पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ?
पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती ?
पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची पुढील व्याख्या सांगता येतात.
1) मिसेस जोन रोबिन्सन :- याच्या मते, “ज्या बाजारपेठेत प्रत्येक विक्रेत्याच्या वस्तूला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा त्यास पूर्ण स्पर्धा म्हणतात.”
2) पूर्ण स्पर्धा म्हणजे, “ज्या बाजारपेठेत असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक असतात, व कोणत्याही निर्बंध शिवाय ते एकजिनसी वस्तूंची खरेदी-विक्री करतात व त्यांना बाजारपेठेचे ज्ञान असते अशा बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ म्हणतात”.
वरील व्याख्यांवरून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची संकल्पना स्पष्ट होत नाही. कारण पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
Visit-bansodesirvs.blogspot.com Visit-bansodesirvs.blogspot.com
प्रश्न :- पूर्ण स्पर्धेच्या
बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती? :-
इंग्लंडमधील अर्थतज्ज्ञांनी एक काल्पनिक मात्र आदर्श बाजारपेठ म्हणून पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ स्पष्ट केली. आज कोणत्याही देशात पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ
प्रत्यक्षात दिसून येत नाही. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची पुढील अनेक वैशिष्ट्ये,
अटी आहेत. त्या प्रत्यक्षात आणणे कठीण आहे.
1) असंख्य विक्रेते :-
पूर्ण
स्पर्धेच्या बाजारपेठेत एखादी वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची संख्या असंख्य असते. एकूण उत्पादनात एखाद्या विक्रेत्याचा वाटा खूपच
कमी असतो त्यामुळे एखादा विक्रेता वस्तूचा पुरवठा, उत्पादन कमी जास्त करून वस्तूची
किंमत कमी जास्त करू शकत नाही त्यामुळे पूर्ण स्पर्धेत विक्रेता हा “किंमत स्वीकारणारा”
असतो असे म्हटले जाते.
2)असंख्य ग्राहक :-
पूर्ण स्पर्धेत एखादी वस्तू खरेदी करणार्या ग्राहकांची संख्याही असंख्य असते
त्यामुळे एखादा ग्राहक वस्तूची मागणी कमी जास्त करून वस्तूची किंमत बदलू शकत नाही.
3) वस्तूचा एकसारखेपणा किंवा एकजिनसीपणा :-
पूर्ण स्पर्धेत
एखादी वस्तू तयार करणाऱ्या उत्पादकांची संख्या असंख्य असते मात्र ते ज्या वस्तू
उत्पादित करतात त्या सर्व वस्तू रंग, रूप, आकार, चव यादृष्टीने एकसारख्या, एकजिनसी असतात किंवा प्रमाणित केलेल्या असतात. व सर्व वस्तू
एकमेकांना पूर्ण पर्याय असतात.
4)एकच किंमत :-
पूर्ण स्पर्धेमध्ये
ग्राहक व विक्रेत्यांच्या मागणी पुरवठ्याच्या समतोलातून वस्तूची एकच समतोल किंमत
निश्चित होत असते.
5)बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते :-
पुर्ण
स्पर्धेमध्ये ग्राहक व विक्रेते यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते त्यामुळे
कोणालाच फसवणूक करता येत नाही उदा. वस्तूची किंमत, पर्यायी वस्तूची किंमत, पुरवठा,गुणवत्ता इ.
6)मुक्त प्रवेश व निर्गमन:-
पूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही नवीन उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन करणे, वाढवणे तसेच उत्पादन बंद करणे याविषयी मुक्त
प्रवेश आणि निर्गमन याचे स्वातंत्र्य असते.
7) उत्पादक घटक पूर्ण गतिशील असतात. :-
पूणे
स्पर्धेमध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे
चारही उत्पादनाचे घटक कोणत्याही प्रदेशांत व कोणत्याही व्यवसायात सहजपणे
स्थलांतरित करता येतात म्हणजेच पुर्ण गतिशील असतात.
8)वाहतूक खर्च व जाहिरात खर्चाचा अभाव :-
पूर्ण स्पर्धेत
एकच किंमत गृहीत धरल्यामुळे तसेच उद्योग व बाजारपेठ एकमेकांच्या जवळ असल्यामुळे
जाहिरात व वाहतूक खर्च नसतो.
9)सरकारी हस्तक्षेप नसतो :-
ग्राहक व विक्रेते यांच्या मागणी पुरवठाच्या समतोलातून बाजारपेठेचे नियंत्रण होते. त्यामुळे पूर्ण स्पर्धेत सरकारचा हस्तक्षेप नसतो.
अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची वरील अनेक वैशिष्ट्ये प्रत्यक्षात निर्माण करणे शक्य नाही त्यामुळे आज कोणत्याही देशात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नाही. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ एक काल्पनिक मात्र आदर्श बाजारपेठ समजली जाते.
Visit-bansodesirvs.blogspot.com Visit-bansodesirvs.blogspot.com
अर्थशास्त्र विषयासाठी माझ्या पुढील यूट्यूब चैनलला अवश्य भेट द्या व चॅनल सबस्क्राईब करा.
👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know