व्यापार ! व्यापाराचे प्रकार ! अंतर्गत व्यापार ! विदेशी व्यापार ! पुनर्निर्यात व्यापार ! विदेशी व्यापाराचे महत्त्व ! भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये ! भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू ! भारतात आयात होणाऱ्या वस्तू ! व्यापारतोल ! व्यवहारतोल
भारताचा विदेशी व्यापार
प्रश्न :- 1) व्यापार म्हणजे काय ?, 2) व्यापाराचे प्रकार कोणते?, अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार , व पुनर्निर्यात व्यापार,
3) विदेशी व्यापाराचे महत्त्व कोणते?,
4) भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये कोणती?
5) भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या?,
6) भारतातून आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या?,
7) व्यापारतोल म्हणजे काय?
8) व्यवहारतोल म्हणजे काय?
वस्तू व सेवांची खरेदी-विक्री करणे म्हणजे व्यापार होय. व्यापाराचा समावेश व्दितीय क्षेत्रांमध्ये होतो. इंग्लंड, अमेरिका, जपान इ. देश व्यापार करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात. बहुसंख्य लोकांना व्यापारातून उत्पन्न व रोजगार मिळतो.व्यापार म्हणजे काय?
व्यापाराचे पुढील दोन प्रकार पडतात.
अ) अंतर्गत व्यापार व
आ) विदेशी व्यापार.
प्रश्न :- अंतर्गत व्यापार व विदेशी व्यापार फरक स्पष्ट करा.
1) अंतर्गत व्यापार म्हणजे काय? :-
अ) अंतर्गत व्यापार म्हणजे, “देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत विविध प्रदेशात वस्तू व सेवांची खरेदी-विक्री करणे म्हणजे अंतर्गत व्यापार होय.”
आ) उदा. सोलापुरातील टॉवेल चादरी भारतातील इतर प्रदेशात विक्री करणे म्हणजे अंतर्गत व्यापार होय.
इ) अंतर्गत व्यापारात संपूर्ण देशात एकच चलन व समान कायदे असतात फारशा अडचणी येत नाहीत.
अ) एका देशातून जगातील इतर देशांमध्ये वस्तू व सेवांची खरेदी-विक्री करणे याला विदेशी व्यापार म्हणतात.
आ) उदा. भारतातून तयार कपडे, कच्चे लोखंड, सूत, चामड्याच्या वस्तू इ. इतर देशात विक्री करणे हा विदेशी व्यापार होय.
इ ) विदेशी व्यापारात ज्या देशाशी व्यापार करायचा आहे त्या देशाचे चलन, सोनं व तेथील कायदे वापरावे लागतात.उदा. अमेरिका-डॉलर, इंग्लंड-पौंड इत्यादी.
प्रश्न :- विदेशी व्यापाराचे प्रकार कोणते?
विदेशी व्यापाराचे पुढील तीन प्रकार पडतात
1) आयात व्यापार :- इतर देशातून आपल्या देशात वस्तू व सेवांची खरेदी करणे याला आयात व्यापार म्हणतात. उदा. भारतात इतर देशातून पेट्रोलियम तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोती, खडे, गोडेतेल, खते, अन्नधान्य खरेदी केले जाते याला आयात म्हणतात. आयातीमुळे आपले उत्पन्न इतर देशांना द्यावे लागते. आयात जास्त व निर्यात कमी असल्यास विदेशी व्यापारात या देशाला तोटा होतो.
2) निर्यात व्यापार :- आपल्या देशातून इतर देशात वस्तू व सेवांची विक्री करणे ह्याला निर्यात व्यापार म्हणतात उदा भारतात व इतर देशात तयार कपडे कच्चे लोखंड चामड्याच्या वस्तू अभियांत्रिकी वस्तू विक्री करणे याला निर्यात म्हणतात. निर्यातीमुळे इतर देशांपासून आपल्याला उत्पन्न मिळते. निर्यात जास्त व आयात कमी असल्यास त्या देशाला विदेशी व्यापारात नफा मिळतो. देशाचे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, विकास वाढत जातो.
3) पुनर्निर्यात व्यापार :- इतर देशातून कच्चामाल आयात करून त्यापासून जास्त किमतीचा पक्का माल तयार करून जेव्हा त्यांची निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर निर्यात व्यापार म्हणतात. उदा. बॅटरी, टीव्ही, रेडिओ, लॅपटॉप यासारख्या वस्तूंचे सुटे भाग आयात करून तयार वस्तू पुन्हा इतर देशांकडे निर्यात करून पुनर निर्यात व्यापारातून नफा मिळवला जातो.
उत्तर :-
1) विदेशी व्यापारामुळे परकीय चलन मिळते.
2) गुंतवणूक वाढते :- इतर देशातील नवीन बाजारपेठ एकूण मागणी वाढल्यामुळे निर्यात वाढून देशात विविध व्यवसायात गुंतवणूक वाढते.
