सरकारचे करेतर उत्पन्नाचे मार्ग :-
Sources of non-tax revenue for the government :-
देशातील सरकारला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराबरोबरच इतर मार्गांनीही उत्पन्न मिळत असते हे करेतर उत्पन्नाचे मार्ग पुढीलप्रमाणे.
( कर हे सक्तीचे देणे असते तर करेतर उत्पन्न हे सरकारने नागरिकांना दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून उत्पन्न द्यावे लागते.)
1) शुल्क :-
सरकार लोकांना शिक्षण, स्वच्छता, आरोग्य सोयी इत्यादी सेवा पुरविते त्यासाठी प्रत्येक नागरिकाकडून शुल्क वसूल करते.
उदाहरणार्थ :- नोंदणी शुल्क, शैक्षणिक शुल्क इत्यादी.
2) विशेष अधिभार :-
काही भागात नागरिकांना सरकार विशेष सुविधा पुरवते, त्यासाठी जो मोबदला म्हणून त्यांच्याकडून जे उत्पन्न वसूल करते त्याला विशेष अधिभार म्हणतात. उदाहरणार्थ :- रस्ते, ड्रेनेज, पाणी व वीज पुरवठा, स्वच्छता सोयी इत्यादी.
<3) विशेष कर :-
सिगारेट, तंबाखू, मद्य व इतर मादक वस्तूंवर सरकार विशेष कर आकारते. या वस्तूंवर कर वाढवून किमती वाढल्यास लोकांनी त्या वस्तू वस्तूंची खरेदी कमी केल्यास लोकांचे हित होईल असा सरकारचा उद्देश असतो.
>4) दंड व दंडात्मक रकमा :-
लोकांनी नियम, कायदे पाळावेत यासाठी नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. यापासूनही सरकारला उत्पन्न मिळते.
उदाहरणार्थ :- वाहतुकीचे नियम मोडणे, अतिक्रमण करणे इत्यादी.
5) भेटवस्तू, देणग्या व अनुदाने :-
देशातील व विदेशातील लोक, व्यक्ती, संस्था, सरकार, बँकां यांच्याकडून सरकारला भेटवस्तू, अनुदाने व देणग्या मिळतात. यापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
6) कर्ज :-
सरकारला आज विविध मोठी कार्ये करण्यासाठी कर्ज हे एक उत्पन्नाचे साधन झालेले आहे. देशातील व विदेशातील लोकांकडून, सरकारकडून, बँकांकडून सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेते.
7) सार्वजनिक उद्योग वस्तू व सेवांची विक्री :-
भारतासारख्या देशात सरकार स्वतः विविध उद्योग चालवून वस्तू व सेवांची विक्री करत असते. त्यापासून सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ :- भारतात सरकारला रेल्वे, बँक, पोस्ट, विमा, दूरदर्शन, टेलिफोन इत्यादी अनेक व्यवसायांपासून उत्पन्न मिळते.
अशा प्रकारे सरकारला वरील अनेक करेतर मार्गाने उत्पन्न मिळते.
धन्यवाद
बनसोडे सर व्ही. एस.
===============================
English Translation
Sources of non-tax revenue for the government:-
Apart from direct and indirect taxes, the government of the country gets income through other means as well.
(Tax is a compulsory payment whereas non-taxable income is income to be paid by the government as a reward for the services provided to the citizens.)
1) Fees :-
The government collects fees from every citizen for providing services like education, sanitation, health facilities etc. to the people. For example registration fee, education fee etc.
2) Special Surcharge :-
In some areas, the government provides special facilities to citizens, for which the income it collects from them is called special surcharge. For example, roads, drainage, water and electricity supply, sanitation facilities etc.
3) Special Tax :-
The government levies special taxes on cigarettes, tobacco, liquor and other intoxicants. The government's objective is that if the prices increase by increasing taxes on these goods, people will reduce their purchases of those goods.
4) Fine and Penalty Amount :-
In order for people to follow the rules, the government imposes fines on the people who break the rules. The government also gets income from this. For example breaking traffic rules, trespassing etc.
5) Gifts, Donations and Grants :-
The government receives gifts, grants and donations from people, individuals, organizations, governments, banks in the country and abroad. From this the government gets huge income.
6) Loan :-
Debt has become a source of income for the government today to carry out various major functions. The government borrows heavily from the people of the country and abroad, from the government, from the banks.
7) Sale of public goods and services :-
In a country like India, the government itself runs various industries and sells goods and services. The government gets huge income from it. For example in India the government gets income from many businesses like railways, banks, post, insurance, television, telephone etc.
+918983542541b>In this way the government gets income through many of the above non-tax ways.
Thank you
Bansode Sir V. S.
==============================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know