मिळणाऱ्या सीमांत उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय".
2) वतूच्यासाठ्यातील पहिल्या नगाच्या वेळेस मिळणारी सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता समान असते.(TU=MU)
3) वस्तूचा साठा वाढत असताना त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता सुरूवातीपासूनच घटत जाते तर एकूण उपयोगिता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत घटत्या दराने वाढत जाते.
4) ज्यावेळेस, सीमांत उपयोगिता शून्य (00) होते, त्यावेळेस एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते. याठिकाणी सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू दिसतो. (TU ⬆️--MU 00) येथे व्यक्ती वस्तूचा उपभोग घेणे थांबवतो
5) ज्यावेळेस ,सीमांत उपयोगिता वजा (-) किंवा ऋणात्मक होऊ लागते, तेव्हा एकूण उपयोगिता कमी होत जाते.(TU⬇️--MU ⛔)गरजेपेक्षा जास्त वस्तूचा उपभोग वाढल्याने असमाधान वाढते.
अशाप्रकारे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यातील फरक स्पष्ट करता येतो
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यातील फरक स्पष्ट करणारा माझा युट्युब वरील व्हिडीओ पुढील लिंक वर दिलेला आहे लिंक क्लिक करावी. 👇
To join my Telegram Channel👇
धन्यवाद
बनसोडे सर व्ही. एस.
विषय अर्थशास्त्र
Mala he purn samjle
उत्तर द्याहटवा