मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक शास्त्रे व भौतिक शास्त्रे फरक ! Social  Sciences and Natural Sciences

 अ) सामाजिक शास्त्रे ( Social sciences ) म्हणजे काय ? 

उत्तर :- समाजातील मानवी वागणुकीचा, मानवी हालचालींचा,  त्यातील बदलांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.

समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो.

उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. हे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

उदाहरण:-

१) अर्थशास्त्र (Economics ) :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

२) समाजशास्त्र ( SOCIOLOGY) :- मानवाच्या सामाजिक अंतरसंबंधाच्या वागणूक अभ्यास.

३) राज्यशास्त्र ( Political science ) :- राज्यसंस्थेशी असणारा मानवी राजकीय वर्तनाचा अभ्यास.

४) मानसशास्त्र ( Psychology) :- मानवी मनाचा, मानवी वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो.

५) मानववंशशास्त्र ( Anthropology ):- मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास.

६) तर्कशास्त्र ( Logic )

७) इतिहास (History) इ. विषयांचा समावेश होतो.

ब) सामाजिक शास्त्रातील नियम 100% अचूक नसतात :- सामाजिक शास्त्र विषयांमध्ये मानवाच्या वेगवेगळ्या वागणुकीचा अभ्यास करून नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे अनेक नियम किंवा सिद्धांत तज्ञांनी मांडलेले आहेत मात्र हे सिद्धांत १००% अचूक नसतात. कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीचे विचार, बुद्धी, तत्त्वे, आवडीनिवडी, सवयी, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती इ. परिस्थिती वेगवेगळी असते.

क) सिद्धांत खरे करण्यासाठी गृहीते मांडावी लागतात :- समाजातील वरील वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करून मांडलेले नियम सर्वांना लागू करण्यासाठी किंवा हे नियम खरे ठरण्यासाठी गृहिते मांडावीच लागतात. अर्थशास्त्रात मागणीचा नियम, पुरवठाचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम इत्यादी अनेक नियमांमध्ये “इतर परिस्थिती कायम आहे” अशी गृहिते मांडेलेली आहेत.

ड) संपूर्ण समाज हीच प्रयोगशाळा :- सामाजिक शास्त्राचा अभ्यास, नियम किंवा सिद्धांत नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे बंदिस्त प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही, तर संपूर्ण समाज हीच सामाजिक शास्त्र विषयांसाठी एक प्रयोगशाळा असते.

=====================================

भौतिक शास्त्रे / नैसर्गिक शास्त्रे म्हणजे काय ?

Physical  Sciences / Natural Sciences

उत्तर :- ज्या विषयांमध्ये निसर्गातील निर्जीव, जड वस्तूंचा, नैसर्गिक परिस्थितीचा, नैसर्गिक हालचालींचा अभ्यास केला जातो त्यांना नैसर्गिक शास्त्रे असे म्हणतात. नैसर्गिक शास्त्रात पुढील विषयांचा समावेश होतो

उदाहरण:-

रसायनशास्त्र ( Chemistry)

भौतिकशास्त्र (Physics )

जीवशास्त्र ( Biology )

 भूगर्भशास्त्र ( Geology)

भूगोल Geography ) इ. विषयांचा समावेश होतो.

अ) नैसर्गिक शास्त्रातील नियम शंभर टक्के अचूक व कायम टिकणारे असतात. :-

कारण नैसर्गिक शास्त्रात निसर्गातील जड, निर्जीव वस्तूंचा व नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास केला जातो त्यांना स्वतःची मते, व विचार नसतात.

ब) नैसर्गिक शास्त्रातील नियम खरे ठरण्यासाठी गृहिते मांडण्याची आवश्यकता नसते.

क) नैसर्गिक शास्त्रातील नियम सिद्धांत बंदिस्त प्रयोगशाळेत अभ्यासता येतात :- कारण निर्जीव जड वस्तू प्रयोगशाळेत आणून अभ्यास करता येते.

         अशाप्रकारे सामाजिक शास्त्रे व नैसर्गिक शास्त्रे यांचा अर्थ व त्यांच्यातील फरक आपणास स्पष्ट करता येतो

धन्यवाद

बनसोडे सर व्ही. एस.

======================================

English Translation:-

Social  Sciences and Natural Sciences

Question :- What is social science?

 Answer :- All the subjects that study human behavior, human movements and changes in the society are called “Sociology”.

 While living together in society, human beings perform many types of behavior and movements.

 E.g. Economic, social, political, psychological, spiritual, cultural, sports etc. Humans perform many types of movements and behaviors. The study of these different types of human behavior seems to be divided into different disciplines. Accordingly, all disciplines that study these different human behaviors in society are called “social sciences”. These topics are as follows.

