मुख्य सामग्रीवर वगळा

रिझर्व्ह बँकेची कार्ये कोणती ?! रिझर्व बँक ऑफ इंडिया ! Functions of Reserve Bank of India

 भारतातील रिझर्व्ह बँकेची कार्ये :-   
          भारतात मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आहे व तिचे राष्ट्रीयीकरण 1949 मध्ये करण्यात आले. भारतात देशाची एक मध्यवर्ती, सर्वोच्च, शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँक  प्रामुख्याने पुढील कार्य करते.  
1) चलन निर्मिती करणे :-  
चलन निर्मिती करण्याची मक्तेदारी रिझर्व बँकेची आहे.  
रिझर्व बँक एक रुपयाची नोट व नाणी सोडून सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे इतर सर्व नोटा छापून पुरवठा करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे. उदा. 2,5,10,20,100,200,500,2000 ₹.नोटा.
( पूर्वी नोटा छापून घेण्यासाठी 1957 च्या “किमान राखीव निधी” नुसार रिझर्व्ह बँकेकडे सरकारने कमीत कमी 200 कोटी रुपये ठेव ठेवावी लागते यातील 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जात होते. आज हा कायदा अस्तित्वात नाही.) 
Visit bansodesirvs.blogspot.com 

2) सरकारची बँक म्हणून कार्य करणे :-

रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून पुढील अनेक कार्य करते.

a)      सरकारचे व्यवहार, खाती, पैसा संभाळणे.

b)      सरकारची सर्व येणी वसूल करणे. उदा. व्याज, दंड, देणग्या इ.

c)       सरकारची देणी देणे. उदा. कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, व्याज इ.

d)      सरकारला अल्प व दीर्घकालीन कर्ज उभारून देणे.

e)      सरकारची देशातील व विदेशातील कर्ज व त्यावरील व्याज फेडणे. विदेशात सरकारला लागणाऱ्या पैशाची सोय करणे.

f)       विदेशी सरकार व संस्था यांच्याबरोबर सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य कारणे. (उदा. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इ.)

g)      सरकारचा सल्लागार म्हणून कार्य करणे. ( उदा. आर्थिक नियोजन, परकीय चलन धोरण, व्यापारी धोरण, अंदाजपत्रक, तेजी, मंदी इ.)

h)      विविध योजना आखण्यासाठी सरकारला माहिती व आकडेवारी उपलब्ध करून देणे.

सरकारचा प्रतिनिधी म्हणून रिझर्व्ह बँक सरकारची वरील अनेक कार्ये करते, त्यामुळे रिझर्व्ह बँकेला सरकारची बँक म्हणतात.

3) व्यापारी बँकांची बँक म्हणून कार्य करणे :-

रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांची बँक, मित्र, सल्लागार, मार्गदर्शक म्हणून पुढील कार्य करते.

a)      व्यापारी बँकांना परवानगी देणे.

b)      व्यापारी बँकेची खाते, राखीव निधी सांभाळणे.

c)       व्यापारी बँकांना आवश्यक तेव्हा कर्ज देणे, त्यांच्या हुंड्या पुन्हा वटवून देणे.

d)      सर्व बँकांना सतत योग्य सल्ला, मार्गदर्शन व मदत करणे. ( उदा. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, व्याज ठरवणे, तारण घेणे, कर्जाची परतफेड )

e)      अडचणीत आलेल्या व्यापारी बँकांचा अंतिम आधार ऋणदाता म्हणून कार्य करणे.

रील कार्यामुळे रिझर्व्ह बँकेला “व्यापारी बँकांची बँक” किंवा “व्यापारी बँकांचा अंतिम आधार ऋणदाता” असे म्हणतात.

4) पतनियंत्रण करणे :-  

व्यापारी बँकाच्या पतपैशाच्या निर्मितीवर पतनियंत्रण करण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेला करावे लागते त्यासाठी पुढील दोन मार्गांचा वापर रिझर्व बँक करते.

अ)   संख्यात्मक साधने :- यात

1) बँक दर,

2) खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री व

3) राखीव निधीचे प्रमाण बदलणे यांचा समावेश होतो.

आ)  गुणात्मक साधने :- यात 

1) कर्ज व तारण यातील अंतर ठरवणे,

2) ग्राहकाच्या कर्जाचे नियंत्रण,

3) आदेशाने नियंत्रण,

4) कर्जाचे नियंत्रित वाटप,

5) प्रत्यक्ष कारवाई,

6) नैतिक समजावणी व

7) प्रसिद्धी यांचा समावेश होतो.

वरील साधनांनाच पतनियंत्रणाची साधने म्हणतात.