3) इतर देशातील आधुनिक उत्पादन तंत्र, यंत्र मिळते. उदा. आज भरतीय शेतकऱ्यांना इतर देशातील आधुनिक बी-बियाणे, रासायनिक खते, लहान ट्रॅक्टर, ठिबक सिंचन तंत्र मिळाले.
4) ग्राहकांना भारतासारख्या देशात विदेशातील कमी किमतीच्या अनेक दर्जेदार टीव्ही, कार, मोबाईल, बँक, विमा इ. सोयी उपलब्ध आहेत.
5) देशात रचनात्मक बदल घडवून आणता येतात. उदा. इतर देशांप्रमाणे आधुनिक दर्जेदार वस्तूंचे उत्पादन, आधुनिक तंत्र व यंत्र, व्यावसायिक शिक्षण, सामाजिक व क्रिडा विषयक बदल इ.
6) निर्यातीमुळे देशाचे व देशातील लोकांचे उत्पन्न, उत्पादन व रोजगार वाढत जातो.
7) विशेषीकरण व श्रमविभागणी होऊन देशात एखाद्या वस्तूच्या उत्पादनात वाढ होते. उदा. भारत-चहा, ब्राझील-साखर, अमेरिका-गहू, जपान-इलेक्ट्रॉनिक वस्तू इ.
8) जगातील दुर्मिळ नैसर्गिक साधनांचा योग्य व जास्तीत जास्त वापर होतो. संपूर्ण जगाला फायदा होतो कारण एखाद्या देशात कमी किमतीत कमी खर्चात एखाद्या वस्तूचे उत्पादन होते.
9) संपूर्ण जगात देशाची प्रतिष्ठा व नावलौवकिक वाढतो. उदा. स्वित्झर्लंड-घड्याळे, जपान-इलेक्ट्रॉनिक वस्तू.
10) सर्व देशांत एकमेकांमध्ये मैत्री, सहकार्य व मदत करण्याची भावना वाढत जाते.
विदेशी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वरील फायद्यांमुळे आज भारतासह जगातील प्रत्येक देश जागतिक व्यापार संघटनेचा सभासद होत आहे.
प्रश्न :- भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये कोणती? किंवा रचना
उत्तर :- स्वातंत्र्य नंतर मागील सत्तर वर्षात भारताच्या विदेशी व्यापारात रचनेत
प्रमुख्याने पुढील बदल झालेला दिसतो
1) देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात विदेशी व्यापाराचा हिस्सा वाढत आहे. :- उदा. 1990-1991 मध्ये तो 17.55 टक्के होता तर 2016-17 मध्ये तो 48.8 टक्के वाढला.
2) निर्यातीच्या रचनेत बदल झाला :- उदा.आज भारतातून इतर देशांना तयार कपडे, हिरे, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक अशा 7500 वस्तू 190 निर्यात होतात. स्वातंत्र्यापूर्वी कापूस, चहा, अन्नधान्य, तेलबिया, चामडे, खनिज, निर्यात होत होते.
3) आयात रचनेत बदल झाला:- उदा. आज भारतात 6000 वस्तू 140 देशातून आयात होतात. यामध्ये पेट्रोलियम तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते यांचा समावेश आहे, स्वातंत्र्यापूर्वी औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिक वस्तू इ. उपभोग्य वस्तूंची आयात होत होती.
4) व्यापाराच्या आकारात व मूल्यात वाढ झाली:- म्हणजेच आज भारत इंग्लंड बरोबरच अमेरिका, चीन, रशिया, जपान या मोठ्या देशांबरोबर जास्त किमतीच्या व जास्त प्रमाणात वस्तू व सेवांची आयात निर्यात करत आहे.
5) सागरी मार्गाने भारताचा विदेशी व्यापार 68 टक्के वाढला. त्यासाठी मुंबई, कलकत्ता, चेन्नई बंदरांबरोबरच कोचिंग, कांडला, विशाखापट्टणम ही नवीन बंदरे सरकाने विकसित केली.
अशा प्रकारे भारताच्या विदेशी व्यापाराची रचनेतील बदल किंवा वैशिष्ट्ये आपणास स्पष्ट करता येतात.

प्रश्न :- भारताच्या विदेशी व्यापाराचा कल स्पष्ट करा.
भारताच्या विदेशी व्यापारात आयात व निर्यात होणाऱ्या वस्तू व सेवाही बदलत गेल्या ते पुढीलप्रमाणे.
अ)
भारतातून निर्यात
होणाऱ्या वस्तू कोणत्या? किंवा कल :-
आज भारतातून प्रामुख्याने पुढील वस्तू निर्यात होतात.
1) अभियांत्रिकी वस्तू :- 2017-18 मध्ये एकूण निर्यातीत 25% वाटा अभियांत्रिकी वस्तू, वाहतुकीची साधने, यंत्रसामुग्री यांचा आहे.