 Example:-

1) Economics (Economics):- Humans always try to match between the unlimited needs of human beings and the limited, but alternative means of fulfilling those needs, the question that arises from this is called economic question. This economic behavior of human beings is studied in economics.

2) SOCIOLOGY :- Behavioral study of human social interaction.

3) Political science:- The study of human political behavior related to state institutions.

4) Psychology :- Human mind, human behavior, mental processes are studied.

5) Anthropology:- Study of human evolution.

6) Logic

7) History (History) etc. Topics include:

 A) Laws in social science are not 100% accurate :- In social science subjects many laws or theories are formulated by experts like natural sciences by studying different behavior of human beings but these theories are not 100% accurate. Because the thoughts, intellect, principles, preferences, habits, economic conditions, social conditions etc. Of every person in the society. Situations vary.

B) Assumptions have to be made to make the theory true:- In order to apply the rules laid down by studying the above different human behavior in the society to everyone or for these rules to be true, assumptions have to be made. Law of Demand, Law of Supply, Law of Diminishing Marginal Utility, etc. In economics have several laws that make assumptions of “other things being equal”.

 d) Society as a whole is a laboratory:- Studies, rules or theories of social science cannot be verified in a confined laboratory like natural sciences, but society as a whole is a laboratory for social science subjects.

 =====================================

Question :- What is Physical Science / Natural Science?

 Physical Sciences / Natural Sciences

 Answer :- The subjects in which non-living, heavy objects, natural conditions, natural movements are studied in nature are called natural sciences. Natural sciences include the following sScience

 Example:-. Chemistry,. Physics,. Biology, Geology

 Geography etc. Topics include:

(a) Laws of natural science are 100 percent accurate and permanent. :-

 Because in natural science, heavy, inanimate objects and natural conditions are studied in nature, they do not have their own opinions and thoughts.

(b) Laws of natural science do not require hypotheses to be true.

(c) Laws and theories of natural science can be studied in a closed laboratory:- Because inanimate objects can be studied by bringing them into the laboratory.

 In this way we can explain the meaning of social science and natural science and the difference between them

 Thank you

 Bansode Sir V. S.

 =====================================

टिप्पण्या

Popular Posts

मागणी म्हणजे काय ? व मागणी चे प्रकार

 प्रश्न.  :- मागणी म्हणजे काय ? प्रश्न.    :- मागणी म्हणजे केवळ इच्छा नव्हे स्पष्ट करा. उत्तर :-  प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मागणी याचा अर्थ एखाद्या वस्तूची इच्छा कसा घेतला जातो मात्र अर्थशास्त्रामध्ये इच्छा म्हणजे मागणी नाही. तर अर्थशास्त्रात मागणी ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी पुढील तीन अटी पूर्ण होणे आवश्यक असते. 1)  वस्तू खरेदीची इच्छा. + 2)  वस्तूच्याकिमती एवढे पैशाचे पाठबळ  + 3)  पैसा खर्चाची तयारी . याला मागणी म्हणतात.   या पद्धतीने प्रत्यक्षात पैसे खर्च करून ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यास त्याला मागणी असे म्हणतात उदा. आपल्याला पेन खरेदी ची इच्छा झाली व पेनच्या किमती एवढे पैसे दहा रुपये दुकानदाराला देऊन प्रत्यक्षात पेन खरेदी केल्यास त्याला मागणी असे म्हणतात. त्यामुळेच   प्रा. मेअर्स यांच्या मते, " एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात." यावरून केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे हे आपणास स्पष्ट करता येते..... प्रश्न  :-      मागणीचे प्रकार ...

मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार ! मागणीची उत्पन्न लवचिकता ! मागणीची छेदक लवचिकता ! मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार !

                 मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अर्थशास्त्रात सर्वप्रथम डॉ. मार्शल यांनी मांडली. मागणीचा सिद्धांत मांडल्यानतर त्यावर आधारित ही संकल्पना त्यांनी मांडली. प्रश्न :- मागणीच्या लवचिकतेची व्याख्या:- वस्तूची किंमत ,लोकांचे उत्पन्न , तसेच इतर वस्तूंची किंमत बदलल्यानंतर एखाद्या वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्यानुसार एखाद्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात बदलत असल्यास जास्त लवचिक मागणी व कमी प्रमाणात बदल्यात असल्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. प्रश्न :-मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :- मागणीच्या लवचिकतेचे पुढील तीन प्रकार पडतात 1) उत्पन्न लवचिकता :- लोकांचे उत्पन्न बदलल्यानंतर त्यांच्याकडून वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते                           मागणीतील शेकडा बदल  उत्पन्न लवचिकता=----------------------------   ...