5) परकीय चलन सांभाळणे :- 

विदेशी व्यापारात देशाला मिळालेले परकीय चलन सोन्याचा साठा सांभाळणे. आपल्या देशाचे इतर देशातील चलनाशी असलेला दर म्हणजेचविनिमय दरस्थिर ठेवण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. उदा. ₹=$, ₹=पौंड .

6)  विकासाची कामे करणे :-

भारतासारख्या देशात रिझर्व्ह बँक विकासाची पुढील कार्य करते.

अ)   लोकांना बँकेच्या सवयी लावणे व सुरक्षितते विषयी जागृती आणणे.

आ)  बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

इ) शेती व उद्योगाच्या विकासासाठी अप्रत्यक्ष मदत करणे ( उदा. नाबार्ड, औद्योगिक बँक तसेच आयात निर्यात बँक यांना मदत करणे.)

ई)     देशात किंमत स्थिरता टिकवणे.

Visit bansodesirvs.blogspot.com

7) निरसन गृह किंवा समाशोधन गृह सोय देणे :-प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना खातेदारांनी चेकच्या साहाय्याने केलेले व्यवहार कागदोपत्री पूर्ण करण्यासाठी जी जागा पुरवते त्याला “निरसन गृह किंवा समाशोधन गृह” म्हणतात. या सोयीमुळे रोख पैशाचा वापर न करता बँकांना एकमेकांमधील चेकचे व्यवहार पूर्ण करण्याची सोय मिळते.

8) माहिती व आकडेवारी गोळा करून प्रसिद्ध करणे :- 

रिझर्व्ह बँक दर वर्षी देशाच्या अर्थव्यवस्थेतील शेती, उद्योग, व्यापार, आयात-निर्यात, पैशाचा पुरवठा इ. अनेक घटकांविषयी माहिती व आकडेवारी गोळा करून ती प्रसिद्ध करण्याचे कार्य करते उदा. रिझर्व्ह बँक बुलेटीन, रिझर्व्ह बँक जर्नल, तसेच संशोधन लेख प्रसिद्ध करते.

अशाप्रकारे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात रिझर्व्ह बॅंक देशाची मध्यवर्ती बँक म्हणून वरील अनेक कार्ये करते. 

bansodesirvs.blogspot.com visit bansodesirvs.blogspot.com

===================================

माझ्या यूट्यूब चैनलला अवश्य भेट द्या व चॅनल सबस्क्राईब करा. त्यासाठी पुढील लिंक क्लिक करा

                              👇

https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ

==================================

धन्यवाद  🙏 From बनसोडे सर व्ही एस             

===================================

              English Translation 

Functions of Reserve Bank of India :-
         
 The Reserve Bank of India was established on 1 April 1935 as the central bank of India and was nationalized in 1949. As a central, apex, apex bank in India, the Reserve Bank primarily performs the following functions.

1) Creation of currency :-
RBI has monopoly on currency creation.
Reserve Bank Reserve Bank is responsible for printing and supplying all other notes except one rupee notes and coins as per the orders given by the government. E.g. 2,5,10,20,100,200,500,2000 ₹.Notes.
(Earlier, the government had to maintain a minimum deposit of Rs 200 crore with the Reserve Bank as per the “Minimum Reserve Fund” Act of 1957 for printing currency notes, of which Rs 115 crore was kept in the form of gold and Rs 85 crore in the form of foreign exchange. Today this Act no longer exists.)

Visit bansodeservs.blogspot.com

2) Acting as a Government Bank :-

The Reserve Bank performs the following functions as the government's bank.

a) To manage the affairs, accounts, money of the Government.

b) To collect all dues of Govt. E.g. Interest, penalty, donations etc.

c) Government debt. E.g. Employees salary, pension, interest etc.

d) Raising short and long term loans to the government.

e) Repayment of the government's domestic and foreign loans and interest thereon. Facilitating the remittance of money to the government abroad.

f) Reasons for working as a representative of the Government with foreign Governments and Institutions. (eg World Bank, International Monetary Fund etc.)

g) To act as an adviser to the Government. (eg financial planning, foreign exchange policy, trade policy, budgeting, boom, bust etc.)

h) To provide information and data to the Government for planning various schemes.

As the representative of the Government, the Reserve Bank performs many of the above functions of the Government, hence the Reserve Bank is called the Bank of the Government.

3) Acting as a bank of commercial banks :-

The Reserve Bank further functions as a bank, friend, advisor, guide to the commercial banks.

a) Permitting commercial banks.

b) Maintaining merchant bank account, reserve fund.

c) Loans to commercial banks when required, reimbursing their dues.

d) Continuously providing appropriate advice, guidance and assistance to all banks. (eg accepting deposits, granting loans, fixing interest, obtaining mortgages, repaying loans)

e) Acting as lender of last resort to distressed commercial banks.