2) पेट्रोलियम उत्पादने :- यात शुद्ध पेट्रोलियम पदार्थांची भारतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
3) रसायने व रासायनिक उत्पादने :- एकूण निर्यातीत यांचा 10.4 % इतका वाटा आहे तो वाढत आहे.
4) रत्ने आणि दागिने :- निर्यातीत त्यांचा हिस्सा 13 % आहे.
5) कापड व तयार कपडे :- संपूर्ण जगात कापड निर्यातीत भारत प्रथम आहे. एकूण निर्यातीत याचा 11 % वाटा आहे.
अशाप्रकारे आज भारतातून वरील वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जातात.

आ) भारतात आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या? किंवा कल :-
आज भारतात प्रामुख्याने पुढील वस्तूंची आयात केली जाते.
1) पेट्रोलियम खनिज तेल :- पूर्वीपासून आजही भारताला पेट्रोलियम खनिज तेल मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. कारण उत्पादनापेक्षा खनिज तेलाची मागणी जास्त आहे. आज एकूण आयातीत याचा 31 % वाटा आहे.
2) सोने :- भारतात सोन्याची आयात दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंपरांमुळे भारतीय लोकांची सोन्यातील गुंतवणूक मागणी जास्त आहे.
3) रासायनिक खाते :- याचा एकूण आयातीत 2% हिस्सा आहे.
4) लोखंड व पोलाद :- याचा एकूण आयातीत 2% हिस्सा आहे.
अशा प्रकारे भारतात आयात होणाऱ्या वस्तू स्पष्ट करता येतात.
प्रश्न :- व्यापारतोल म्हणजे काय?
उत्तर :- व्याख्या :- एका वर्षाच्या कालावधीत एखाद्या देशाची विदेशी व्यापारात होणाऱ्या दृश्य व अदृश्य वस्तू व सेवांच्या निर्यातीतून आयातीचे मुल्य वजा केल्यास जे उत्पन्न शिल्लक राहते, त्याला व्यापारतोल किंवा व्यापारशेष असे म्हणतात.
यावरून व्यापारतोलात देशात केवळ विदेशी व्यापारातील चालू खात्यातील दृश्य व अदृश्य वस्तू व सेवांची होणारी आयात निर्यात विचारात घेतली जाते. त्यामुळे व्यापारतोल ही एक लहान संकल्पना आहे.
प्रा. सॅम्युअल्सन यांनी व्यापारतोलाचे पुढील तीन प्रकार सांगितले :-
1) समतोल व्यापारतोल :- ज्यावेळेस एखादया देशातून विदेशी व्यापारात केलेली निर्यात व आयातीचे मूल्य समान असते, उत्पन्न शिल्लक राहत नाही त्याला समतोल व्यापारतोल म्हणतात, अशा व्यापारात देशाला फायदा किंवा तोटा होत नाही.
2) अनुकूल व्यापारतोल :- ज्यावेळेस देशाची निर्यातमूल्य आयातीपेक्षा जास्त असते त्याला अनुकूल व्यापारतोल म्हणतात. अशावेळी विदेशी व्यापारातून जास्त उत्पन्न, नफा मिळतो.
3) प्रतिकूल व्यापारतोल :- ज्यावेळेस निर्यातीपेक्षा आयात मूल्य जास्त असते त्यावेळेस विदेशी व्यापारात देशाला तोटा होतो त्याला प्रतिकूल व्यापारतोल म्हणतात.
प्रश्न :- व्यवहातोल म्हणजे काय?
उत्तर :- व्याख्या :- एका वर्षाच्या कालावधीत एखाद्या देशाची विदेशी व्यापारामध्ये होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची व्यवस्थितपणे केलेली नोंदणी किंवा विवरण म्हणजे व्यवहारतोल होय.
व्यवहारतोलात एका वर्षात एखाद्या देशातील व इतर देशातील सर्व नागरिक, व्यापारी, उद्योगसंस्था व सरकार यांच्यात होणाऱ्या सर्व देवाण-घेवाण, सर्व व्यवहारांची नोंदणी केली जाते. व्यवहारतोलात प्रामुख्याने पुढील सर्व व्यवहारांची नोंदणी होते.
1) चालू खात्यावरील :- दृश्य व अदृश्य वस्तू व सेवांची खरेदी विक्री ( व्यापारतोल ) +
2) भांडवली खात्यावरील :- खाजगी व सरकारी कर्ज + विविध गुंतवणुक. इ. सर्व व्यवहार किंवा सर्व
देवाणघेवाणीचा समावेश व्यवहारतोलात होतो. त्यामुळे व्यवहारतोल ही मोठी संकल्पना आहे.
कोणत्याही देशाचा व्यवहारतोल नेहमी संतुलित असतो. कारण चालू खात्यात ( दृश्य व अदृश्य वस्तू व सेवांच्या व्यापारात ) व्यापारतोलात तूट आल्यास भांडवली खात्यातील शिल्लक वापरून किंवा कर्ज घेऊन समतोल साधला जातो.

bansodesirvs.blogspot.com
धन्यवाद
From
Bansode Sir V S.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know