प्रश्न :- पुरवठा म्हणजे काय? ! पुरवठा व साठा फरक !वैयक्तिक पुरवठा पत्रक ! बाजार पुरवठा पत्रक ! श्रम पुरवठा वक्र
================================
प्रश्न :- पुरवठा म्हणजे काय?
किंवा पुरवठा व साठा फरक स्पष्ट करा.
उत्तर :-प्रत्यक्ष व्यवहारात एखाद्या वस्तूचा पुरवठा याचा अर्थ त्या वस्तूचा साठा असा घेतला जातो, मात्र अर्थशास्त्रात पुरवठा म्हणजे साठा नसून त्यांच्यात पुढील फरक आहे.
1) व्याख्या :- साठा म्हणजे, "उत्पादकाने एका विशिष्ट वेळी केलेले वस्तूंचे एकूण उत्पादन" म्हणजे साठा होय.
याउलट, पुरवठा म्हणजे, "साठ्यातून जे उत्पादन एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारात विक्रीस आणले जाते" त्याला पुरवठा म्हणतात.
2) उदा. शेतकऱ्यांने एका विशिष्ट वेळी 10 पोती गहू उत्पादन केले त्यास साठा म्हणतात. त्यापैकी 2000 रुपये किंमत असताना 5 पोती गहू प्रत्यक्ष बाजारपेठेत विक्रीस आणले, त्याला पुरवठा म्हणतात.
3) साठा हा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. नाशवंत वस्तूंचा साठा व पुरवठा समान असतो.
उदा. फुले, भाजीपाला, फळे, दूध अंडी, मासे इ.
याउलट टिकाऊ वस्तूंचा पुरवठा हा साठा पेक्षा कमी असतो कारण पुरवठा साठ्यातूनच केला जातो.
उदा. लोखंडी वस्तू, लाकडी वस्तू टीव्ही, रेफ्रिजरेटर, ट्रॅक्टर इ. जमिनीचा पुरवठा दुर्मिळतेमुळे कायम अलवचिक आहे.
4) वस्तूची किंमत व साठा यांच्यात व्यस्त संबंध असतो. किंमत वाढल्यास पुरवठा वाढून साठा कमी होतो.
याउलट किंमत व पुरवठा यांच्यात सम, धनात्मक संबंध असतो. कारण किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
वैयक्तिक पुरवठा पत्रक :-
1) एका वैयक्तिक उत्पादकाचा पुरवठा दाखवलेला असतो.
2) इतर परिस्थिती कायम असताना एक उत्पादक वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा वाढवतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी करतो हे ज्या पुरवठा पत्रकाराने दाखवले जाते त्यांना वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणतात.
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यानंतर एक उत्पादक अक्ष अक्षावरील पुरवठा वाढवतो . त्यामुळे 'पप' हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा धनात्मक स्वरूपाचा येतो. bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
बाजार पुरवठा पत्रक :-
1) बाजारपेठेतील सर्व उत्पादकांचा पुरवठा बाजार पुरवठा पत्रकात दाखवलेला असतो.
2) इतर परिस्थिती कायम असताना बाजारपेठेतील सर्व उत्पादक वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा वाढवतात व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी करतात हे ज्या पत्रकाराने दाखवले जाते त्यांना बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात.
वरील आकृतीत 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यानंतर बाजारपेठेतील सर्व उत्पादक उत्पादक अक्ष अक्षावरील पुरवठा वाढवतात. त्यामुळे 'पप' हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा येतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
प्रश्न :- श्रम पुरवठा वक्र ! श्रम पुरवठा वक्र मागे वळणार असतो स्पष्ट करा :-
उत्तर :- कामगार श्रमाचा पुरवठा करतो. कामगाराला दिली जाणारी किंमत वेतन वाढत असताना सुरुवातीस कामगाराकडून श्रमाचा पुरवठा वाढतो मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर कामगारांचे वेतन खूपच वाढल्यास कामगार श्रमाचा पुरवठा वाढवण्याऐवजी सुट्ट्या, आराम ,विश्रांती, पर्यटन याला प्राधान्य देऊन श्रम पुरवठा कमी करतो. त्यामुळे श्रम पुरवठ्याबाबत पुरवठ्याचा सिद्धांत दिसत नाही व एका विशिष्ट मर्यादेनंतर श्रम पुरवठा वक्र 'अय' कक्षाकडे मागे वाढणारा येतो.
कामगाराचे वेतन
रुपयात(दररोज) - 100. 200. 300
श्रम पुरवठा
(दररोज तासात) -. 5. 7. 6
श्रम पुरवठा :-
कामगाराला दिली जाणारी किंमत वेतन वाढत असताना सुरुवातीस कामगाराकडून श्रमाचा पुरवठा 5, 7, तास वाढतो मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर कामगारांचे वेतन खूपच वाढल्यास कामगार श्रमाचा पुरवठा वाढवण्याऐवजी सुट्ट्या, आराम ,विश्रांती, पर्यटन याला प्राधान्य देऊन श्रम पुरवठा 6 तास कमी करतो. त्यामुळे श्रम पुरवठ्याबाबत पुरवठ्याचा सिद्धांत दिसत नाही.
श्रम पुरवठा वक्र :-
वरील आकृतीत पव1 हा श्रम पुरवठा वक्र 'न' बिंदू नंतर 'अय' अक्षाकडे मागे वाळणारा येतो. कारण सुरुवातीस 'अय' अक्षावरील कामगारांचे वेतन वाढत गेल्यास श्रमाचा पुरवठा ही वाढत जातो मात्र वेतन तीनशे रुपये झाल्यानंतर कामगार सुट्टी ,आराम याला प्राधान्य देतो व श्रम पुरवठा सहा तास इतका कमी करतो त्यामुळे न बिंदू नंतर 'नप1 हा श्रम पुरवठा वक्र 'अय' अक्षाकडे मागे वळणारा येतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
धन्यवाद
बनसोडे सर व्ही. एस.
विषय:- अर्थशास्त्र
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know