प्रश्न :- बाजार मागणी किंवा मागणी ठरविणारे घटक
किंवा वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक
किंवा वस्तूची मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते स्पष्ट करा.
उत्तर :- वस्तूची मागणी ही त्याच्या किमती बरोबरच अनेक घटकांवर अवलंबून असते हे घटक पुढीलप्रमाणे.
1) वस्तूची किंमत :-
कोणत्याही वस्तूची मागणी ही प्रामुख्याने त्या वस्तूच्या किमती वर अवलंबून असते ग्राहक किंमत कमी झाल्यास मागणी वाढवतो व किंमत वाढल्यास मागणी कमी करतो हे दिसून येते .
2 ) लोकांचे उत्पन्न :-
देशातील लोकांचे उत्पन्न जास्त असून हे उत्पन्न वाढत असल्यास खरेदीशक्ती वाढू न वस्तूची मागणे वाढत जाते उत्पन्न कमी असल्यास मागणी कमी होते.
3) पर्यायी वस्तूंची संख्या व त्यांच्या किमती :-
साखर आणि गुळ अशा पर्यायी वस्तूंबाबत साखरेपेक्षा गुळाची किमती कमी असल्यास गुळाची मागणी वाढते.
4 ) पूरक वस्तूंच्या किमती :-
एखाद्या वस्तूची मागणी त्याला आवश्यक असणाऱ्या पूरक वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असते उदा .स्कूटर व पेट्रोल या पूरक वस्तूंच्या बाबतीत पेट्रोलच्या किमती जास्त असल्यास स्कूटरची मागणी वाढत नाही .
5 ) देशातील लोकसंख्या व तिची वयोरचना :-
देशाची लोकसंख्या भारताप्रमाणे जास्त असून त्यातील 15 ते 60 वयोगटातील उत्पादक व उत्पन्न मिळणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त असल्यास वस्तूंची मागणी वाढत जाते.
6) लोकांच्या भविष्यकालीन अपेक्षा :-
सोने-चांदी या वस्तूंप्रमाणे भविष्यात वस्तूंची मागणी वाढून किमती वाढण्याची अपेक्षा असल्यास आज वस्तूंची मागणी वाढवली जाते व भविष्यात किंमत कमी होण्याचा अंदाज असल्यास आज मागणी कमी केली जाते.
7) वस्तूची आवडनिवड, सवयी, फॅशन :-
उदा. चहा, कॉफी, तंबाखू ,सिगरेट इत्यादी वस्तूंची मागणी सवयीमुळे केली जाते.
8) वस्तूची आवश्यकता :-
अन्नधान्य, कपडे ,मीठ, औषधे अशा वस्तू जीवनावश्यक असतात त्यांच्या किमती कितीही वाढल्या तरी या वस्तू जीवनावश्यक असल्यामुळे त्यांची मागणी केली जाते.
9) जाहिरात :-
जाहिरातीच्या प्रभावामुळे लोकांची आवड निवड बदलून वस्तूची मागणी केली जाते.
10 ) देशातील रूढी-परंपरा:-
भारतासारख्या देशात नारळ फेटे धोतर दुपट्टे साडी हळद-कुंकू अशा अनेक वस्तूंची मागणी रूढी परंपरेमुळे केली जाते
11) सरकारचे कर विषयक धोरण :-
सरकारने लोकांच्या उत्पन्नावर तसेच वस्तूंवरील कर वाढवल्यास वस्तूंच्या किमती वाढून मागणी कमी होते व सरकारने कर सवलती दिल्यास वस्तूंची मागणी वाढते.
12)नैसर्गिक परिस्थिती :-
देशातील नैसर्गिक परिस्थिती हवामान बदलत असताना अनेक वस्तूंची मागणी कमी-जास्त होते उदा .पावसाळ्यात- रेनकोट ,छत्री हिवाळ्यात -लोकरीचे कपडे, उन्हाळ्यात - पंखे, एसी इ.
13) देशातील व्याजदर:-
देशात बँकेत ठेवीवरील व्याजदर जास्त असल्यास बचत वाढून मागणी कमी होते
14) देशातील सामाजिक विम्याच्या सोयी:-
देशात अनेक घटकांचा विमा उतरविणे सोय असल्यास विम्याचा हप्ता भरावा लागतो बचत वाढून मागणी कमी होते
15) वस्तू खरेदीच्या सोयी :-
देशात वस्तू खरेदीसाठी हप्त्याने कमी व्याजात वस्तू खरेदीच्या सोय असल्यास मागणी वाढत जाते
अशाप्रकारे वस्तूंची मागणी त्याच्या किमती बरोबरच वरील अनेक घटकांवर अवलंबून असते.
👉वरील मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी माझा यू ट्यूब व्हिडीओची लिंक पुढे दिलेली आहे👇
👉 https://youtu.be/15eP00p4xd4
माझे पुढील टेलिग्राम चॅनेल जॉईन👇
धन्यवाद Thanks
From
Bansode Sir Economics V S
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know