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !

प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा           # सिद्धांताची गृहिते   #  सिद्धांताचे अपवाद          # सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा        #किंवा र्‍हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा उत्तर :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे . # सिद्धांताची व्याख्या :-  डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.  वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. @ तक्ता आणि स्‍पष्‍टीकरण :- ...

मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम ! मागणीच्या सिद्धांताची गृहीते ! मागणीच्या सिद्धांताचे अपवाद ! Theory of Demand in Marathi ! Assumptions of Theory of Demand in Marathi

  प्रश्न :- मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा प्रश्न :-  मागणीच्या सिद्धांताची गृहीते व अपवाद स्पष्ट करा उत्तर:- अर्थशास्त्रात  1890 मध्ये प्रा.  अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत आपल्या  "अर्थशास्त्राची मूलतत्वे " या ग्रंथात मांडला या सिद्धांतात त्यांनी वस्तूची किंमत बदलल्यास ग्राहक आपल्या वस्तूचा मागणीत कसा बदल घडवून आणतो ते स्पष्ट केलेले आहे.  # सिद्धांताची व्याख्या  :- अल्फ्रेड मार्शल यांच्या मते,  "इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत  वाढल्यास मागणीचा संकोच होतो व किंमत कमी झाल्यास मागणीचा विस्तार होतो" वरील व्याख्येवरून मागणीचा सिद्धांतात लोकांचे उत्पन्न, अपेक्षा ,आवडीनिवडी ,पर्यायी वस्तूची किंमत इत्यादी परिस्थिती स्थिर असताना ग्राहक किंमत वाढल्यास मागणी कमी करतो व किंमत कमी झाल्यास मांडली वाढवतो म्हणजेच किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीतील बदल करतो यावरून किंमत व मागणी यांच्यातील संबंध व्यस्त किंवा परस्परविरोधी असतो हे त्यांनी या सिद्धांतात स्पष्ट केले.  ## मागणीपत्रकाने स्पष्टीकरण :-  ## आकृतीने  स्पष्टीकरण :- अशा...

उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /

प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ? कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय. उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते  त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू,  घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास,  पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता,  तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे,  टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्...

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? | सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ! definition of Micro Economics

✓सूक्ष्म अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:-.( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र)     (Micro ECONOMICS ) ✓सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत   Micro Economics म्हणतात.  यातील  Micro हा शब्द ग्रीक भाषेतील  Mikros   या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ लहान भाग किंवा दशलक्षवा भाग असा होतो  यावरून   सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या  अंशाचा अभ्यास केला जातो  सूक्ष्म अर्थशास्त्राच्या  पुढील व्याख्या सांगता येतात.       १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्‍थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्‍हणजे सूक्ष्म अर्थशास्‍त्र होय.” २) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,  विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय". ३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्‍त्राद्‌वारे, अर्थव्यवस्‍थेकडे सूक्ष्म दर्शकाद्‌वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्‍थारूपी शरीरातील लाखो पेशी म्‍हणजे व्यक्‍ती ,कुटुंबे , उ...

अर्थशास्त्र 12 वी ऑनलाईन सराव परीक्षा.

अर्थशास्त्र 12 वी     ( कला व वाणिज्य शाखा ) ऑनलाईन सराव परीक्षा  (वस्तुनिष्ठ एकूण प्रश्न 20  एकूण गुण 20) विद्यार्थी मित्रांनो, आपले गुण लगेच कळतील ========================= प्रकरण 5 - बाजाराचे प्रकार  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/1x5I7eLs8YJDtDGgXIdF4q7P6eLClFwJtS7DeTA7yxlI/edit ======================== प्रकरण 4 - पुरवठा विश्लेषण  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe95KaNbaCCsOuXR6buxXPFFNmFfHeSIZB36FpEO1n18hLpCA/viewform ==========================    प्रकरण 1 -  सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची ओळख 1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeVQiCplFmCmZTfWDmbsmccaO6Mme2IuFDCmfNkaRBhmh3yfw/viewform https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdL4kqInwqApz9Klf7Oro7tTtvHfFoGqeximXJjeumIbwzDbA/viewform 2) ऑनलाइन सराव परीक्षा क्रमांक - 2  प्रकरण 1- सूक्ष्म...

स्वाध्याय 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय !12th Economics Chapter 2 Utility Analysis full solved excercise in Marathi ! class12 Economics !

 बारावी अर्थशास्त्र प्रकरण-2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय या माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे.👇 https://youtu.be/SPwuSPpzJXw To join my Telegram Channel Link 👇 👉.    https://t.me/Economicsvsb Thanks Bansode Sir V S Subject- Economics