Because of the above function RBI is called “bank of merchant banks” or “lender of last resort to merchant banks”.

4) Credit control:- 
Reserve Bank uses the following two methods to control credit creation of commercial banks.

a) Numerical Tools:- In this

1) Bank Rate,

2) Buying and selling of bonds in the open market and

3) It involves changing the amount of reserve fund.

(b) Qualitative tools:- In this

1) Determining the gap between loan and collateral,

2) Control of consumer debt,

3) Control by command,

4) Controlled disbursement of credit,

5) Direct action,

6) Moral understanding and

7) Publicity includes.

The above tools are called fall control tools.

5) Management of foreign exchange:- Management of foreign exchange and gold reserves received by the country in foreign trade. The function of the Reserve Bank is to keep the rate of our country against the currency of other countries i.e. "exchange rate" stable. E.g. ₹=$, ₹=pound etc.

6) Doing developmental work:-
In a country like India, the Reserve Bank does further developmental work.

a) To inculcate banking habits and security awareness among the people.

(b) Training of bank employees.

(e) Indirect assistance for development of agriculture and industry (e.g. assistance to NABARD, Industrial Bank and Import Export Bank.)

E)     To maintain price stability in the country.

Visit bansodeservs.blogspot.com

7) Provision of Nirasan Griha or Clearing House facility:- 
The place provided by the Reserve Bank to the commercial banks in every district for the settlement of transactions by account holders with the help of checks is called “Nirasan Griha or Clearing House”. This facility allows banks to complete check transactions between each other without the use of cash.

8) Collection and publication of information and statistics:-
Reserve Bank every year on the economy of the country in agriculture, industry, trade, import-export, money supply etc. It works to collect and publish information and statistics about many factors viz. Publishes Reserve Bank Bulletin, Reserve Bank Journal, as well as research articles.

Thus, to control the entire economy, the Reserve Bank of India performs many of the above functions as the central bank of the country.
============================
Thank you 🙏 From Bansode Sir VS
=============================

टिप्पण्या

Popular Posts

मागणी म्हणजे काय ? व मागणी चे प्रकार

 प्रश्न.  :- मागणी म्हणजे काय ? प्रश्न.    :- मागणी म्हणजे केवळ इच्छा नव्हे स्पष्ट करा. उत्तर :-  प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मागणी याचा अर्थ एखाद्या वस्तूची इच्छा कसा घेतला जातो मात्र अर्थशास्त्रामध्ये इच्छा म्हणजे मागणी नाही. तर अर्थशास्त्रात मागणी ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी पुढील तीन अटी पूर्ण होणे आवश्यक असते. 1)  वस्तू खरेदीची इच्छा. + 2)  वस्तूच्याकिमती एवढे पैशाचे पाठबळ  + 3)  पैसा खर्चाची तयारी . याला मागणी म्हणतात.   या पद्धतीने प्रत्यक्षात पैसे खर्च करून ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यास त्याला मागणी असे म्हणतात उदा. आपल्याला पेन खरेदी ची इच्छा झाली व पेनच्या किमती एवढे पैसे दहा रुपये दुकानदाराला देऊन प्रत्यक्षात पेन खरेदी केल्यास त्याला मागणी असे म्हणतात. त्यामुळेच   प्रा. मेअर्स यांच्या मते, " एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात." यावरून केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे हे आपणास स्पष्ट करता येते..... प्रश्न  :-      मागणीचे प्रकार ...

मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार ! मागणीची उत्पन्न लवचिकता ! मागणीची छेदक लवचिकता ! मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार !

                 मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अर्थशास्त्रात सर्वप्रथम डॉ. मार्शल यांनी मांडली. मागणीचा सिद्धांत मांडल्यानतर त्यावर आधारित ही संकल्पना त्यांनी मांडली. प्रश्न :- मागणीच्या लवचिकतेची व्याख्या:- वस्तूची किंमत ,लोकांचे उत्पन्न , तसेच इतर वस्तूंची किंमत बदलल्यानंतर एखाद्या वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्यानुसार एखाद्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात बदलत असल्यास जास्त लवचिक मागणी व कमी प्रमाणात बदल्यात असल्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. प्रश्न :-मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :- मागणीच्या लवचिकतेचे पुढील तीन प्रकार पडतात 1) उत्पन्न लवचिकता :- लोकांचे उत्पन्न बदलल्यानंतर त्यांच्याकडून वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते                           मागणीतील शेकडा बदल  उत्पन्न लवचिकता=----------------------------   ...

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !

