निती आयोग :- राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था
NITI = National institution for transforming India
भारत सरकारने 2012 ते 2017 या पाच वर्षासाठी बारावी पंचवार्षिक योजना सुरू असताना नियोजन आयोग बंद करून निती आयोगाची निर्मिती केली .
निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 ला करण्यात आली. निती आयोगाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून झाली.
निती आयोग हा आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवणे यासाठी विचार विनिमय करणारा, सल्ला मार्गदर्शन व देखरेख करणारा गट म्हणजेच थिंक टॅंक आहे. निती आयोगाला नियोजन आयोगाप्रमाणे राज्यांसाठी धोरणे बनवणे, लागू करणे, प्रकल्पांना मंजुरी देऊन निधी वाटप करणे याचा अधिकार नाही. निधींचा पुरवठा वित्त मंत्रालयातर्फे केला जातो.
∆ निती आयोगाची उद्देश, कार्य किंवा महत्व :-
1) देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना देशाचा सर्वसमावेशक विकास आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविणे यासाठी राष्ट्रीय विषय पत्रिकेची रचना पुरवणे, मार्गदर्शन, सल्ला देणे.
2) भारत सरकारची धोरणे उत्साहाने राज्याने राबवावी यासाठी सतत त्यांना मार्गदर्शन करणे.
3) विविध धोरणांची अंमलबजावणीवर देखरेख करणे त्याचे परिणाम अभ्यासणे व त्यांचे योग्य मूल्यमापन करणे.
∆ निती आयोगाची रचना:-
1) अध्यक्ष :- भारताचे पंतप्रधान
2) उपाध्यक्ष :- पंतप्रधान नियुक्त
3) पंतप्रधान नियुक्त सदस्य :- पूर्णवेळ पाच व अर्धवेळ दोन सदस्य असतात.
4) विशेष आमंत्रित सदस्य :- विविध विषयांचे तज्ञ यांची निवड पंतप्रधान करतात.
5) मुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधान नेमतात.
=================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know