प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर
A) प्रत्यक्ष कर :-
1) सरकारने ज्या व्यक्तीला कर भरण्यासाठी सांगितलेला आहे त्याच व्यक्तीने कर भरला व त्याच्याकडूनच कर वसूल झाल्यास त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात.
2) प्रत्यक्ष कर दुसऱ्यावर ढकलता येत नाही.
3) प्रत्यक्ष करात कराघात व कारभार एकाच व्यक्तीवर पडतो.
4) उदाहरणार्थ :- वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर, घरावरील महापालिकेचा कर इत्यादी
5) उदाहरणार्थ :- सुनील यांच्या पाच लाख रुपये उत्पन्नावर सर्व वजावट जाऊन आलेला कर रुपये 10000/- त्यांनाच भरावा लागतो हा प्रत्यक्ष कर आहे.
B) अप्रत्यक्ष कर :-
1) सरकारने एखादी व्यक्ती किंवा व्यापारी किंवा उद्योगाला कर भरण्यासाठी सांगितल्यानंतर हा कर तो स्वतः न भरता, दुसऱ्यावर ढकलून किंवा दुसऱ्याकडून वसूल करून हा कर भरतो त्यामुळे याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.
2) अप्रत्यक्ष कर दुसऱ्यावर ढकलता येतो.
3) अप्रत्यक्ष करात A व्यक्तीवर कराघात होतो तर B व्यक्ती कारभार घेतो व कर भरतो.
4) उदाहरणार्थ :- आज भारतातील वस्तू व सेवा कर ( GST ) हा अप्रत्यक्ष कर आहे.
5) उदाहरणार्थ :- वस्तू विक्रीत व्यापारी स्वतः GST कर न भरता तो ग्राहकाकडून वसूल करतो. म्हणजेच व्यापाऱ्यावर कराघात होतो मात्र ग्राहक करभार घेऊन कर भरतो. म्हणून याला अप्रत्यक्ष कर म्हणतात.
धन्यवाद
बनसोडे सर व्ही. एस.
================================
English Translation
Direct tax and Indirect tax
A) Direct Taxes :-
1) If the tax is paid by the person whom the government has asked to pay the tax and the tax is collected from him, it is called direct tax.
2) Direct taxes cannot be shifted to others.
3) In direct taxation, taxation and administration falls on a single person.
4) For example :- Personal Income Tax, Wealth Tax, Municipal Tax on House etc
5) For example :- On Sunil's income of five lakh rupees, after all the deductions, he has to pay tax of Rs.10000/- which is direct tax.
B) Indirect Taxes :-
1) After the government asks a person or a businessman or an industry to pay a tax, the tax is paid by paying the tax without paying it himself, pushing it on someone else or collecting it from someone else, so it is called indirect tax.
2) Indirect tax is passable.
3) In indirect tax person A is taxed while person B takes charge and pays the tax.
4) For example :- Goods and Services Tax (GST) in India today is an indirect tax.
5) For example :- In sale of goods the trader collects GST tax from the customer without paying it himself. That is, the trader is taxed, but the consumer pays the tax by bearing the tax. Hence it is called indirect tax.
Thanks
From Bansode Sir V S
=================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know