मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार ! मागणीची उत्पन्न लवचिकता ! मागणीची छेदक लवचिकता ! मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार !
मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अर्थशास्त्रात सर्वप्रथम डॉ. मार्शल यांनी मांडली. मागणीचा सिद्धांत मांडल्यानतर त्यावर आधारित ही संकल्पना त्यांनी मांडली. प्रश्न :- मागणीच्या लवचिकतेची व्याख्या:- वस्तूची किंमत ,लोकांचे उत्पन्न , तसेच इतर वस्तूंची किंमत बदलल्यानंतर एखाद्या वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्यानुसार एखाद्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात बदलत असल्यास जास्त लवचिक मागणी व कमी प्रमाणात बदल्यात असल्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. प्रश्न :-मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :- मागणीच्या लवचिकतेचे पुढील तीन प्रकार पडतात 1) उत्पन्न लवचिकता :- लोकांचे उत्पन्न बदलल्यानंतर त्यांच्याकडून वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते मागणीतील शेकडा बदल उत्पन्न लवचिकता=---------------------------- ...