प्रश्न :- भारतात सरकारी खर्च किंवा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे कोणती? उत्तर :- लॉर्ड केन्स यांनी, देशाचा विकास करणे व मंदी कमी करण्यासाठी सरकारी खर्च महत्त्वाचा आहे, हे सर्वप्रथम स्पष्ट केले. मात्र आज भारतासारख्या देशात सरकारचा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्याची कारणे पुढीलप्रमाणे. 1)वाढती लोकसंख्या :- भारतासारख्या देशात जन्मदर जास्त आहे. दरवर्षी लोकसंख्या 1 कोटी 80 लाख इतकी वाढते. 2011 मध्ये ही लोकसंख्या 121 . 02 कोटी होती. वाढत्या लोकसंख्यामुळे त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक व सामाजिक सोयींवरील सरकारचा खर्च वाढत आहे. 2) सरकारची वाढती कार्य :- भारतात सरकारच्या सक्तीचे देशाच्या संरक्षणावरील खर्चाबरोबरच ऐच्छिक कल्याणकारी कार्यावरील सरकारी खर्च वाढत आहे. उदा शिक्षण, आरोग्य सोयी, सामाजिक सुरक्षा, पेन्शन योजना इत्यादी त्यावरील खर्च वाढत आहे. 3) वाढता संरक्षण खर्च :- युद्ध नसतानाही आधुनिक संरक्षण साधने, त्यांची आयात , त्यावरील संशोधन यावरील सरकारचा खर्च वाढत आहे . 4) वाढते शहरीकरण :- भारतात सतत ग्रामीण भागातू...
Dear All, Welcome To My BLOG