प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा           # सिद्धांताची गृहिते   #  सिद्धांताचे अपवाद          # सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा        #किंवा र्‍हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा उत्तर :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे . # सिद्धांताची व्याख्या :-  डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.  वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. @ तक्ता आणि स्‍पष्‍टीकरण :- ...

मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम ! मागणीच्या सिद्धांताची गृहीते ! मागणीच्या सिद्धांताचे अपवाद ! Theory of Demand in Marathi ! Assumptions of Theory of Demand in Marathi

  प्रश्न :- मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा प्रश्न :-  मागणीच्या सिद्धांताची गृहीते व अपवाद स्पष्ट करा उत्तर:- अर्थशास्त्रात  1890 मध्ये प्रा.  अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत आपल्या  "अर्थशास्त्राची मूलतत्वे " या ग्रंथात मांडला या सिद्धांतात त्यांनी वस्तूची किंमत बदलल्यास ग्राहक आपल्या वस्तूचा मागणीत कसा बदल घडवून आणतो ते स्पष्ट केलेले आहे.  # सिद्धांताची व्याख्या  :- अल्फ्रेड मार्शल यांच्या मते,  "इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत  वाढल्यास मागणीचा संकोच होतो व किंमत कमी झाल्यास मागणीचा विस्तार होतो" वरील व्याख्येवरून मागणीचा सिद्धांतात लोकांचे उत्पन्न, अपेक्षा ,आवडीनिवडी ,पर्यायी वस्तूची किंमत इत्यादी परिस्थिती स्थिर असताना ग्राहक किंमत वाढल्यास मागणी कमी करतो व किंमत कमी झाल्यास मांडली वाढवतो म्हणजेच किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीतील बदल करतो यावरून किंमत व मागणी यांच्यातील संबंध व्यस्त किंवा परस्परविरोधी असतो हे त्यांनी या सिद्धांतात स्पष्ट केले.  ## मागणीपत्रकाने स्पष्टीकरण :-  ## आकृतीने  स्पष्टीकरण :- अशा...

उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /

प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ? कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय. उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते  त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू,  घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास,  पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता,  तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे,  टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्...

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? | सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ! definition of Micro Economics

✓सूक्ष्म अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:-.( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र)     (Micro ECONOMICS ) ✓सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत   Micro Economics म्हणतात.  यातील  Micro हा शब्द ग्रीक भाषेतील  Mikros   या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ लहान भाग किंवा दशलक्षवा भाग असा होतो  यावरून   सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या  अंशाचा अभ्यास केला जातो  सूक्ष्म अर्थशास्त्राच्या  पुढील व्याख्या सांगता येतात.       १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्‍थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्‍हणजे सूक्ष्म अर्थशास्‍त्र होय.” २) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,  विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय". ३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्‍त्राद्‌वारे, अर्थव्यवस्‍थेकडे सूक्ष्म दर्शकाद्‌वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्‍थारूपी शरीरातील लाखो पेशी म्‍हणजे व्यक्‍ती ,कुटुंबे , उ...

अर्थशास्त्र 12 वी ऑनलाईन सराव परीक्षा.

अर्थशास्त्र 12 वी     ( कला व वाणिज्य शाखा ) ऑनलाईन सराव परीक्षा  (वस्तुनिष्ठ एकूण प्रश्न 20  एकूण गुण 20) विद्यार्थी मित्रांनो, आपले गुण लगेच कळतील ========================= प्रकरण 5 - बाजाराचे प्रकार  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/1x5I7eLs8YJDtDGgXIdF4q7P6eLClFwJtS7DeTA7yxlI/edit ======================== प्रकरण 4 - पुरवठा विश्लेषण  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe95KaNbaCCsOuXR6buxXPFFNmFfHeSIZB36FpEO1n18hLpCA/viewform ==========================    प्रकरण 1 -  सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची ओळख 1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeVQiCplFmCmZTfWDmbsmccaO6Mme2IuFDCmfNkaRBhmh3yfw/viewform https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdL4kqInwqApz9Klf7Oro7tTtvHfFoGqeximXJjeumIbwzDbA/viewform 2) ऑनलाइन सराव परीक्षा क्रमांक - 2  प्रकरण 1- सूक्ष्म...

स्वाध्याय 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय !12th Economics Chapter 2 Utility Analysis full solved excercise in Marathi ! class12 Economics !

 बारावी अर्थशास्त्र प्रकरण-2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय या माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे.👇 https://youtu.be/SPwuSPpzJXw To join my Telegram Channel Link 👇 👉.    https://t.me/Economicsvsb Thanks Bansode Sir V S Subject- Economics